Author: अनंत पांगारकर
मेष – उद्याचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण आरोग्याबाबत थोडी जागरुकता बाळगणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून उद्याचा दिवस लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. नवीन व्यावसायिक संबंध जोडले जातील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. मिथुन – तुमच्या बोलण्याच्या चातुर्यामुळे उद्या तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना काही…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर या तीनही तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्री आणि शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, या तीनही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची…
संगमनेर | प्रतिनिधी: प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घ्यावी. अवैध वाळू उपसा करणारी व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता थेट कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. लोणी येथे गुरुवारी आयोजित ‘जनता दरबार’ उपक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारात प्रवरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल…
संगमनेर, प्रतिनिधी – शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि प्रवाशांच्या मनाला प्रसन्नता देणारा इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा ‘हॅपी हायवे’ सध्या विविधरंगी फुलांनी सजला आहे. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा ९ किलोमीटरचा चौपदरी रस्ता केवळ मजबूत बांधकामासाठीच नाही, तर उत्कृष्ट सौंदर्यीकरणासाठी राज्याचा ‘ट्रेडमार्क’ ठरला आहे. या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर गुलाबी, पिवळा, सफेद आणि लाल अशा विविधरंगी फुलांची आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील दाट वृक्षवल्लीमुळे संपूर्ण परिसराला निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा रस्ता प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर अनेक नामांकित महाविद्यालये असल्याने…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप आपल्या खर्चाचा अधिकृत हिशोब न देणाऱ्या १२ उमेदवारांना प्रशासनाने आता अखेरचा इशारा दिला आहे. येत्या २० जानेवारी २०२६ पर्यंत खर्चाचा तपशील सादर न केल्यास, या उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा बडगा उगारला जाणार असून त्यांना कायमचे अपात्र ठरवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कडक नियमांनुसार, प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत झालेला पै-पैचा हिशोब विहित मुदतीत देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, संगमनेरमधील १२ उमेदवारांनी या नियमाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या निवडणूक विभागाने आता शेवटची मुदत जाहीर केली आहे. संबंधित उमेदवारांनी आपला…
अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज बनावट ओळखपत्रांच्या एका मोठ्या प्रकरणाने गालबोट लागले. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्डांचा मोठा साठा बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विद्यालय केंद्रावर मतदान सुरू असताना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. काही उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सतर्कता दाखवत या व्यक्तींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्ड आढळून आली. एकाच व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ओळखपत्रे सापडल्याने उपस्थित…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. निमगावजाळी ते संगमनेर रस्त्यावरील वडगावपान फाटा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबडून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिजाबाई बाळासाहेब सातपुते (वय ६१, रा. पावबाकी रोड, संगमनेर) या १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास आपल्या मोपेड गाडीवरून प्रवास करत होत्या. त्या वडगावपान फाट्याजवळ आल्या असता, एका मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तिथे आले. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने जिजाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत वेगाने ओरबडले आणि दोघेही आरोपी तिथून पसार झाले. या चोरीमध्ये एकूण…
संगमनेर: आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद आता कायमचे बाजूला ठेवा. आता वेळ आली आहे ती फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरण्याची! आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरणार असून, त्या जोरावर सत्तेवर भगवा झेंडा निश्चितपणे रोवला जाईल, असा जोरदार विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संगमनेर तालुक्यात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. जोडीदारासोबतचे जुने मतभेद मिटून संबंधांमध्ये सुधारणा होईल, मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहा, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस फायदेशीर ठरेल आणि जुनी रखडलेली येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तरीही, रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमच्या शब्दांमुळे विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिथुन – आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी प्राप्त होतील. तुमची बऱ्याच…
नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार; दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना गाठून लुटण्याची घटना घडली असून, एका शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचे समोर आले आहे. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही लूटमार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव देपा (ता. संगमनेर) येथील शेतकरी नितीन बाळासाहेब फटांगरे (वय ४६) हे १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास नाशिक ते पुणे महामार्गावरून जात असताना ही घटना घडली. चंदनापुरी घाटातील खिंडीच्या वळणाजवळ पाठीमागून विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉन मोटारसायकलवरून दोन…
