Author: अनंत पांगारकर
संगमनेर, संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी बाजीराव केशव पवार यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र श्रीपत थोरात नावाच्या व्यक्तीने शासकीय कामकाजात अडथळा आणत मारहाण केल्याची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोमवार, १ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी दीड ते अडीचच्या सुमारास घडली. ग्रामविकास अधिकारी बाजीराव पवार यांच्या तक्रारीनुसार, दुपारी १:३० वाजता राजेंद्र थोरात ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने दिलेल्या अपूर्ण माहितीचे रेकॉर्ड दाखवण्याची मागणी केली. त्यावेळी पवार यांनी त्याला उद्या येण्यास सांगितले. मात्र, दुपारी २:३० वाजता थोरात पुन्हा कार्यालयात आला आणि त्याने उर्वरित माहितीचे रेकॉर्ड तात्काळ देण्याचा आग्रह धरला. त्याने रेकॉर्ड मिळाल्याशिवाय…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस आहे. वृषभ- आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नवीन संधी मिळतील आणि जुने प्रश्न सुटतील. सामाजिक संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क- आज तुम्हाला काही मानसिक तणाव जाणवू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी वादविवादांपासून दूर राहा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सिंह- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही…
अहिल्यानगर- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संगमनेर- संगमनेर नगर परिषदेने राबवलेला घनकचरा व्यवस्थापनाचा यशस्वी प्रकल्प आता देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. याच यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका विशेष टीमने नुकतीच संगमनेर येथील कचरा डेपोला भेट दिली. या टीमने कचरा वर्गीकरण, खत निर्मिती आणि वीज निर्मिती प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर व राहुल वाघ, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी मोठे काम करण्यात आले होते. तर सध्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाला आणखी चालना दिली. संगमनेर नगर परिषद शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका आणि घातक कचऱ्यामध्ये वर्गीकरण करते. या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत आणि वीज तयार…
संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील निमोण सोनेवाडी गावातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या विरोधात सुरू असलेले उपोषण अखेर राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारी मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश थोरात यांनी प्रशासनाला दिले आहेत. निमोण सोनेवाडी ग्रामसभेने १२ सप्टेंबर २०२२ आणि २७ मे २०२५ रोजी गावात कोणत्याही स्टोन क्रेशरला परवानगी न देण्याचा ठराव केला होता. मात्र, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी खोट्या मासिक मीटिंग्ज दाखवून जनतेची फसवणूक केली. याविरोधात भागवत बाबूराव सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर सात दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. प्रशासनाचे या रास्त मागणीकडे दुर्लक्ष होत असताना, बाळासाहेब थोरात…
संगमनेर – दरवर्षीप्रमाणे यंदाही मेनरोड शिवसेना शाखा क्र. ११ च्या वतीने गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने भव्य गणेश उत्सव गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी, संगमनेर शहरातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत आणि गौरव करण्यात येणार आहे. उद्योगपती ओंकारनाथजी व माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ हा स्वागत सत्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा गणेश विसर्जन मिरवणुकीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मानाचे गणपती मंडळ तसेच इतर सर्व मंडळांना त्यांच्या उत्कृष्ट देखावे, भव्य मूर्ती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी सन्मानित केले जाईल. या सोहळ्यात अनेक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये, उत्कृष्ट मूर्ती, भव्य मूर्ती, उत्कृष्ट देखावा, भव्य देखावा, भव्य लायटिंग आणि भव्य मिरवणूक यांसाठी मंडळांना…
(टीप: हे सामान्य राशीभविष्य आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीवर आधारित राशीभविष्य वेगळे असू शकते. तुमचा दिवस शुभ असो!) मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि वरिष्ठ तुमच्या कार्याचे कौतुक करतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ (Taurus) : आज तुम्हाला तुमच्या कामात थोडे लक्ष द्यावे लागेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. मिथुन (Gemini) : आज तुमच्या संवादाच्या कौशल्यामुळे तुमची अनेक कामे मार्गी लागतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी दिवस…
संगमनेर- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांनी आमदार हल्ला प्रकरणातील त्यांचे नाव समोर आल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, हे थोरातांना बदनाम करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. नेमकं काय म्हटलंय निवेदनात?- खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याने त्यांना २२ ते २५ तारखेदरम्यान एक-दोन वेळा फोन केला होता. ‘साहेब कुठे भेटतील?’ एवढीच विचारणा त्याने केली होती. या १५-२० सेकंदाच्या फोनव्यतिरिक्त आरोपीसोबत त्यांचे आजवर कोणतेही बोलणे झालेले नाही. खेमनर पुढे म्हणतात की, त्यांना दररोज…
संगमनेर – राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, संगमनेर शहरातही मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या आरतीतून गणेशभक्ती दिसू लागली आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती आमदार सत्यजीत तांबे व मैथिली तांबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार तांबे यांनी संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आरती सोहळ्याला मोठ्या संख्येने संगमनेरकर आणि भाविकांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आमदार तांबे यांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक नागरिकांच्या आग्रहामुळे आमदार तांबे यांनी शहरातील घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा…
संगमनेर- प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागतील, असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी म्हटले आहे की, प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडींगचा व्यवसाय करत होते. मागील २० वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडींगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना…
