Author: अनंत पांगारकर

गुरुवार 19 जून –  पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे सिगारेट ओढू नको असे सांगितल्याने एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश उत्तम जोगदंड (वय 21), उमेश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19), आकाश सुभाष भिसे (वय 21), आणि भागवत मुंजाजी आसुरी (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत येथील नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर पाच जणांचे एक टोळके सिगारेट ओढत उभे होते. त्यावेळी…

Read More

गुरुवार १९ जून, – अकोले:  मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे अकोले तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे. तालुक्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे, आंबीत धरणानंतर आता मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे.  पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा प्रवाह आता मुळा धरणाकडे वेगाने झेपावला आहे. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुळा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ६०० दशलक्ष घनफूट (दलघफू) क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने…

Read More

अहिल्यानगर, प्रतिनिधी:  एका विवाहितेवर घरात घुसून चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (१७ जून) सकाळच्या सुमारास घडली. पीडित विवाहितेवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडितेने बुधवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, चार अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. यातील एका संशयिताने विवाहितेच्या तोंडात कापडी बोळा कोंबला होता. त्यानंतर इतर तिघांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक अत्याचार केला. सध्या पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदविण्यात आला असून…

Read More

गुरुवार, 19 जून- संगमनेर :  धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. याच विचाराने एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आणि जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने शनिवारी, 21 जून 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन महिलांच्या आरोग्य आणि सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने या निमित्ताने सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत हे भव्य योग शिबिर आयोजित…

Read More

मुंबई, १९ जून:  राज्यात दूध भेसळ थांबवण्यासाठी लवकरच एक नवीन कायदा लागू केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्रालयात दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नवीन कायद्यामुळे राज्यातील दूध भेसळीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीला दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, तसेच राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दूध संघांच्या प्रतिनिधींनी राज्यात दुधासाठी समान दर असावा, तसेच ‘एक राज्य एक ब्रँड’, ‘एक जिल्हा एक दूध संघ’ आणि ‘एक गाव एक दूध संस्था’ स्थापन…

Read More

गुरुवार, 19 जून: संगमनेर संगमनेर शहरात ATM फसवणुकीचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधून पैसे काढताना पिन नंबर पाहून कार्ड बदलून 35,100/- रुपयांची फसवणूक केल्याची ही घटना बुधवारी समोर आली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (गु.र.नं. 558/2025, बीएनएस कलम 318(4) प्रमाणे) दाखल करण्यात आला आहे.  नेमकं काय घडलं? बुधवार, 18 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास संगमनेर येथील जाणता राजा मैदानाजवळ असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे (वय 48) हे एटीएममधून पैसे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी आत्ताच आम्ही सात लाखाची चोरी पकडली असून तुमच्यावर आमचा संशय आहे, असे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीला तिघांनी सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून लुटण्यात आले. बनावट सीआयडी अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास करण्याची घटना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर चौधरी ढाब्याजवळ घडली आहे. 14 जून 2025 रोजी सकाळी अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा ( No. 0391/2025) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक विधीसाठी गेलेले केशव नाथा गोसावी (वय 69,…

Read More

अहिल्यानगर, दि.१८ –  रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील स्वावलंबनासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय असून विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात हा व्यवसाय मदत करू शकतो. मागील वर्षात जिल्ह्यात ६६८ शेतकऱ्यांनी ३१६ हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन २ लाख ६५ हजार अंडीपुंज व १५१ मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षात रेशीम शेतीसाठी १०२ शेतकऱ्यांना ८५ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी दिली. रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. बदलते हवामान, बाजारातील शेतीमालाच्या बाजारभावाची चढउतार आणि वाढती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे एका आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी, तसेच अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि मागासवर्गीय संघटनांनी मंगळवारी (दि. १७) संगमनेर शहरात निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. शेतात शौचाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील बस स्थानकासमोर हा रास्ता रोको करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत मोर्चाने बस स्थानकासमोर आले. यावेळी युवकांनी घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोदरम्यान झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जुले पठार येथील घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली.…

Read More

पुणे:  मुळशीचे तत्कालीन तहसीलदार रणजित भोसले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. सात-बारा उताऱ्यावरील ‘द टाटा पॉवर कंपनी लि.’चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कात दाखल करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अनियमिततेप्रकरणी राज्य सरकारने सोमवारी निलंबनाचे आदेश जारी केले असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या प्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४१, १४० आणि १५५ नुसार, भोसले यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाव कमी करण्याचा दिलेला आदेश रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर या अनियमिततेची चौकशी अतिरिक्त विभागीय…

Read More