Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखविली. त्यांच्या जयंतीमध्ये कसले राजकारण करता असा सवाल उपस्थित खरंच शिवजयंती निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करत प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. रविवारी रात्री संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत देखाव्यासाठी आलेल्या माजी मंत्री थोरात, आमदार तांबे यांचे…

Read More

संगमनेर, दि. १६ मार्च – प्रतिनिधी छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कपिल पाटील यांनी दिला आहे. मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारती संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील छात्र भारतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयावर संगमनेरमध्ये मोर्चा काढला होता. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी संगमनेर नगर परिषदेत आले होते त्यावेळी मारहाणीची घटना घडली. मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची तक्रार देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी नोंदवलेली नाही. तसेच मारहाण…

Read More

रविवार, दि. १६ मार्च – राज्य सरकार येत्या आठवडाभरात नवे सर्वसमावेशक असे वाळू धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूरमध्ये केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची काम सुरू आहे. या घरकुलांच्या कामासाठी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मोफत वाळू उपलब्ध केली जाणार आहे. तसेच राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरच्या दगड बारीक करून वाळू तयार केले जाणार आहे. पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी यामुळे कमी होईल असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाही आणि…

Read More

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लावणार्‍या सनातन्यांचा धीर दररोज चेपला जातो आहे. आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी खात्रीच त्यांना पटल्याने काहीही करायचा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेच आहे पण जे उत्तर प्रदेशमध्ये घडायचं ते महाराष्ट्रात घडू लागलंय याचं वैषम्य वाटू लागलं आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे विश्‍वासाने पाहिलं जात होतं ते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि त्यातही सार्‍या गृह विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना सनातनी ज्या पध्दतीने मान वर काढत आहेत, ते पाहिलं की राज्याचं काही खरं नाही, अशी भीती वाटू लागते आहे. देशभर सुरू असलेल्या होळीच्या पार्श्‍वभूमीवर राजापूरमध्ये घडलेल्या अघटीत घटनेने राज्याची मान शरमेने…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई विधीमंडळ सचिवालयाने “महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा” या विधानसभा विधेयकाद्वारे इंग्रज कायद्याप्रमाणे कृती केली जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विधेयकासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या विधेयकासंदर्भात सर्वसामान्य जनता, विधीमंडळाचे माजी सदस्य, संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि संस्था यांना आपले म्हणणे समितीपर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट करत सत्ताधाऱ्यांकडून इंग्रजांप्रमाणे कायदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी नागरीकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी…

Read More

संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी  चाळीस वर्षाची विकास कामांची परंपरा आणि प्रगती नव्या आमदारांना तीन महिने ही सांभाळता आली नाही. माजी मंत्री थोरात यांनी आपल्या कारकीर्दीत संगमनेर तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला असल्याने राज्यातील विकसित तालुक्यांमध्ये या तालुक्याचे गणना होते. मात्र अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आमदार अमोल खताळ यांनी आपण पालकमंत्री विखे यांना नव्हे तर संगमनेरकरांना बांधील असल्याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने ज्यांना साधे नियोजन देखील करता येत नाही त्यांनी माजी मंत्री थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. प्रसिद्धी पत्रकात दिवटे यांनी म्हटले आहे…

Read More

संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी ठेकेदारी संस्‍कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्‍या प्रश्‍नांची उत्‍तर दिली नाहीत. वर्षानुवर्षे या तालुक्‍याचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्‍याला स्‍वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्‍वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्‍या बैठकीवर टिका करण्‍यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्‍मपरिक्षण करा आणि नव्‍या विकास प्रक्रीयेत खोडा घालण्‍याचे काम करु नका असा सल्‍ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी संगमनेरमध्‍ये घेतलेल्‍या बैठकीवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्‍या टिकेला उत्‍तर देत खताळ म्‍हणाले, चाळीस वर्ष ज्‍यांना कोणताच प्रश्‍न सोडविता आला नाही, ज्‍यांचे प्रश्‍न फक्‍त ठेकेदार आणि माफीयांशी गुंतलेले होते…

Read More

संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी  संगमनेर शहर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहर प्रमुख पदी रवींद्र कानकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुखांच्या आदेशावरून सह संपर्कप्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांनी ही निवड केली आहे. कानकाटे यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, सध्याचे शहर प्रमुख असलेले आप्पा केसेकर यांनी पक्षविरोधी काम केल्याने तसेच तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणतीही जबाबदारी न घेतल्याने त्यांच्या पदाला आपण स्थगिती देत असल्याचे सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट आणि उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांनी म्हटले आहे. विद्यमान शहर प्रमुख यांच्या पदाला स्थगिती देत कानकाटे यांची प्रभारी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्रात म्हटले…

Read More

संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शनिवारी बोलावलेल्या शांतता समितीचीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा ठोकल्याने वाद निर्माण झाला. दोन्ही गटाचे उत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी थेट “कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुमची इज्जत येथे घालवू नका” अशा शब्दात सर्वांना सुनावल्याने निर्माण झालेला वाद निवळला. संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी (१५ मार्च) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती.…

Read More

संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीचे कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी संगमनेरमध्ये घडला होता. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (१५ मार्च) माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते संगमनेरमध्ये येऊन धडकणार आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे दिसते. छात्र भारतीची राज्य कार्यकारिणी बैठक संगमनेरात… छात्र भारती महाराष्ट्र राज्य कार्यकारणीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून  आज थेट संगमनेरातच भास्करराव दुर्वे स्मारक भवन येथे त्यांनी राजस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यात आंदोलनाची पुढील…

Read More