Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कैद्याला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे. विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रजेवर बाहेर आल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार झाला होता. २०१४ मध्ये बीड येथे ही धक्कादायक घटना घडली होती. विठ्ठलला त्याच्या बहिणीचे प्रेमप्रकरण आणि प्रियकरासोबतचे लग्न मान्य नव्हते. यातून त्याने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रुग्णालयातच विष पाजून प्राणघातक हल्ला केला होता. दुर्दैवाने या हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर बचावला. या गुन्ह्यासाठी विठ्ठलला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, १७ जुलै:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांचा आढावा घेतला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शिर्डी विमानतळाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विधानभवनात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे सध्या संथगतीने सुरू असून, ती कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्रातील सहकारी संकल्पना ही जागतिक स्तरावर नावाजली जात असून, सहकारातूनच सामान्य माणसाची खरी प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी केले.  विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार दिंडी’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सहकार दिंडी व सहकार परिसंवादात बारी बोलत होते.  राजहंस दूध संघापासून सुरू झालेली ही दिंडी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून अमृतवाहिनी बँकेपर्यंत काढण्यात आली. “विना सहकार, नाही उद्धार” या घोषणांनी अमृत उद्योग समूह दुमदुमून गेला. या…

Read More

महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरचे सुपुत्र, सीआरपीएफ जवान, मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मरणार्थ संगमनेरमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दिल्लीत निधन झाले होते. मेजर घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या मागणीसाठी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेदखान पठाण, मुजिक खान, वसीम शेख, आवेद खान, डॉ. विजय पवार, शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, एकनाथ श्रीपत,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. देशसेवा बजावताना घोडेकर यांना वीरमरण आले आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा उल्लेखनीय असल्याने त्यांचे संगमनेरात यथोचित स्मारक उभारण्याची मागणी करत यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे)शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दिल्लीत कर्तव्य बजावत असताना जवान संदीप घोडेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये त्यांच्यावर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली वाहताना सूर्यवंशी यांनी ही मागणी केली. सामान्य कुटुंबात परिस्थितीवर मात करत संगमनेरकर असलेल्या संदीप घोडेकर यांनी सीआरपीएफ जवान म्हणून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आणि महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसच्या फिटनेसचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांना शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनी जबाबदार आहे. या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे…

Read More

पुणे – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेरमधील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व अहिल्यानगर काँग्रेस कमिटीचे (अ.जा.) जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे यांना पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पायावरील उपचारासाठी ११ जुलैला रुग्णालयात दाखल झालेल्या गावित्रे यांच्यावर मंगळवारी (१५ जुलै) रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गावित्रे यांना पुढील काही दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरामाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते संगमनेरात परतणार आहे.

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  रोटरी केवळ एक सेवाभावी संघटना नव्हे, तर ‘समाजसेवक घडवणारी जीवनशाळा’ आहे, एक उत्तम रोटेरियन कसा असावा आणि समाजाशी त्याचे नाते किती घट्ट असावे असे संबोधत रोटरीच्या ४२ वर्षांच्या समाजकार्याचा डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी गौरव केला. २०२५-२६ या वर्षासाठी विश्वनाथ मालाणी यांची अध्यक्षपदी, सौरभ म्हाळस यांची सचिवपदी, तर संकेत काजळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब संगमनेरने नुकताच आपला वार्षिक पदग्रहण सोहळा मालपाणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा केला.  रविवार, १३ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्याला डॉ. कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  तत्कालीन गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या बदलीनंतर गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या जागेवर अखेर नव्या गटविकास अधिकाऱ्यांची ग्रामविकास विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता संगमनेरला नव्हे गटविकास अधिकारी मिळणार आहे.  श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी असलेले पी. ए. सिनारे यांची विनंतीवरून संगमनेरच्या गटविकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सिनारे यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी (15 जुलै) काढण्यात आले. सिनारे यांची जिल्हा अंतर्गत बदली करण्यात आले आहे. नवे गटविकास अधिकारी संगमनेरचा पदभार कधी स्वीकारता याकडे लक्ष लागले आहे. नागणे यांची मंत्रालयात बदली झाल्यानंतर संगमनेरला येण्यास अधिकारी उत्सुक नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचे गटविकास अधिकारी…

Read More

अहिल्यानगर, दि. १५-  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More