Author: अनंत पांगारकर
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित येणी वसूल होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करावा. वृषभ: आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीच्या कामांमुळे थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांनी कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळचा वेळ मित्र-मैत्रिणींसोबत मजेत जाईल. मिथुन: बौद्धिक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल असून तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल.…
शिर्डी: तीर्थक्षेत्र शिर्डी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका तरुण कामगाराने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर असून त्याचे वय अंदाजे २२ वर्षे होते. विशाल हा मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो शिर्डीत आला होता आणि सध्या राहता तालुक्यातील गणेश नगर येथे वास्तव्यास होता. तो गेल्या काही काळापासून शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून सेवा बजावत होता. सोमवारी दुपारच्या सुमारास…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि परिसरात अनेक घरफोड्या व जबरी चोऱ्या करणाऱ्या कलीम-अलीम टोळीचा संगमनेर शहर तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात दिनांक १ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री २३:०० वाजेपासून ते २ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे ०२:३० वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या टोळीला रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे हे शासकीय वाहनाने रात्रगस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोल्हेवाडी रोड लगत काही इसम मोटारसायकलवर अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या साहित्यासह फिरत आहेत. बातमी मिळताच पोलिसांनी पंचांना बोलावून…
संगमनेर, प्रतिनिधी – चंदनापुरी (संगमनेर) येथील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीच्या पादुका आणि एका भाविकाचा मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या पादुकांसह, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की, २९ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ च्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराचे कडी-कोयंडा उघडून पालखीतील चांदीच्या पादुका चोरून नेल्या होत्या. तसेच परिसरात झोपलेले साक्षीदार संजय गाडेकर यांचा मोबाईलही लंपास केला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा…
दैनिक राशीभविष्य: मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल, मात्र घाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराशी संवाद वाढवणे हिताचे ठरेल. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नव्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली, तरी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. अनावश्यक खर्चावर लगाम घालणे आवश्यक…
संगमनेर, प्रतिनिधी- शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व, शिवसेनेचे संगमनेर मधील पहिले नगरसेवक, स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संगमनेर नगर परिषदेने एक मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. संगमनेर नगर परिषद कार्यालय ते कॅप्टन लक्ष्मी चौक या मुख्य रस्त्याला आता ‘स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव दिले जाणार आहे. कैलास (आप्पा) केसेकर यांच्या दशक्रिया विधीवेळी रविवारी श्रद्धांजली वाहताना सभेत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्वासराव मुर्तडक यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना मुर्तडक भावूक झाले होते. केसेकर यांच्या निधनाने शहराने एक अभ्यासू आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावल्याची भावना यावेळी उपस्थित जनसमुदायाने व्यक्त केली. आप्पा केसेकर यांनी…
मुंबई: विशेष प्रतिनिधी संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या संगमनेर बसस्थानक परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी कंबर कसली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची भेट घेऊन आमदार तांबे यांनी बसस्थानक परिसरातील विविध समस्यांचे निवेदन सादर केले. आमदार तांबे यांनी यासंदर्भात महत्त्वाचे ट्विट करत माहिती दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांकडे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक लक्ष दिले असून, लवकरच यावर ठोस अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे म्हटले आहे. https://x.com/i/status/2018255157272904060 संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा प्रस्तावित आहे. या स्मारकाची भव्यता लक्षात घेता त्यासाठी वाढीव जागेची गरज…
संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. थोरात यांनी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, 1990 पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘पोक्सो’सह ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – सर्वांसाठी मानवाधिकार संघटना’ यांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, कलिम पठाण या सराईत गुन्हेगाराने पाच महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. पोलीस प्रशासनाने ३१ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, घरफोडी, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीवर…
आजचे राशिभविष्य: मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित येणी वसूल होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करणे हिताचे ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. वृषभ आज तुम्हाला नशिबापेक्षा कष्टावर जास्त विश्वास ठेवावा लागेल. व्यापार किंवा व्यवसायात काही नवीन करार होण्याची शक्यता आहे, परंतु घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर…
