Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रतिनिधी  शनिवार, २३ नोव्हेंबर राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या चार दशकांपासून आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या होम स्पीचवर पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे नवखे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव केला आहे. राज्यातील बऱ्या नेत्याचा पराभव करणारे खताळ या मतदारसंघात अखेर गेमचेंजर ठरले. थोरात यांचा पराभव संगमनेरकरांसाठीच नव्हे तर राज्यातील काँग्रेससाठी धक्कादाय ठरला असून गेल्या चार दशकानंतर प्रथमता विरोधकांना या मतदारसंघात मिळालेले यश थोरात यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा…

Read More

शनिवार 23 नोव्हेंबर – शिर्डी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 6332 मतांनी आघाडीवर आहेत. विखे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांनी तिसऱ्या फेरी अखेर 12886 तर विखे यांनी 19218 मते मिळविली आहे. तर बंडखोरी केलेल्या डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी तिसऱ्या फेरी अखेर 136 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे राजू शेख यांनी 146 मते मिळविली.

Read More

शुक्रवार, २२ नोव्हेंबर – अहिल्यानगर  बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी लागत आहे. दरम्यान या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केल्याचे समोर येऊ लागले आहे. निवडणूक कामासाठी नेमलेल्या भरारी पथकांनी देखील कोट्यावधी रुपये, सोन्याचे दागिने पकडले असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बस मध्ये दुसऱ्या दिवशी प्रवाशांना बसच्या सीट खाली पाचशे रुपयांचे दोन नोटांचे बंडल आढळून आले. नोटांच्या मोजणीनंतर तब्बल ८६ हजाराची रोकड असल्याचे समोर आले असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव एसटी आगाराच्या कोपरगाव-वैजापूर-कोपरगाव आशा फेऱ्या मारणाऱ्या एसटी बसमध्ये सीटखाली प्रवाशाला पाचशे रुपयांच्या नोटांची दोन…

Read More

शुक्रवार २२ नोव्हेंबर – संगमनेर  बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी उद्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८.०० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडासंकुल येथे होणार आहे. २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत असून पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी “महाराष्ट्र संवाद न्यूज”ला दिली आहे. संगमनेर मतदार संघाचा निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहे. बुधवारी एकुण २८८ मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडली. मतदान प्रक्रियांमध्ये कोणताही अनुचित प्रकार समोर आला नाही. १४७ मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून वेबकास्टिंग करण्यात आले. यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या रांगा व मतदान केंद्रातील तसेच…

Read More

शुक्रवार, २२ नोव्हेंबर – ठाणे  उल्हासनगर कॅम्प ५ मधील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या कचरा पट्टीतील झाडाझुडपात एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात राहत होती. १८ नोव्हेंबर रोजी मृत मुलगी…

Read More

शनिवार, २२ नोव्हेंबर – बीड  बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाने वर्षभरातच तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे या दोघांवर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही कारवाई केली असून लाच…

Read More

शुक्रवार, २२ नोव्हेंबर – पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर आज (२१ नोव्हेंबर) दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १० ची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १७ मार्च २०२५ रोजी संपेल. दहावीची परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. इयत्ता १२ वी सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल…

Read More

गुरुवार २१ नोव्हेंबर – संगमनेर  बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी समोर आलेल्या या आकडेवारीत संगमनेरमध्ये ७५.१९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात मोठी वाढ झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात १,४८२८४ (पुरुष), १,४०,८८९ (महिला) व १ (अन्य) असे एकूण २,८९,१७४ इतके मतदान होते त्यापैकी बुधवारी झालेल्या मतदानानंतर १,१४१८२ (पुरुष), १,०३,२५० (महिला) व ० (अन्य) अशा एकूण २,१७,४३२ इतक्या मतदारांनी मतदान केल्याचे…

Read More

गुरुवार, २१ नोव्हेंबर  विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यभरात मतदान झाले. यावेळी मतदान केंद्रात बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन जात मतदान करतानाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपळे निलख येथील विद्या विनयनिकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४७४ या मतदान बुथवर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. मार्टिन जयराज स्वामी (वय २५, रा. संध्यानगरी सोसायटी, पिंपळे निलख) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात निवडणूक मतदान केंद्र अधिकारी नरेंद्र देशमुख (वय ५४, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मतदान बुथवर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून कर्तव्य करीत होते. यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणूक विशेष  गुरुवार २१ नोव्हेंबर  बुधवारी राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. शनिवारी राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज बघता राज्यात सत्ता स्थापनेसाठी मोठा संघर्ष दिसत आहे. सरकार स्थापनेसाठी दावा करण्याकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असल्याने आणि या दोन दिवसात सत्ता स्थापनेत दिरंगाई झाल्यास राज्यात दबक्या पावलांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे आहेत. अनेक आजी-माजी आमदार, मंत्र्यांकडून तसेच राजकीय विश्लेषकांकडून ही शक्यता वर्तवली जात आहे. असे घडल्यास राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी होणारा अपक्ष आमदार आणि फोडाफोडीच्या खोक्यांचा घोडेबाजार जनतेला बघावा लागणार आहे. त्यामुळे विधानसभेचा…

Read More