Author: अनंत पांगारकर
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाषिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्राच्या त्रिभाषा सुत्राचं ओझं महाराष्ट्रावर टाकण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाला तमाम मराठीजनांनी ठोकरून लावल्यावर राज्यात राहणारे अमराठी गट आणि व्यक्तींनी मराठी भाषेविरोधात जाणीवपूर्वक मोहिमा सुरू केल्या आहेत. सत्ताधार्यांची फूस असल्यानेच मराठीला विरोध करणार्यांचे चेहरे उजळ माथ्याने पाहण्याची वेळ राज्यातल्या जनतेवर ओढावली आहे. परप्रांतियांचे इतके लाड राज्यात आजवर कोणीच केले नाहीत. राज्यातलं आजचं सरकार तर लाचार झाल्यागत या लोकांपुढे शरण आलं आहे. सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळेच मराठीचा दुश्वास करणार्या परप्रांतियांची हिंमत वाढू लागली आहे. ही सत्तेसाठी काहीही स्वीकारण्याची ही अंगिकारलेली लाचारी होय. इतकी हिंमत या सरकारमध्ये कशी आली? महाराष्ट्रात हिंदी…
संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांनी याप्रसंगी पांडुरंगाच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, बंधुभाव आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. आषाढी वारीची परंपरा ही मानवतेला साद घालणारी असून, ‘महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म’ असल्याचा विचार यावेळी मांडण्यात आला. चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती आणि पूजा करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, नाना देशमुख,…
संगमनेर, प्रतिनिधी – तीन महिन्याच्या कालखंडात एसटी महामंडळाच्या संगमनेर आगारात १० नवीन बसेस (लालपरी) दाखल झाल्या आहेत. यात आज आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ५ नवीन बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नव्या एसटी बसमधून शहरातील मुख्य मार्गावरून फेरफटका मारला. आमदार अमोल खताळ यांनी यावेळी बोलताना, संगमनेर आगारातील एसटी कर्मचारी, चालक, वाहक यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. आषाढी एकादशीपूर्वीच नव्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. साडेतीन महिन्यांपूर्वी आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याने संगमनेर डेपोसाठी १० नव्या बसेस मिळाल्या होत्या. यापैकी ५ बसेस या अगोदरच आगारात दाखल झाल्या होत्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज- मुंबई जवळपास दोन दशकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले. पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे महायुती सरकारने रद्द केल्यानंतरच्या विजयी मेळाव्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी शनिवारी (५ जुलै) वरळी डोम येथे हा भव्य मेळावा आयोजित केला होता. या ऐतिहासिक क्षणी दोन्ही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकजूट दर्शवली. राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला: “बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं!” या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने सन २०१४ मधील घरफोडी आणि चोरीच्या एका प्रकरणात तीन आरोपींना संगमनेरचे ४ थे दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जि. व. भेंडे साहेब यांनी दोषी ठरवले आहे. यात मुख्य आरोपी किशोर सावळेराम फुलवर आणि अक्षय बाळासाहेब डहाळे हे फरार असून या दोघांना प्रत्येकी दोन वर्ष, अमोल नंदुशेठ कुलथे याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी: २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुभाष भिमाजी खेमनर यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सकाळी ९:४५ वाजता ते आणि त्यांच्या पत्नी शाळेत गेले असता, सायंकाळी ५:३० वाजता घरी परतल्यावर त्यांना त्यांच्या…
संगमनेर, प्रतिनिधी: “काँग्रेसचा विचार हा जनकल्याणाचा शाश्वत विचार असून, संगमनेर तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. तालुक्यात काही लोक दांडगाई करू पाहत आहेत, त्यांना वेळीच रोखले पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना येणाऱ्या काळात सडेतोड उत्तर द्यावेच लागेल,” असे कणखर प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभात शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, इंद्रजीत थोरात, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, डॉ. जयश्री थोरात, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, अर्चना बालोडे, संपतराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज, ५ जुलै – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात भूखंड अदलाबदलीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी उपविभागीय अधिकारी (SDO) उदय किसवे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (४ जुलै २०२५) विधानसभेत ही घोषणा केली. मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील जमिनींच्या अदलाबदलीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप किसवे यांच्यावर आहे. त्यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला बेकायदेशीरपणे अदलाबदल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महसूल मंत्री बावनकुळे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. किसवे यांच्या निलंबनासोबतच, या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, स्टॅम्पवेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर: अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १९,९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे आणि रमीजराजा आत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुरुवारी (३ जुलै) पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दोन व्यक्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळू उपसा करून तिची…
अकोले, प्रतिनिधी: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध रंधा धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज ७४४१ दशलक्ष घनफूट (६७.४१%) झाला आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, भंडारदरा धरणातून विद्युतगृहामार्फत ८४५ क्युसेक तर सांडव्याच्या (स्पील वे) गेटमधून १०५८ क्युसेक, असे एकूण १९०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले. येत्या १५ जुलैपर्यंत धरणाची पाणीपातळी ६५% राखण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगला…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील आनंदवाडीजवळ आज सकाळी (शुक्रवार, ४ जुलै) शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बस पलटी होऊन चार विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी, नीलम खताळ यांनी डॉ. गुंजाळ हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. साकूर पठार भागातील अनेक विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी दररोज स्कूल बसने येतात. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, चंदनेश्वर विद्यालयाची बस (क्र. MH 14 BA 8932) ३५ विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून आनंदवाडीमार्गे विद्यालयाकडे जात होती. आनंदवाडी शिवारातील एका वळणावर एका वाहनचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचालकाला हुलकावणी दिली. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली असता, ती साईड…
