Author: अनंत पांगारकर

मेष – आज तुमच्याकडून होणारे काम कौतुकास पात्र ठरेल. धनस्थानातील गुरु हर्षल युतीमुळे आर्थिक समस्या सुटेल. वृषभ –  आजचा दिवस खर्चिक असेल. मुबलक पैसा हाती येईल परंतु खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. मिथुन –  आज आपल्या संतापावर नियंत्रण ठेवा. आर्थिक घडी विस्कटत चालल्याने आपली चिडचिड वाढेल. सांभाळा, मित्र धरून ठेवा. कर्क – नाही म्हणायला शिका, म्हणजे फसगत होणार नाही. आज वादावादी केल्याशिवाय पैसा मिळणार नाही. सिंह – प्रवास करू नका, खर्च वाढेल. जोडीदार संयमाची भूमिका बजावेल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. कन्या –  कोर्ट कचेरीच्या खेपा वाढविणारा दिवस. मित्रमंडळी पासून दूर राहा. तुळ – सप्तमेश शुक्र केतूच्या युतीमध्ये आहे. आपल्या…

Read More

शनिवार, दि.३१ ऑगस्ट  अहमदनगर – श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होण्याकरिता १० हजार रूपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक राहील. लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहावयास मिळतील. लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार तहसील कार्यालयाने राखून ठेवला आहे. लिलावात सहभाग घेण्याकरीता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैध परवानाधारकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी केले आहे.

Read More

शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट  अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत ५३ हजार ८३० मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ३३ हजार ५१४ पेक्षा अधिक आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमाआधी…

Read More

शुक्रवार, ३० ऑगस्ट  राज्य सरकार कर्जाच्या डोंगराखाली असल्याचे स्पष्ट करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह मोफत लाभ अदा करणाऱ्या विविध योजना विरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. २०२२-२३ मध्ये राज्यावर ६ लाख २९ हजार २३५ कोटीचे कर्ज होते. २०२३-२४ मध्ये या कर्जाच्या रकमेत १३ टक्के वाढ होऊन ते ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपयांवर गेले. २०२४-२५ मध्ये कर्जाची ही रक्कम ७ लाख ८२ हजार कोटींवर जाऊ शकते, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्याने राज्याची बिकट झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अशा योजना संदर्भातील निर्णय असंवैधानिक, मनमानी व तर्कहीन घोषित…

Read More

शुक्रवार, ३० ऑगस्ट संगमनेर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष देवराम पवार यांची तलाठी कार्यालयात निघृणपणे हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या संगमनेर शाखेच्यावतीने गुरुवारी (२९ ऑगस्ट) काम बंद ठेवत निषेध करण्यात आला. संघटनेच्यावतीने तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी संगमनेर शाखेचे अध्यक्ष गणेश शिंदे, कार्याध्यक्षा योगिता शिंदे, उपाध्यक्ष अनिल कुंदेकर, सरचिटणीस बाबासाहेब नरवडे, सह सरचिटणीस संग्राम देशमुख, खजिनदार रोहिणी कोकाटे, हिशेब तपासणीस भीमराज काकड, संघटक प्रशांत हासे, सदस्य पोमल तोरणे, विक्रम ओतारी, अनिल आव्हाड, भालचंद्र वैद्य, आर. एम. मुळे, संतोष लंके, डी. बी. भालचिम, डी. ए. शेख, महिला प्रतिनिधी मंगल…

Read More

असा असेल आजचा दिवस मेष – मेष राशीचे लोक प्रिय व्यक्तीशी भांडण करू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्यासाठी नाते येऊ शकते. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना लवकरच नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आज, आपण बऱ्याच काळापासून आपली नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत होते, ती संधी आज आहे. आज आपण आपल्या व्यवसायात नवीन योजना लागू करू शकता, जी आपल्याला भविष्यात उत्कृष्ट परिणाम देईल. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आज अति गोड लोकांपासून सावध राहा, हे लोक तुमची फसवणूक करू शकतात. कोणत्याही भांडणापासून स्वतःला दूर ठेवा.…

Read More

शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट  मुंबई – आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पेसा क्षेत्रातील भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी उशिराने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पेसा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिक येथे उपोषणास बसलेल्या जे. पी. गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदिवासी बांधवांचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी…

Read More

गुरुवार, दि. २९ ऑगस्ट  मुंबई : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने आज…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट  मुंबई – गृह विभागाने गुरुवारी राज्यातील सात पोलीस उपाधीक्षकांच्या बढतीवर बदल्या केल्या आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा यात समावेश असून त्यांची बदली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५, दौंड येथे समादेशक म्हणून झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षक, पोलीस उप आयुक्त (असंवर्ग) पदावर या अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. या संबंधीच्या आदेश गुरुवारी शासनाचे अपर सचिव संदीप ढाकणे यांनी काढले आहेत बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात मिळालेली पदोन्नती)… नरसिंग पंचम यादव (नियंत्रक, नागरिक संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई)  सोमनाथ फकीरा वाघचौरे (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक…

Read More

गुरुवार दि.२९ ऑगस्ट  अहमदनगर : संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ‘चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८’ हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.…

Read More