Author: अनंत पांगारकर

संगमनेर – लोक कलावंतांना ‘शासनकृत कलावंत’ म्हणून तातडीने मान्यता द्यावी, त्यांच्यासाठी विशेष योजना लागू कराव्यात आणि त्यांच्या सध्याच्या तुटपुंज्या मानधनात भरीव वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाच्या नेतृत्वाखाली लोककलावंतांनी काल (गुरुवारी, ३० ऑक्टोबर) सकाळी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. लोककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले, यात प्रामुख्याने मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे, कारण सध्या शासनाकडून मिळणारे मानधन अत्यंत कमी आहे. तसेच, मानधनाव्यतिरिक्त लोककलावंतांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय योजना त्वरित राबविण्यात याव्यात आणि त्यांना अधिकृतपणे…

Read More

मेष (Aries) – धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी आणि घरात व्यवस्था राखण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. आर्थिक लाभ होईल, पण अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे लक्ष द्या. वृषभ (Taurus) – दिवसाची सुरुवात नवीन संधी आणि लाभाने होईल. एखाद्या परिचितांकडून मिळालेली बातमी विचार करायला लावणारी असू शकते. आर्थिक व्यवहार सामान्य राहतील. मिथुन (Gemini) – दिवसाची सुरुवात थोडी गोंधळात जाईल, पण दुपारनंतर दिलासा मिळेल. पैशांचा ओघ सामान्य राहील. एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य मिळेल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीसाठी अनुकूल दिवस. कर्क (Cancer) – आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. सिंह (Leo) – आज तुम्हाला मोठी यश मिळण्याची शक्यता आहे.…

Read More

संगमनेर – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आयर्न लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने संगमनेर येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उदात्त हेतूने आयोजित हे शिबिर खऱ्या अर्थाने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणार आहे. हा जीवनदानाचा संकल्प करण्यासाठी, शुक्रवारी (दिनांक ३१ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संगमनेर येथील बस स्टॅन्ड येथे हे रक्तदान शिबिर पार पडेल. रक्तदान हे सर्वात मोठे दान मानले जाते. आपल्या रक्ताने कोणाचा तरी जीव वाचू शकतो, हे सत्य लक्षात घेऊन, राहुल गांधी समर्थक…

Read More

संगमनेर: थोरात कारखान्याने मागील हंगामात दिलेल्या ३२०० रुपये उच्चांकी भावामुळे बाजारपेठ फुलली आणि कामगार, सभासद, ऊस उत्पादक व व्यापाऱ्यांची दिवाळी आनंदात गेली. आपला हेतू चांगला असल्याने थोरात कारखान्याचे काम चांगले होत आहे आणि याचमुळे सभासद व बाहेरील ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारात आदर्शवत ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. थोरात म्हणाले,…

Read More

संगमनेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत झालेल्या संघटनात्मक फेरबदलांनंतर संगमनेर तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान, नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी शिवसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी नव्या जोमाने आणि संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे निर्देश दिले. बुधवारी (२९ ऑक्टोबर) संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख कोते पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसैनिकांनी संपूर्ण तयारीने निवडणुकांसाठी सज्ज राहावे, आणि यावेळी पक्षाकडून संबंधित उमेदवारांना पूर्ण ताकद मिळवून देण्याचे वचन त्यांनी शिवसैनिकांना दिले.  संगमनेर तालुक्यात सध्या शिंदे गटाचे आमदार असल्याने, आगामी निवडणुका वर्चस्वाच्या आणि अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लॉजिंगवर मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.  नेवासे येथील खडका फाट्यावरील साई लॉज येथे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देह व्यापारास (वेश्या व्यवसाय) प्रवृत्त करत लॉजिंगवर जागा उपलब्ध करून त्यांच्याकडून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी आपल्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक…

Read More

संगमनेर – गेल्या आठवड्यात (२४ ऑक्टोंबर) रोजी संगमनेर तालुक्यातील रायते गावातील दळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यांच्या दोन मोटरसायकल आणि शाळेत जाणाऱ्या मुलाची एक सायकल अज्ञाताने जाळून टाकली. वाहनांचे झालेले मोठे नुकसान आणि मुलाच्या सायकलमुळे शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय यामुळे दळे कुटुंब दुःखाच्या गर्तेत होते. या कुटुंबाच्या विशेषत: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मदतीला राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) धावला. क्रॉस व्हील सायकलचे संचालक राहुल वर्पे यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर RGSS ला सायकल उपलब्ध करून देत ही सायकल विद्यार्थ्याला भेट देण्यात आली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी या कुटुंबाची…

Read More

संगमनेर – ऐतिहासिक जैन मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांच्या कथित धोक्याविरोधात राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र या काँग्रेस समर्थक संघटनेने स्तुत्य निर्णय घेतला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी (२८ ऑक्टोंबर) संगमनेरच्या तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करून या पवित्र आणि वारसा स्थळांच्या तात्काळ संरक्षणाची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची विनंती त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. धार्मिक स्थळांच्या संरक्षणाची मागणी थेट राजकीय पक्षाच्या समर्थक संघटनेने आक्रमकपणे केल्यामुळे, आता संगमनेर प्रशासन यावर कोणती तातडीची भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जैन मंदिर हे केवळ एक पूजास्थान नसून ते जैन समाजाच्या…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा चांगली राहील, ज्यामुळे तुम्ही घेतलेले काही निर्णय आश्चर्यकारक आणि फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजूस काही पैसे अडकलेले असल्यास ते मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर संतुलन ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबाचे उत्कृष्ट सहकार्य मिळेल. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवणे टाळा आणि आळस करू नका. वृषभ (Taurus) – आज दिवसाच्या पहिल्या भागात आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण ग्रहमान अनुकूल आहे. करिअरशी संबंधित कामे मार्गी लागतील आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. गुंतवणुकीचा…

Read More

संगमनेर – ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार वाई (सातारा) येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना जाहीर झाला आहे.  आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुरस्काराचे वितरण २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये होणार आहे. या सोहळ्याला उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. आ. खताळ यांनी सांगितले की, कवी अनंत फंदी, स्व. पवळा भालेराव, स्व. गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप आणि स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील कलावंतांना सन्मानित करण्याचा…

Read More