Author: अनंत पांगारकर
बुधवार, ०७ ऑगस्ट सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक, उपयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या समावेश असून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई या शहरातील अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात बदलीचे ठिकाण… ★ संदीप पालवे – पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजी नगर (पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) ★ संदीप भाजीभाकरे – पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबई (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर) ★ विवेक विठ्ठल मासाळ – समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १३, गडचिरोली…
गणेश कारखान्याला कर्ज नाकारणाऱ्या जिल्हा बँकेविरोधात सभासदांचा हल्लाबोल, सोमवारी काढणार निषेध मोर्चा
मंगळवार, ०६ ऑगस्ट राहाता – सलग दुसर्या हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेने राजकिय दबावापोटी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे कर्ज नाकारले, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभासद व शेतकर्यांच्यावतीने जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अॅड. नारायणराव कार्ले पाटील यांनी दिली. या आंदोलना बाबतचे निवेदन सर्व संबंधितांना पाठविल्याचे सांगत अॅड. कार्ले म्हणाले, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला मागील हंगामात जिल्हा सहकारी बँकेने ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते. तसे पत्रही जिल्हा बँकेने कारखान्याला दिले होते. परंतु मंजुर केलेले कर्ज राजकिय सुडबुध्दीने बँकेने नाकारले.…
मंगळवार, ०६ ऑगस्ट उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायीनी ठरलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून दुष्काळग्रस्त भागाला पाणी देताना सर्व बंधारे भरून द्यावे, मागणी काँग्रेस नेते निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. थोरात यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरणाची निर्मिती दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणार आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने लाभ क्षेत्रातील ओढे नाले…
मंगळवार, ०६ ऑगस्ट दोन सख्या अल्पवयीन बहिणींना कळवण्यात त्यांच्यावर अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी २५ वर्ष सक्तमजुरी आणि साडेसात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धनंजय सखाराम राजीवडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून पुण्याच्या वारजे येथे ४ आणि ५ एप्रिल २०१५ रोजी घडलेल्या या या प्रकाराशी संबंधित खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश या साळुंखे यांच्या न्यायालयासमोर सुरू होती. पीडित अल्पवयीन बहिणी वारजे येथे राहणाऱ्या मामाकडे आल्या होत्या. त्यावेळी आरोपी धनंजय राजीवडे त्याने दोन अल्पवयीन मुलांची मदत घेत त्यांच्या मदतीने या १४ आणि १६ वर्षे वयाच्या बहिणींसोबत लग्न करतो असे आमिष दाखवत त्यांना प्रेमाच्या…
नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मंगळवार, ०६ ऑगस्ट आगामी काळात पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाह क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी इमारतीच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये पूर परिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.…
मंगळवार, ०६ ऑगस्ट बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे डी. के. मोरे जनता विद्यालय शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास विरोध करतात आणि विद्यार्थ्यांना मारतात, असे शाळेतील विद्यार्थ्यांकडून समजल्याने शाळेच्या गेटवर आंदोलन करत निवेदन देण्यात आले. हिंदू संस्कृतीचा शाळा अनादर करत असून कपाळावरील गंधामुळे एकाग्रता वाढवणे, शितलता प्रदान करणे, असे अनेक वैज्ञानिक फायदे यात आहे. महाराष्ट्र सरकारचा शाळेत टिळा लावण्यांचा अध्यादेशही पारीत आहे. शाळा ही विद्येचे मंदिर आहे. त्या मंदिरात कपाळावर गंध लावण्यास विद्यार्थ्यांचा हक्क आहे. त्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाही. गंध लावण्यास विरोध करू नये. केल्यास आपल्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा या निवेदनातून…
लहानपणी आई डबा करून दयायची पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलेव की खूप वाटायचं. आपणही खावं पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं. मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली. लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले. सुती कपडे महाग झाले. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले. लहान होतो…
सोमवार, ०५ ऑगस्ट पुणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरीता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, सिद्धार्थ…
सोमवार, ०५ ऑगस्ट अहमदनगर – कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी राज्यशासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इत्तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. २०२४-२५…
सोमवार, ०५ ऑगस्ट अज्ञात व्यक्तीने घराच्या पडवीत झोपलेल्या सत्तर वर्षे वयाच्या वृद्धाचा डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालत खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. साहेबराव भिमाजी उनवणे असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे गावात ही घटना घडली असून या वृद्धाचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल करण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. साहेबराव उनवणे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून घराबाहेर असलेल्या पडवीमध्ये झोपले होते. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खुनाचा हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. सकाळी घराबाहेर आलेल्या उनवणे यांच्या सुनेला ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्याने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. उनवणे…
