Author: अनंत पांगारकर
संगमनेर प्रतिनिधी – मोहसीन शेख गो शाळेच्या मॅनेजरने बजरंग दलाच्या तिघांच्या मदतीने जनावरांची चौकशी करण्यासाठी गो शाळेत गेलेल्या तिघा जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडी दांडक्याने तसेच लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकारामुळे रात्री रुग्णालय परिसरात व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. अधिक माहिती अशी, फिर्यादी रोहित खलील कुरेशी, त्याचा चुलत भाऊ अरबाज जलील कुरेशी व मित्र फैसल शेख हे तिघेजण गुरुवारी (३० जानेवारी) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायखिंडी येथे…
अहिल्यानगर दि. ३१- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या शौर्याची चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती युवापिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गुरुवारी (३० जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. अहिल्यानगर पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सांस्कृतिक कार्य…
संगमनेर दि. ३० – सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र काही लोक संगमनेर मोडण्याचे षडयंत्र करत आहे. आश्वी बुद्रुक अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. संगमनेर तालुक्याचे विभाजन करत दोन तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयाच्या कार्य कक्षेत संगमनेर शहरालगतची गावे राजकीय हेतूने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यावरून संगमनेर तालुक्यात वाद निर्माण झाला आहे. नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयात…
संगमनेर दि. ३०- विना तारखेचे आणि संगमनेरच्या तहसीलदारांच्या बिना सहीचा आश्वी अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संगमनेरात मोठी खळबळ उडाली होती. अनेकांना अंधारात ठेवून हा प्रस्ताव थेट वरपर्यंत धडकल्याचे समोर आल्याने तालुक्यात पडद्याआडून खेळी करणाऱ्यांविषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालयापुरता मर्यादित राहिलेला नाही, आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे पुरावे बाळासाहेब थोरात यांनी दाखविले. थोरात यांनी संबंधितांच्या सहीचेच प्रस्ताव दाखविल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती देखील समोर आली आहे. अवघ्या चार ते पाच दिवसात संगमनेर तोडण्याचा कुटील डाव…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रात प्रवास सुखकर होण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता परिवहन विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार आहे. ओला, उबेरसारखेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, पुढील दोन महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्विस सुरू होणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि स्वस्तात होणार असल्याचे सांगितले जात आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई लोकल, बेस्ट बस, मुंबई मेट्रो, टॅक्सी, रिक्षा असे पर्याय असतानाही मुंबईकरांना…
संगमनेर दि. ३० – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षणाशिवाय सुरू असलेली ही भारतीय प्रक्रिया थांबविण्याची मागणी संगमनेर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने आमदार खताळ या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. हिरालाल पगडाल, के. जी. भालेराव, राजाभाऊ अवसक, ॲड. किरण रोहम, सिताराम राऊत, अरुण ताजने, सूर्यकांत शिंदे, अरविंद सांगळे, प्राध्यापक बाबा खरात, विकास वाव्हळ, विश्वनाथ आल्हाट, हनुमंत उबाळे, सुखदेव मोहिते, ज्ञानेश्वर राक्षे, मनोज उपरे, संजय दारोळे, प्रशांत गायकवाड, अंतोन घोडके, दिलीप पराड, डॉ. दानिश खान, अमोल जगताप,…
अहिल्यानगर दि. ३०- दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हीईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जगण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.
मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज. जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालयाचे (सायन) अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (मुंबई) माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय…
मुंबई दि. २९- नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री व तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळविला आहे. मात्र राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील ही सर्व कामे रखडवून ठेवली आहेत. रस्ते दुरुस्तीसह रखडून ठेवण्यात आलेल्या सर्व कामांना तात्काळ गती देण्यात यावी या मागणीसाठी तांबे यांनी भोसले यांची भेट घेतली. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी निधी दिला. अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. परंतु मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर…
संगमनेर दि. २९- रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना संगमनेर तालुका पोलिसांनी निळवंडे शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इंडिका कारचा पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले तर या कारवाईदरम्यान दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडिका कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. मंगळवारी (दि. २८) पहाटे साडे पाच वाजेच्या तालुका पोलीस स्टेशनचे गस्तीचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये, चालक कोकणे हे मोबाईल पेट्रोलींग करून निळवंडे मार्गे करुन वडगावपानकडे येत असतांना त्यांना समोरून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. एम. एच. २३ ई ६८४७) हि निळवंडे-कवठे कमळेश्वर रस्त्यांने वेगांने…
