Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. २३ मार्च – विशेष प्रतिनिधी  संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी २२०० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्याची तसेच, परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांचा संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अकोले आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली. याव्यतिरिक्त, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बस स्थानकाच्या व्यापारी संकुलात दिव्यांग बांधवांना ३% गाळे वाटप करण्याची अंमलबजावणी करण्याची तसेच, संगमनेरच्या बी.ओ.टी. व्यापारी संकुलाला…

Read More

मुंबई, दि. २४ मार्च – विशेष प्रतिनिधी  संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेची उपलब्धता करून दिली. मात्र हे स्मारक अधिक भव्य आणि भव्य दिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते. तांबे म्हणाले, २१ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे स्मारक…

Read More

ठाणे, दि. २४ मार्च – प्रतिनिधी  संगमनेरमधील डॉ. सुधाकर पेटकर यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठाण्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ. पेटकर यांचा गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या वतीने ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३४ राज्यस्तरीय काव्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते डॉ. पेटकर यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. सुधाकर पेटकर यांचे ‘चंदनाचे हात’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावाना जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी लिहिली आहे. डॉ. पेटकर यांच्या आत्मचरित्राला…

Read More

संगमनेर, दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात वन जमिनीच्या बेकायदेशीर नोंदी करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या सहा व्यापाऱ्यांच्या नावावर नोंद करण्यात आलेल्या व महसुली दस्तऐवज असलेल्या सातबारावरील अवैध नोंदी रद्द केल्या आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात सुमारे ८० हेक्टर वन जमिनीवर काही व्यापाऱ्यांनी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर नोंदी केल्या होत्या. या नोंदींच्या आधारे सदर जमीन हडपण्याचा…

Read More

संगमनेर दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शहरातील पाच मालमत्ताधारकांची एकूण ९ लाख ८ हजार ९७१ रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत नऊ नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी व गाळे भाडे कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमे अंतर्गत उप मुख्याधिकारी संजय पेखळे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, कर निरीक्षक दत्तू साळवे, सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश…

Read More

अकोले (अहिल्यानगर) दि. २३ मार्च –  महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुती पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन १०० दिवस उलटले तरी महिलांना या वाढीव रकमेची प्रतीक्षा आहे. या योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, यावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुरूच राहणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. २१०० रुपये देण्याबाबत सरकार…

Read More

अकोले, दि. २३ मार्च – प्रतिनिधी  महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत राज्यात ५० ‘उमेद मॉल’ उभारण्याची योजना आहे. अकोले येथे योग्य जागा उपलब्ध झाल्यास येथेही ‘उमेद मॉल’ उभारण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. ‘कळसुबाई’ महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार किरण लहामटे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, तहसीलदार सिद्धार्थ…

Read More

त्र्यंबकेश्वर दि. २३ मार्च – त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन या आराखड्याचा आढावा घेतला. या आराखड्यात प्रामुख्याने दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास यांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेत या तीर्थक्षेत्राला खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसोबतच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, यासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची कामे दोन टप्प्यांत पूर्ण होतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होईल. यामध्ये, दर्शनासाठीचा…

Read More

मुंबई, दि. २३ मार्च विशेष प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल. तसेच, कार्यकर्त्यांना कामाची आखणी २ एप्रिलपर्यंत मिळेल आणि शहर…

Read More

संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी  आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संगमनेर पोलिसांनी आज रविवारी शहरातून रूट मार्च काढला, अशी माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत काढलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, गवंडीपुरा, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, माळीवाडा या प्रमुख मार्गांचा समावेश होता. या रूट मार्चमध्ये नवी मुंबई येथील रॅपीड ॲक्शन फोर्सच्या १०२ बटालियनच्या असिस्टंट कमांडर प्रियंकासिंग परिहार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, पोलीस हवालदार दुधाणे यांच्यासह ३२ जवान,…

Read More