Author: अनंत पांगारकर
मंगळवार, २३ जुलै लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी सोमवारी पारनेरमध्ये (अहमदनगर) आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रंगाची ई-रिक्षा देण्याची घोषणा केली. राज्यातील प्रमुख १७ शहरात पहिल्या टप्प्यात ही योजना राबविली जाणार असून त्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाद्वारे टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वत्र योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लाडकी बहीण योजनेत एकत्रित कुटुंबातील जावेचाही समावेश करण्याबाबत भविष्यात विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेच्या प्रचार व प्रसाराची सुरुवात त्यांनी सोमवारी पारनेरमधून केली. यावेळी कृषी मंत्री…
मंगळवार, २३ जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई भारतीय जनता पक्षाचे सरकार हे अदानीसाठी काम करत असून महाराष्ट्रातील एकएक करून सर्व प्रकल्प अदानींच्याच घशात घालण्याचा सपाटा सुरु आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी अदानीला कवडीमोल भावाने देण्याचे निर्णय होत असताना आता ऊर्जा प्रकल्पही अदानीलाच देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या निर्देशाने १६०० मेगावॅटचा औष्णिक व ५००० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अदानी समुहाला देण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. ६० हजार कोटी रुपयांचे हे दोन ऊर्जा प्रकल्पासाठी एकच टेंडर काढून अदानीला बहाल करण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक…
सोमवार २२ जुलै गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या मार्गदर्शक, तत्वज्ञ, पाठीराख्यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुचरणी आपली श्रद्धा लीन करून पुढील आयुष्य सुखकारक व्हावे ह्या आशिर्वादासह शिष्य गुरुचरणी प्रार्थना करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची म्हणजे अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे पूजन बऱ्याचदा केले जाते. आई-वडील यांच्यानंतर आपण आयुष्याचे गुरु मानत असलेले गुरुचरण हे अकलापूर येथील स्वयंभू श्री. दत्तमहाराज व त्यांच्यानंतर राजकीय गुरु म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांची मोलाची भूमिका असल्याचा विचार संगमनेर तालुका विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष गौरव डोंगरे हे मानतात. आमदार सत्यजीत तांबे हे विधानपरिषदेवर निवडून यावेत यासाठी गौरव डोंगरे यांनी मतदानावेळी अकलापूर येथील जागृत दत्त देवस्थानाला अभिषेक करुन नवस केला होता.…
सोमवार, २२ जुलै सर्व काही लाडक्या खुर्चीसाठी सुरू आहे… बघा हा व्हिडिओ…
सोमवार, २२ जुलै मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून उपोषण स्थळी वैद्यकीय पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे तसेच सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे यांनी पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेते विरोध करत आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर जरांगे यांनी आपल्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
सोमवार, २२ जुलै नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण रविवारी निम्मे भरले. मुसळधार नसला तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरण परिसर सततच्या पावसाने चिंब भिजला आहे. सुट्टी असल्यामुळे भंडारदरा घाटघर परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून कळसुबाई, रतनगड, हरिचंद्रगडाच्या डोंगररांगेत पाऊस सुरू आहे. विशेष जोर नसला तरी पाऊस सातत्य टिकवून आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात नियमितपणे वाढ सुरू आहे. ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी ५ हजार ५०८ दलघफू झाला होता. धरण ४९.९० टक्के भरले होते. निळवंडे धरण २१ टक्के भरले असून, या धरणाचा पाणीसाठा आज सकाळी २०.६९ टक्के…
सोमवार, २२ जुलै | अहमदनगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून एलसीबीसह पोलीस दलातील भ्रष्टाचार समोर आणत कारवाईची मागणी केल्यानंतरदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेविरोधात थेट खासदारच उपोषणाला बसल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे. सोमवारी, २२ जुलैला लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. तत्पूर्वी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चा आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. लंके यांच्यासोबत महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलिसांकडून त्रस्त असलेले नागरिकदेखील सहभागी झाले आहे. लंके यांनी गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील पोलीस…
दूध दरासाठीची शेतकऱ्यांची शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉलीची भव्य रॅली उद्या प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार
सोमवार, २२ जुलै दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी गेल्या सतरा दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलक शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. कोतुळ आंदोलनाच्या १८ व्या दिवशी अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय या ५५ किलोमीटर अंतरामध्ये शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉली यांची भव्य रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. आंदोलनाच्या १८ व्या दिवशी…
सोमवार, २२ जुलै शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार असून त्यांनीच भ्रष्टाचाराला राजाश्रय दिल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री शहा भाजपाच्या पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा मोठा विजय यावेळी भाजप युतीचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवितांना म्हणाले, पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात त्यांचे सरकार होते त्यावेळी त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांनी महाराष्ट्रासाठी आणला नाही, उलट मोदींनी खूप…
रविवार २१ जुलै लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. मात्र नव्याने पुढारी होऊ पाहणारे काही लोक फक्त पत्रकबाजी करत आहेत. अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरणे प्रलंबित होती ती तात्काळ मार्गी लागावी यासाठी आमदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानेच या समितीच्या बैठका झाल्या. लाभार्थ्यांचे अडवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती, याच पोटदुखीतून ते पत्रकबाजी करत असल्याचे टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे. थोरात यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या समितीच्या बैठका घेण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीवरून राजकारण…
