Author: अनंत पांगारकर
नांदेड – बीड जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना नांदेड येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी, “बीडमधील घटना दुर्दैवाने महाराष्ट्राला लाज वाटाव्या अशा आहेत. सरकार यावर काय करतेय?” असा संतप्त सवाल विचारला. थोरात म्हणाले की, बीडमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. या गुन्हेगारीचा संसर्ग इतर जिल्ह्यांमध्ये पसरतो की काय, अशी भीती वाटत असताना सरकारची निष्क्रियता हा मोठा प्रश्न आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर राज्याचे आणि देशाचे भवितव्य काय, अशी मोठी काळजी त्यांना वाटत असल्याचे थोरात यांनी सांगितले. सरन्यायाधीश भूषण गवई…
संगमनेर – प्रतिनिधी पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत युवक काँग्रेसने प्रशासनाला निवेदन दिले असून, २३ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. आता नव्याने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, यामुळे चंदनापुरी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जयश्री थोरात…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांवरील शास्तीकर माफीच्या निर्णयावरून आता स्थानिक राजकारण तापले आहे. माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अपुऱ्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तर, आमदार सत्यजीत तांबे हे शास्तीकर माफीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास आकारण्यात येणारा २% शास्तीकर आणि अनाधिकृत बांधकामांवरील शास्तीकर माफ करावा, ही संगमनेरमधील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने…
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीदवाक्य असलेले नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले असून, यात ७० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच विविध सिंचन प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांच्या सुधारित खर्चांना आणि प्रशासकीय मान्यतांना मंजुरी देण्यात आली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्री उपस्थित होते. गृहनिर्माण आणि नगरविकास क्षेत्रातील निर्णय… नवीन गृहनिर्माण धोरण – राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण ‘माझे घर-माझे अधिकार’ या ब्रीदवाक्यासह जाहीर करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम यात समाविष्ट असून,…
संगमनेर – प्रतिनिधी नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने ‘अभय योजना’ लागू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिक थकीत मालमत्ता करावरील शास्तीच्या ओझ्याखाली दबले होते. आमदार खताळ यांनी नागरिकांची ही समस्या शासनाकडे प्रभावीपणे मांडली. त्यांनी वेळोवेळी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शास्ती माफीसाठी ‘अभय योजना’ मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व…
संगमनेर – प्रतिनिधी मंदिरांबरोबरच शिक्षण मंदिरे समृद्ध झाली आणि वृषाली कडलग यांच्यासारख्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पिढी घडवली, तर निश्चितच एका सामर्थ्यसंपन्न समाजाची निर्मिती होईल. समाजासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती नेहमीच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतात, असे गौरवोद्गार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. लातूर येथे मानव विकास संस्थेतर्फे आयोजित ‘मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रमाकांत व्यासजी, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, सुप्रसिद्ध गायक डॉ.अंबरीष महाराज देगलूरकर यांचीही उपस्थिती होती. या सोहळ्यात, मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या सामाजिक…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून, याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त असलेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली, तर काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, ज्यामुळे शेतात पाणी साचले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, भाजीपाला, फळपिके आणि जनावरांसाठी असलेला चारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच, वादळामुळे अनेक घरांवरील…
संगमनेर – प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यात थैमान घालत असलेल्या अवकाळी पावसाने आज अक्षरशः कहर केला. संगमनेर शहर आणि पश्चिम तसेच पूर्व भागाला जोरदार तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा, भाजीपाला आणि साठवणुकीतील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. आज (सोमवार, १९ मे) निमगाव भोजपूर, निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर, चिकणी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागातील प्रमुख…
संगमनेर – प्रतिनिधी निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ११ ते १५ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांना साहस, कला आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणाद्वारे समृद्ध जीवनाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमातून विज्ञानवादी विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. तांबे बोलत होते. या वेळी शरयू देशमुख, प्रा. हिरालाल पगडाल, प्रकल्प प्रमुख अनंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या…
संगमनेर – प्रतिनिधी अकोले आणि संगमनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर १ मे २०२५ ते १८ मे २०२५ दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर आणि संगमनेर विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली गेली. या कारवाईत अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे, विरगाव फाटा, तांभोळ, अंभोळ, बेलापूर, आंबित, केळंगण, खिरविरे, लिंगदेव आणि राजूर तसेच संगमनेर तालुक्यातील अवैध मद्य विक्रीची ठिकाणे आणि ढाब्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १९ गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारू ३५०.१ बल्क लिटर, विदेशी दारू ४३.०२ बल्क लिटर, बीयर ९.५५ बल्क लिटर…
