Author: अनंत पांगारकर
संगमनेर – संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील नगरपालिकेच्या शासकीय जागेत असलेल्या अनधिकृत सागर वाईन्स, सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदरील दुकानाचे बोगस लायसन्स रद्द व्हावे, नगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमण हटवावे अशा मागण्या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी केल्या आहेत. सदरील दुकान हे अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे बनवून नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत चालवत असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला असून सदरील दुकान तात्काळ बंद करून खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आता नगरपालिका प्राशासन व उत्पादन शुल्क विभाग काय…
नाशिक – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून यातील १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देवळा पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कैलास जगताप (वय ५४ वर्ष, रा. मुंजवाड, सटाणा) असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. हा पोलीस अधिकारी देवळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदारावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करता नोटीस देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक कैलास जगताप (५४, मुंजवाड, सटाणा) याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. २०…
संगमनेर – ‘एफडी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो’ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ असा संदेश देणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालपाणी लॉन्स येथे दि. १६ ते २२ जानेवारी पर्यंत सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शन सारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले. ‘एफ डी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो ‘ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्लोगनला संगमनेरकरांनी दाद…
मुंबई – महायुती सरकार मध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले मतभेद समोर आले आहे. महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आल, त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या असून १९ जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदावरून डच्चू देण्यात आल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे.…
मुंबई, दि. १९ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. ठाणे – उपमुख्यमंत्री…
संगमनेर – अलिबाग (जि. रायगड) येथील साईभक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी लावत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी (ता.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अलिबाग येथील साईभक्त प्रवीण वसंत नाईक, अभय रवींद्र ठाकूर, गणेश दत्तात्रय मेस्त्री, ऋषिकेश पडवळ, जयेश जयराज कोंडे, राजेंद्र ठाकूर हे सर्व साईभक्त वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कौठे कमळेश्वर गावच्या पुढे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…
अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने संगमनेर शहरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या आरोपीच्या दुसऱ्या साथीदार फरार असून पोलिसांनी संबंधित आरोपींकडून सुमारे सहा लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले. गेल्या वर्षी (६ डिसेंबर) संगमनेर शहरातील मालपाणी नगरमध्ये राहत असलेल्या रुपेश मुरलीधर भालेराव (वय ४८, रा. मालपाणीनगर, सुदर्शन बंगला, संगमनेर) यांच्या बंगल्याच्या टेरेस वरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश मिळवत ३ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले होते. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. १०१३/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला…
अहिल्यानगर – गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा विभाजनासंदर्भात जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकार समोर नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. आपण महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक आणि भरती प्रक्रियेचे समर्थन – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभार पारदर्शक असून, देशपातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. बँकेची भरती…
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पक्ष मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणाने प्रस्थापितांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. देशाची सत्ता ही आपला सर्वाधिकार असल्याचा समज झालेले सत्ताधारी भाजपचे पुढारी आणि संघाचे धुरीण विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाचं कधीच कौतुक करू शकत नाहीत. सत्तेची गुलामी करणार्या माध्यमांनी तर आपली लाज गेल्या दहा वर्षांपासून खुंटीला टांगून ठेवल्याने राहुल यांच्या भाषणावर आग ओकण्याचे उद्योग यथासांग सुरू ठेवलेत. सरकारविरोधी चार शब्द बोललं की बुडाला आग लागावी असं चित्र माध्यमांचं आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या भाषणानिमित्त त्यांनी ती हौस भागवण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपच्या सत्तेविषयी आणि त्यांच्या निर्णयांविषयी चांगलं काही बोलता येत नसलं की विरोधी पक्ष नेत्याला झोडा, त्याच्या…
मुंबई – दीर्घकाळ रखडलेली पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त लाभला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहराचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित असलेल्या बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बहुचर्चित असलेल्या भरत गोगावले, योगेश कदम आणि इतर तिघा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना सह पालकमंत्री देण्यात आले…
