Author: अनंत पांगारकर
खोट्या घोषणा करून फसवणूक करणे हे भाजपा सरकारचे धोरण, शेतकऱ्यांबद्दल राज्य सरकारला बिलकुल सहानुभूती नाही शुक्रवार, २८ जून राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत अद्याप मिळाली नाही. दुधाला भाव मिळत नाही. वाळू बाबतचे नवीन धोरण फसले आहे, अशा एक ना अनेक प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला अधिवेशनात धारेवर धरत खोट्या घोषणा आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणे हे राज्य सरकारचे धोरणच असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार थोरात यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात वाळू धोरण पूर्णपणे फसले…
शुक्रवार 28 जून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाबाबत राज्य सरकारच्या फसलेल्या वाळू धोरणाबाबत विरोधी पक्षाने सरकारला कोंडीत पकडले. माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात सभागृहात याबाबत काय म्हणाले ते बघा व्हिडिओत… https://x.com/bb_thorat/status/1806601198843068574?s=19
शुक्रवार, २८ जून राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील चवरसांगवी (श्रीगोंदा) येथे वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी आंदोलनात उतरले आहे. यामुळे जिल्ह्यात महसूलचे कामकाज बंद पडले असून कामानिमित्त आलेल्या जनतेचे हाल सुरू आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या मुंबईत अधिवेशनात व्यस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे कामकाज बंद पडले असल्याचे दिसते. संगमनेर मध्ये देखील कामानिमित्त आलेले नागरिक तहसील कार्यालयात ताटकळताना दिसत होते. किरकोळ ॲफिडेव्हिटसारखी कामे मार्गे लावण्यासाठी देखील कोणताही अधिकारी दुपारी बारा वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान…
दोघा लाचखोरांच्या शोधासाठी पथके रवाना लाचखोर जावळेच्या आयुक्तपदी नेमणुकीची शिफारस केली होती या आमदाराने तर या तत्कालीन मंत्र्याने केली होती नियुक्ती शुक्रवार, २८ जून तब्बल आठ लाखाची लाच मागणाऱ्या अहमदनगर आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघेही लाचखोर अधिकारी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तर देशपांडे यांच्या घरी घेतलेल्या घरझडतीत लाच लुचपतच्या पथकाला घबाड हाती लागल आहे. डॉ. जावळे आणि देशपांडे यांच्या मागावर लाच लुचपतची तीन पथके विविध ठिकाणी कार्यरत झाली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल नॉट रिचेबल येत…
गुरुवार, २७ जून अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तांनी बांधकाम परवानगीसाठी नऊ लाख तीस हजाराची लाच मागितल्याचे समोर आले आहे. एसीबीच्या कारवाईनंतर अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर नगरमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान महापालिकेतील जावळे यांचे कार्यालय एसीबीने सील केले आहे. जालना एसीबीने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या भागीदारांसह 4k रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लॉट खरेदी केला आहे. सदरच्या प्लॉटवर तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांना बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडे १८ मार्च २०२४…
आरोपींच्या २४० कोटीच्या व्यवहारामुळे महाराजांच्या फंडिंगचे नेमके कनेक्शन काय? या आर्थिक व्यवहाराचे कॅनडा, युएसए, हवालासारखे कनेक्शन तर नाही ना? गुरुवार, २७ जून दूधगंगा पतसंस्थेत तब्बल ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या आरोपींनी सभासद नसलेल्या चेतन नागराज कपाटे उर्फ सुदर्शन महाराजच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला करोडो रुपये देणगीच्या रूपाने मिळवून देण्याचा घाट घातला होता. या अनुषंगाने आरोपी आणि महाराजांमध्ये आर्थिक व्यवहार देखील झाल्याचे बोलले जाते. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बडी राजकीय आसामी असलेल्या भाऊसाहेब कुटेसह दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज एक प्रमुख आरोपी आहे.…
गुरुवार, २७ जून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारी (२७ जून) मुंबईमध्ये प्रारंभ झाला. १२ जुलै पर्यंत अधिवेशन चालणार आहे. अधिवेशना दरम्यान उद्या शुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे. गुरुवारी विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षाकडून दोघांची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकाची, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एकाची व काँग्रेसकडून एका आमदाराची निवड यासाठी करण्यात आली आहे. यात अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा समावेश आहे. असे आहेत तालिका अध्यक्ष … कालिदास कोळंबकर…
गुरुवार, २७ जून भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री १०.३० वाजता त्यांना एम्समध्ये आणण्यात आले. त्यांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात ठेवण्यात आले असून त्यांना यूरोलॉजीशी संबंधित समस्या असल्याने युरोलॉजीचे अमलेश सेठ त्यांच्यावर उपचार करत आहेत. एम्सने आपल्या जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षी भारत सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. ते देशाचे उपपंतप्रधानही राहिले आहेत. अडवाणी १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते सामील झाले. स्वातंत्र्यानंतर महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून अडवाणींनी…
बुधवार, २६ जून स्कूलबसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी नाशिक शहरातील सिडको परिसरात त्रिमूर्ती चौकात घडली. मयूर दत्ता गुंजाळ (वय १८ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अंबड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर दत्ता गुंजाळ हा त्याच्याकडील इलेक्ट्रिक दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सिटीसेंटर मॉलकडे जात असतांना गोलीवडाजवळ एका स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मयूरला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सदर अपघाताची माहिती तात्काळ अंबड पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघात स्थळाची पाहणी केली. यानंतर याप्रकरणी…
बुधवार, २६ जून शेतकऱ्यांचे फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात कृषी केंद्रांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे बोलले जाते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने पेरणीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर नजर ठेवली जात असून या सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीनसह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे.…
