Author: अनंत पांगारकर
संगमनेर दि. २९- रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना संगमनेर तालुका पोलिसांनी निळवंडे शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इंडिका कारचा पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले तर या कारवाईदरम्यान दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडिका कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. मंगळवारी (दि. २८) पहाटे साडे पाच वाजेच्या तालुका पोलीस स्टेशनचे गस्तीचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये, चालक कोकणे हे मोबाईल पेट्रोलींग करून निळवंडे मार्गे करुन वडगावपानकडे येत असतांना त्यांना समोरून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. एम. एच. २३ ई ६८४७) हि निळवंडे-कवठे कमळेश्वर रस्त्यांने वेगांने…
संगमनेर – नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या संगमनेर शहरातील नवश्या गणपती मंदिर स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश जयंती पासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमुख कार्यकर्ते अमोल डुकरे यांनी दिली आहे. गणेश जयंतीला (शनिवार दि. १ फेब्रुवारी) सकाळी सव्वा सहा वाजता नवश्या गणपतीला महा अभिषेक करून महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पावणे सात वाजता महाआरती व त्यानंतर सात वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अंधकलाकारांचा भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून अमोल डुकरे व परिसरातील…
नागपूर, दि. २९ : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ. राजू हिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री…
मुंबई, दि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असून केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला…
संगमनेर दि. २८- संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी आता विकासाबरोबरच येथील एकजूट मोजण्यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड सुरू केली असून कोणत्याही स्थितीत सत्ताधाऱ्यांचा हा प्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा…
काही रकमेचा दिला परतावा… नंतर मात्र केली फसवणूक नाशिक – मोठी गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतवा देण्याचे आमिष दाखवत काही भामट्यांनी नाशिक शहरातील वृद्धाला तब्बल ३६ लाखाला गंडविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला काही रकमेचा परतवा देत विश्वास संपादन केला होता. या विश्वासातून भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हरी शिंपी (वय ७२, रा. गजानन दर्शन सोसायटी, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलका गोरे (रा. बर्डे नगर, आडगाव नाका) व हिरामण भामरे (रा. समर्थ नगर, इंदिरानगर) या ठकबाजी करणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शिंपी यांचा…
संगमनेर दि. २८- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्री बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे. येथे संरक्षण ड्युटीला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चौघांनी दमबाजी, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी (दि.२७) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच तक्रार देण्यासाठी तब्बल सहा तास थांबावे लागले. एवढे होऊनही घारगाव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस ठाण्यातच पोलिसाला आलेल्या अनुभवाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. यांच्या विरोधात तक्रार – सचिन वैष्णव (गाव माहीत नाही), फॉरेस्ट अधिकारी (गाव, पत्ता माहीत नाही) व इतर दोघे अशा एकूण चार जणांविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर (नेमणूक, पोलिस…
संगमनेर दि. २८- नासिक-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारला संगमनेर तालुक्यात बोटा गावाजवळ असलेल्या माळवाडी शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील रहिवासी असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला असून अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन वसंतराव दरेकर (वय ५७), रमा सचिन दरेकर (वय ५३) अशी अपघातात मृत झालेल्या पती-पत्नीच नाव आहे. तर सीमा देशमुख नावाची महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातातून आणखी एक जण बचावला आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पुणे शहरातील गुरुवार पेठेतील दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर, रमा सचिन…
डेहराडून – २०२२ मध्ये उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे दिलेले आश्वासन भाजपने सोमवारी पूर्ण केले. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिलेच राज्य ठरले आहे. या कायद्यांतर्गत सर्व धर्म व जातींसाठी एकच कायदा असेल. ज्या मुला-मुलींना ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे असेल त्यांना त्याची नोंदणी ‘रजिस्ट्रार’कडे करावी लागेल. त्यानंतर त्यांना पालकांची परवानगी आवश्यक ठरणार आहे. तसेच ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याला जर मूल झाले तर ते कायदेशीर मानले जाईल, आदी तरतुदी या समान नागरी कायद्यात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी खास पोर्टल तयार केले आहे. यात लग्नाची नोंदणी,…
मुंबई, दि. २८ : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक सोमवारी (२७ जानेवारी) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक…
