Author: अनंत पांगारकर
गुरुवार, ०१ ऑगस्ट | अनंत पांगारकर गेल्या काही दिवसापासून संगमनेरमधील अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत चालल्याने शहराच्या शांततेला लवकरच गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ज्यांनी या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणायचे तेच अवैध धंद्यातील भागीदार बनल्याने संगमनेरमध्ये पोलिसांचा धाक संपल्याचे दिसत आहे. बहुचर्चित शक्तिमान टॉवरसह संगमनेरच्या अनेक भागात मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार दुकाने, गोवंश कत्तलखाने, दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र गंठण, दागिने, चोऱ्या, बेकायदा प्रवासी वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच आहे. त्यामुळे कोणी कितीही आवाज उठवा आमचे कोणीच काही करू शकत नाही, या अविर्भावात आता अवैध धंदे चालक-मालकांची…
गुरुवार, ०१ ऑगस्ट अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार निलेश लंके यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांना आता विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहे. यासाठी शेजारच्या संगमनेर अथवा राहुरीतून आपण इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उमेदवारीला भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी विरोध केला आहे. शेजारच्या संगमनेर अथवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल आणि संधी मिळाली तर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत श्रीरामपूर राखीव असल्याने व शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हेच उमेदवार असल्याने आपल्यासमोर या दोन मतदारसंघांचा पर्याय असल्याचे डॉ. विखे यांनी म्हटले…
गुरुवार, ०१ ऑगस्ट महाभारतामध्ये जसा अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे छत्रपती संभाजी नगर जिल्हा दौऱ्यावर असून बुधवारी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यपूर्व, पश्चिम, गंगापूर, वैजापूर, कन्नड विधानसभा क्षेत्रातील, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एसटी बस मध्ये महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना,…
गुरुवार, ०१ ऑगस्ट बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे दिल्ली बरोबरच संसदेच्या बाहेर आणि संसदेच्या आत पाणीच पाणी दिसून आले. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या संसदेच्या इमारतीला गळती लागली आहे. या गळतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून संदीप चौधरी यांनी देखील आपल्या एक्स अकाउंट वर हा व्हिडिओ टाकला आहे. https://x.com/newsSChaudhry/status/1818842541829112180?s=19 करोडो मे बने इस नई वाली संसद का हाल देखिये, बहार पेपर लीक हो गया, अंदर पाणी का लिकेज! अशा आशियाखाली टाकलेला हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे. नव्या संसद भवनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे २०२३ रोजी थाटामाटात उद्घाटन झालं. मात्र वर्षभरातच या संसद भवनाच्या इमारतीला…
गुरुवार, ०१ ऑगस्ट मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी (३१ जुलै) राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई शिवसेना (उबाठा) गटाच्या मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,’ असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेत आपण जी कामगिरी केली, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवार) अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज पनवेल सेशन्स कोर्टाकडून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून ठेवले आहे. तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी रविवारी उरणमध्ये नागरिकांनी आंदोलन केले होते. यशश्री एका खासगी कंपनीत कार्यरत होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असे तिने तिच्या घरात सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आलीच…
बुधवार, ३१ जुलै गुन्ह्यातील सहभागाबद्दल स्वतंत्र असा सबळ पुरावा पोलिसांनी उपलब्ध न केल्याने संगमनेरमधील एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी जामीन मंजूर केला आहे. मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी असे न्यायालयाने जामीन मंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने हा जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपी मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी याच्या विरोधात आहतेशाम अन्सारी यांच्या खुनाचा आरोप असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२, १२०बी, २०१, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. २४ एप्रिलला संगमनेर शहरालगत असलेल्या मालदाड येथील जंगलात…
बुधवार, ३१ जुलै घारगाव प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत बुधवारी ३ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानादेखील घटनेतील मुख्य आरोपी शादाब तांबोळी याच्यासोबत सलगी करण्यासाठी कुणाल शिरोळे, युसुफ चौगुले यांच्या मदतीने शादाब तांबोळी याने वेळोवेळी फिर्यादी मुलीचा पाठलाग करत तिला प्रेमाचे अमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तसेच शादाब तांबोळी व युसुफ चौघुले यांनी फिर्यादी तरुणीला फसवून मंचर येथे बोलावून घेत युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना…
बुधवार ३१ जूलै महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज…
