Author: अनंत पांगारकर
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तुत्वाचा ठसा उमटेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर तुमचा भर असेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. वृषभ : वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संयम राखण्याचा आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात, त्यामुळे गुंतवणुकीचे व्यवहार करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि एखादा शुभ समारंभ ठरण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मिथुन :…
संगमनेर: स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर संगमनेर मध्ये अवैध गोवंश जनावरांच्या कत्तली सुरू आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून सातत्याने अहिल्यानगर एलसीबीचे पथक संगमनेर मध्ये छापेमारी करत आहे. गेल्या काही दिवसात या पथकाने तीन-चार मोठे छापे टाकत या अवैध कत्तलखान्याची पोलखोल केली आहे. त्यामुळे या अवैध कत्तलखान्यांना नेमके आशीर्वाद कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडक आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – संगमनेर आणि सिन्नर मतदारसंघातील आरोग्य सुविधांचे प्रलंबित प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित ट्रॉमा सेंटर, महिला रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या कामात होणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंबाबाबत आज आमदार सत्यजित तांबे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्री आबिटकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रामुख्याने सिन्नर-वावी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरचा विषय लावून धरला. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजूर झालेल्या या सेंटरचे काम अद्यापही सुरू न झाल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, परिणामी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, या…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – श्रीरामपूर शहरातील ‘आदर्श लॉज’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, अनैतिक देहविक्रय व्यवसायामुळे हे लॉज एका वर्षासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही माहिती दिली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ‘आदर्श लॉज’ येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक आणि पंचांच्या उपस्थितीत सदर लॉजवर छापा टाकला. या छाप्यात लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले (वय ३५ वर्ष, रा. रंगोली…
मंगळवारी १० फेब्रुवारीला पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील प्रमाणे निर्णय झाले. 🌟 नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. यातून ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प व १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार. राज्यातील ८ लाख हेक्टर कृषि क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. (जलसंपदा विभाग) 🌟 कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार. मौजे विकासवाडी ( ता. करवीर) १२ हेक्टर ७६ आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी. कोल्हापुरच्या क्रिडा विकासाला चालना मिळणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) 🌟 पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे विभाजन केले आहे. आता जिल्ह्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी अशी दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यालये निर्माण करण्यात आली असून, शिर्डीच्या अधीक्षकपदी ऋषिकेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येणार असून, राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या सहा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या अहिल्यानगरमध्ये आता दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यरत असतील. नगर कार्यालयाची धुरा अधीक्षक सोनोणे यांच्याकडे कायम असून, शिर्डीसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारणीला सुरुवात झाली आहे. या नवीन रचनेनुसार तालुक्यांची विभागणी अत्यंत स्पष्टपणे करण्यात आली आहे. अहिल्यानगर कार्यालयांतर्गत अहिल्यानगर शहर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुमारे दोन हजार धावपटूंनी सहभाग नोंदवून संगमनेरच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडविला. संगमनेरकरांमधील ही आरोग्यविषयक जागरूकता शहराच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असल्याची भावना क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी यावेळी व्यक्त केली. मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ लायन्स क्लब संगमनेर सफायरने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शरीराला व्यायामाची सवय लागावी आणि निरोगी आरोग्याचा संदेश घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत ७ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांचा समावेश होता. लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेश…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वृषभ : आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग आहेत. नोकरीत बढतीची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरामध्ये पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, फक्त घाईत कोणताही निर्णय घेऊ…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या आधीही संगमनेर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडल्यानंतर या टोळीवर देखील बीएनएसच्या कलम १११ कारवाई केली होती. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हरिष रामसिंग…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्य सरकारने घरपट्टी शास्ती आणि दंड माफीचा निर्णय घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी संगमनेर नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अद्याप या सवलतीचा लाभ मिळालेला नाही. याउलट, सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत नागरिकांकडून जादा रक्कमेची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि सॉफ्टवेअर कंपनीवर कठोर कारवाई करून नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारने शास्ती माफीचा जीआर काढल्यानंतर संगमनेरमध्ये याचे मोठे स्वागत झाले होते. अनेकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचेही प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या…
