Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर दि. १ – जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहे. या रुग्णवाहिकांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१ फेब्रुवारी) करण्यात आले. यांची होती उपस्थिती… जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. १९ रुग्णवाहिका… अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत…

Read More

अहिल्यानगर दि.१-  जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगस्नेही वातावरणासाठी सुपा व अहिल्यानगर औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या हद्दीतील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. शनिवारी (१ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुपा व पारनेर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसिलदार श्रीमती गायत्री सौंदणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक उद्योग येऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याला शासनामार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. सुपा व…

Read More

संगमनेर दि. १ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान थोरात यांचा पराभव करून संगमनेरमधून निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना या संदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर उत्तर देताना संगमनेरमध्ये आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाकरे यांनी निकालाबाबत व्यक्त केलेली शंका संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना थोरात यांचा पराभव अनपेक्षित असाच होता. मात्र थोरात यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर असताना देखील थोरात यांनी चाळीस वर्षात काय केले असा प्रश्न…

Read More

संगमनेर दि. १ – संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस ७० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली जात असतानाच संगमनेर विधानसभेचा निकाल हा जनतेला न पटणारा आणि अनपेक्षित असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मुंबई येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभेत असा निकाल कसा लागू शकतो. हा मोठा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातून सलग…

Read More

अहिल्यानगर दि. १ – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (१ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्य विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांचे चार आमदार निवडून येण्याची पात्रता नव्हती त्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा कशा मिळाल्या या राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाने राष्ट्रवादी काँग्रेस हैराण झाली आहे. राज यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने तिरकस सवाल करत महाराष्ट्राने राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका पाहिली आहे असं त्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विचारलं आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलं. विधानसभेत महायुतीत येणार की नाही, अशी गोंधळलेली स्थ‍िती मनसेची झाली होती. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा…

Read More

शिर्डी दि. १ – मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकाऱ्यांनाही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी दर आठवड्याला गावभेटी देत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाकडून ११ कलमी परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या परिपत्रकातील ११ कलमी मुद्दे पुढील प्रमाणे सदर भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे याची सकारात्मक खातरजमा करावी. यात केवळ औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील असे नियोजन करावे. दौऱ्यामध्ये सकारात्मक फलित निघेल…

Read More

संगमनेर दि. ३० – शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत संगमनेरमध्ये वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल तीन-चार तासांपासून गायब असलेली वीज रात्री उशिरापर्यंत न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनेक घरांमधून सुरू आहे. त्यामुळे महिलांचे सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याने व त्यातच शहरातील महावितरण लाईटच्या बत्या गुल केल्याने अंधारातच हे कार्यक्रम सुरू होते. दरम्यान गायब झालेल्या विजेचा परिणाम शहरात तसेच उपनगरात जाणवत असून अनेक नागरिकांनी या संदर्भात महावितरणच्या कार्यालयाकडे विचारणा करण्यासाठी दूरध्वनी केले असता नागरिकांचे दूरध्वनी घेण्याचे टाळण्यात आले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी देखील फोन घेतले नाही. अंधाराचा…

Read More

संगमनेर दि. ३१- काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार असून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत संतापाची लाट… संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अपर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये…

Read More