Author: अनंत पांगारकर

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील चौकशीच्या अहवालांनी आता राज्यातल्या जनतेची मतीच गुंग होऊ लागली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एकीकडे अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल मौन साधून तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रोहित पवारांना खोटं पाडण्याकरता कामाला लागले आहेत.  रोहित पवार यांनी पुराव्यानिशी व्यक्त केलेल्या संशयाने अपघाताची जागा घातपाताने केव्हाच घेतली आहे. पण तो घातपात नाही, असं म्हणणारे ना स्वत:हून याचा खुलासा करत ना त्यांच्या यंत्रणेकरवी तपास करत. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताची अशी स्थिती होणं हे अजिबात स्वीकारार्ह…

Read More

दैनिक राशिभविष्य: १५ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, विशेषतः जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, तरीही आहारावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वृषभ आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन ओळख निर्माण होईल, परंतु घाईघाईने कोणतेही वचन देऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे कल राहील. जोडीदाराशी संवाद साधताना संयम…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी शिबिराचा १४३ जणांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली. धावपळीची जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि असंतुलित आहार यामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्वतंत्र विभाग करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर पार पडले. एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त…

Read More

अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त ७३ पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा १५ मार्च २०२६ रोजी नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत होणार होती, मात्र आता ती त्याच दिवशी म्हणजे रविवारी दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ही लेखी परीक्षा ‘न्यू कॉमर्स बिल्डिंग, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल गेट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर’ या केंद्रावर पार पडणार आहे. परीक्षेच्या बदललेल्या वेळेनुसार उमेदवारांनी परीक्षेच्या दोन तास आधी म्हणजेच दुपारी २.०० वाजेपर्यंत…

Read More

अहिल्यानगर: न्यायालयातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे अल्पावधीत निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विशेषतः तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सामंजस्याने तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित पक्षकार आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-३…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसंग्रामात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी उडी घेणारे आणि आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा व मनाचा सच्चेपणा जपणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाज विकासासाठी झटणारे एक ‘कृतीशील संत’ होते, असे गौरवपूर्ण उद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, अमेय प्रकाशाचे उल्हास लाटकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या…

Read More

मुंबई: राज्यातील बळजबरीने, आमिष दाखवून आणि फसवणुकीद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना कायमचा लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ सादर केले असून, यामुळे बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील १० वे राज्य ठरणार आहे. राज्यात गेल्या काही काळात प्रलोभने आणि फसवणुकीतून धर्मांतर केल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा मुद्दा सरकारने अधोरेखित केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या दोषी व्यक्तीने पुन्हा असाच अपराध केला,…

Read More

आजचे सविस्तर राशिभविष्य: शनिवार, १४ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा प्रभाव पडेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ योग्य आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. ​वृषभ आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फलदायी ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील, ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल. जवळच्या नातेवाईकांशी असलेले मतभेद मिटतील आणि घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. संध्याकाळचा वेळ मित्रपरिवारासोबत आनंदात जाईल. ​मिथुन आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. मनातील द्विधा अवस्थेमुळे…

Read More

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरातून बेपत्ता असलेल्या वृद्ध पित्याचा त्यांच्याच मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय चाणाक्षपणे तपास करत या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील बापू आनंदा गाढवे (वय ६०) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश बापू गाढवे यानेच मिरजगाव पोलीस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुका व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले कनेक्शन या मुद्द्यांवरून आक्रमक होत युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण विभागाच्या कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यभरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवेळी आणि कमी दाबाने वीज मिळत असल्याने सिंचनासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापूर, खांडगाव यांसारख्या अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने…

Read More