Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात टायगर पॉईंट येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा उर्फ अनिल बादशहा गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे गेल्या दोन वर्षापासून पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकामध्ये कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. वारंवार त्यांना संपर्क करून देखील कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत…
संगमनेर दि. ०७ फेब्रुवारी – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला २८५१ रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय बाजार समितीमध्ये १५०० ग्रेट टोमॅटो आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगमनेर तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीमध्ये ११,६७८ कांदा कोणाची आवक झाली. झालेल्या लिलावामध्ये प्रतिक्विंटलला प्रतिवारीनुसार मिळालेला भाव पुढील प्रमाणे… सुपर गोळा माल – २९११ ते ३०११, एक नंबर कांदा – २४०० ते २८५१, दोन नंबर कांदा – १८०० ते २२०१, तीन नंबर कांदा – ५०० ते १६०० रुपये. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी…
शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी – बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस झांबड शोध घेत होते. अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. २१ जानेवारीला न्यायालयाने झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते पोलिसांना शरण आले. जामीन मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्यांनी अखेरीस पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी आज त्यांना अटक केली आहे. २००६ ते २०२३ या दरम्यान अजिंठा अर्बन बँकेत ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात…
शिवपाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार मुंबई, दि. ०७ : राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ०९ फेब्रुवारीला दोन महिने पूर्ण होतील. पण या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मीक कराड याला ताब्यात घेतले आहे. वाल्मीक कराडवर खंडणीचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. परंतु, या वाल्मीक कराडवर आता धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनीही गंभीर आरोप केले आहेत. वाल्मीकचा हस्तक्षेप हा मुंडेंच्या व्यवसायात किंवा राजकारणातच नाही तर व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा होता का? याबाबतची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे…
महाराष्ट्र ही संत व विचारवंतांची भूमी आहे. देशाच्या राजकारणाला महाराष्ट्राने कायम दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणार्या या भूमीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीचा पाया घालून विकसित महाराष्ट्र निर्माण केला. याच विचारांचा वारसा घेऊन राज्यात कार्यरत असलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्य जनतेचे खऱ्या अर्थाने आश्वासक व महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व ठरले असून सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन १९८५ साली बाळासाहेब थोरात यांनी सर्वात कमी वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली. पाण्यासाठी आग्रह धरताना भंडारदर्याच्या पाण्यावर…
विशेष प्रतिनिधी / मुंबई रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी १७ जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले, तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यापूर्वी एसटीची सारी जबाबदारी ही परिवहन मंत्र्यांकडे दिली जायची.…
संगमनेर दि. ०६ फेब्रुवारी – पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलीस उपविभागाच्यावतीने अकोले व संगमनेर तालुक्यातील शाळकरी मुला-मुलींसाठी सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष कार्यशाळेबरोबरच थेट प्रक्षेपणाद्वारे (ऑनलाइन) देखील यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. कार्यशाळेमध्ये बालकांबाबत घडणारे गुन्हे, त्याचा प्रतिबंध, स्वसंरक्षण, बालकासंबंधीच्या महत्त्वाच्या कायद्यातील तरतुदी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या दृष्टीने करिअरचे महत्त्व, तसेच पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन करण्यात आले. कार्यशाळा अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर विद्यालयामध्ये घेण्यात आली. ऑनलाइन कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने संगमनेर पंचायत समितीचे गटविकास…
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित केला होता. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत या जनता दरबारावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ देखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमात मंत्री शंभुराजे देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनी राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने निर्णय घेतले. सामान्य जनतेला थेट शासनाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार शिवसेनेचे मंत्री बाळासाहेब भवन येथे जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत. या दरबारात नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेण्यात येत असून, प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत केली जात आहे. जनतेच्या समस्या…
संगमनेर, दि. ०६ फेब्रुवारी – निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात. परंतु सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हे जनतेच्या हृदयात असते. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक संजय कळमकर यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे सह्याद्री संस्थेच्या आजी-माजी पदाधिकारी पालक व सेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, डॉ. सोमनाथ सातपुते, साहेबराव कवडे, नानासाहेब गुंजाळ, सिताराम वर्पे, सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य…
