Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. १३ मार्च – गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीओपी मूर्ती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे, जी वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पीओपी मूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून, हा पारंपरिकपणे साजरा करण्यावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून गणेश मूर्तिकार बेरोजगार होऊ नयेत आणि पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवर बंदी घातल्याने गणेश मूर्तिकारांवर बेरोजगारीचे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई हिंदूंनी हिंदूसाठी चालवलेले मटणाचे दुकान असे म्हणून मल्हार मटणाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असं विधान नितेश राणेंनी केलं आहे. मंत्री नितेश राणांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फोडले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांना इतिहास शिकण्याचा सल्ला दिला आहे. इतिहास वाचला पाहिजे, तेव्हाच खरा इतिहास कळेल, अशा कानपिचक्या अजित पवारांनी नितेश राणेंना दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि…

Read More

संगमनेर, दि. १२ मार्च – प्रतिनिधी यावर्षी प्रथमत:च मोठ्या वादाची किनार लाभलेल्या संगमनेरमधील शिवजयंती उत्सवावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अखेर यश आले आहे. वादग्रस्त ठरलेली जागा कोणालाही न देता शिवजन्मोत्सव सोहळा समितीला जोशी स्वीट होम जवळील सुप्रीम पावभाजी सेंटर समोरची जागा तर शिवसेना शिंदे गटाला चंदूकाका सराफ समोरील जागेवर उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाने साजरी केल्यानंतर देखील तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीसाठी पुन्हा एकदा तयारी करण्यात आली होती. तर यावर्षी प्रथमच शिवजन्मोत्सव सोहळा समितीही जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी तयारीला लागले होते. यासाठी त्यांनी प्रशासनाकडे रीतसर अर्ज करत बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराशेजारी…

Read More

संगमनेर, दि. १२ मार्च दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या पाच गुन्ह्यांमध्ये पोलिसांना गुंगारा देणाऱ्या म्हस्के गँगच्या म्होरक्याला संगमनेरमधील गुंजाळवाडीमध्ये नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफिने जेरबंद केले आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी या पथकाने कारवाई केली. आरोपीला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के (वय २९, रा. भालेराव मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड) असे संशयित म्होरक्याचे नाव आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या त्याच्या टोळीला यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या. तर फरार असलेल्या म्होरक्याला पकडण्यात आता यश आले आहे. गेल्या २३ नोव्हेंबर रोजी जय भवानी रोडवरील शकुंतला पेट्रोल पंप परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी पकडली होती.…

Read More

मुंबई, दि. ११ –  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. आमदार देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला. सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगी, नियमांच्या पालनाबाबत तपासणी करण्याची जबाबदारी…

Read More

संगमनेर दि. ११ मार्च – प्रतिनिधी सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (१४ मार्च) सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. अगदी तरुण वयात स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करणारे स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य हे पुढील पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर…

Read More

संगमनेर, दि.११ मार्च – प्रतिनिधी  शिवद्रोही राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, सुधांशु त्रिवेदी, भगतसिंग कोशारी, अबू आझमी, मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच बीड व परभणी जिल्ह्यातील संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी पडलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्यांचे निवेदन मंगळवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवद्रोही असलेले वरील सर्व गुन्हेगार वारंवार स्वराज्य प्रेरिका जिजाऊ, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव आंबेडकर आशा बहुजनांच्या…

Read More

संगमनेर –  नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या कारची त्याच लेनवरुन येणार्‍या आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे पती आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर डोळासणे महामार्ग पोलिसांनी टोल कर्मचार्‍यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि ९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डोळासणे शिवारातील बांबळे वस्तीजवळ ही घटना घडली. सध्या सिन्नर ते खेड या नाशिक-पुणे महामार्ग कॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. साकूर फाट्यापासून पुण्याच्या दिशेने एकाच लेनवरुन दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली आहे. रविवारी दुपारी गिरीश गिरमे (वय ३५) हे त्यांची पत्नी प्राजक्ता (वय…

Read More

संगमनेर, दि. ११ मार्च – प्रतिनिधी  मार्च महिना असल्याने संगमनेर नगर परिषदेची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. पालिकेने लावलेल्या जाचक शास्ती आणि दंडामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून पालिकेच्या तिजोरीत मात्र कोट्यावधी रुपयांची भर पडणार आहे. शास्ती आणि दंडाच्या पठाणी वसुलीमुळे संगमनेरकर नागरिक हैराण झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रश्न मौन बाळगले आहे. सत्ता बदल होऊनही संगमनेरकरांच्या पदरी निराशाच आली आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहे. विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांना संकलित कराच्या दोन पट शास्ती, दंड वसूल केला जात आहे. यामुळे छोटेसे घर बांधून राहणाऱ्या संगमनेरकरांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यातच पालिकेच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठया गाजावाजात सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांना काय मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष होतं. सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी या अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. यामुळे लाडक्या बहिणींची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो.. पुन्हा आलो.. असे म्हणत लाडक्या बहि‍णींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना…

Read More