Author: अनंत पांगारकर

रविवार, ०६ ऑक्टोबर मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागण्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे मंजू प्रेम गुप्ता (३० वर्षे), अनिता गुप्ता (३९ वर्षे), प्रेम गुप्ता (३० वर्षे), परीस गुप्ता (७ वर्षे), नरेंद्र गुप्ता (१० वर्षे) अशी आहेत. समोर आलेली माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यात ७ वर्षांच्या आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश शनिवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीसाना दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी.…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर निवडणुका आल्या की लोकांच्या भावनेला हात घालायचा हा उद्योग आजचा नाही. लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी बेकामी नेत्यांना असे निर्णय हे घ्यावेच लागतात. मात्र अशा निर्णयांची स्वत:ला शुचिर्भूत मानणारे री ओढतात तेव्हा त्याची चिंता अधिक वाटते. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी सुरू झालेली १५०० रुपये जमा करण्याची योजना असो वा ६० वर्षांवरील ज्येष्ठाला तीर्थक्षेत्राचं दर्शन असो. जे काम एखाद्या संस्थेने करायचं ते सरकार करू लागल्याने शासन म्हणून गाडा चालायचा कसा, असा साधा प्रश्‍न आहे. बहिणींना काहीही न करता १५०० रुपये देण्याच्या निर्णयाने राज्याच्या तिजोरीवर सुमारे ३५ हजार कोटींचं ओझं निर्माण होऊनही सरकारला आपण काही गैर करतो, असं वाटत नसेल तर…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी वेळ काढा. तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगा. व्यावसायिक जीवनात सक्रिय व्हा. बचतीवर भर द्या. अनावश्यक खर्च करू नका. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. सुख समृद्धी येईल. तुमचे मनोबल उंच राहील. व्यवसायात गुंतवणुकीची चांगली संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि आनंदी राहतील. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थितीची चिंता आहे, परंतु यावेळी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. जास्त उत्तेजित होऊ नका. कोणत्याही प्रकारची जोखीम न घेण्याचा प्रयत्न करा. गोष्टी समजून घ्या आणि मग प्रतिसाद द्या.…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर नाशिक – दररोजच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच या गुंडाराजची प्रचिती गुन्हे शाखेच्या अंमलदाराला आली आहे. आता चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास पकडत असताना त्यांनी अंमलदाराच्या पोटात चाकू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७ वर्ष, रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) असे हल्ला झालेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदाराचे नाव असून विकी संजय जाधव उर्फ गट्ट्या (रा. अवधूतवाडी, पंचवटी) असे हल्लेखोर संशयिताचे नाव आहे. संशयित विकी जाधव हा हातात चाकू घेऊन शुक्रवारी रात्री अवधूत वाडी परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवत होता. रस्त्याने जाणाऱ्या अंमलदार सोनवणे यांनी हा प्रकार…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर मुंबई – राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या अनुदानाचे १२९ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. राज्यभरात पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहे. कापूस…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – चोरी गेलेले दागिने मोबाईल परत मिळतील याची कोणतीही आशा उरली नसताना संगमनेर शहर पोलिसांनी मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेले मोबाईल शोधत ते मूळ मालकांना परत करण्याची दिलासादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारे मोबाईलचा शोध घेत ते परत करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात देखील सुरू आहे. मोबाईल गहाळ होण्याच्या तसेच चोरी जाण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे चोरी जाणाऱ्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपाधीक्षकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाला दिले होते. संगमनेर…

Read More

सण, उत्सवात दागिने घालणे पडतेय महागात… शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण लंपास करण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे उत्सवानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कांता भानुदास शिंदे (वय ५८ वर्ष, रा. आनंदनगर कॉलनी, मालदाड रोड पूर्व, संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी (४ ऑक्टोंबर) संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे…

Read More

सुसंस्कृत संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय? शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – संगमनेर शहरात पडद्याआडचे कॅफे कल्चर वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग घडले आहेत. अशा बेकायदेशीर कॅफेमधून अल्पवयीन मुलींसह युवतींवर देखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असले तरी संगमनेरात असे उद्योग सुरूच असल्याचे उघड होत आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या या कारवाईचा माध्यमांना पोलिसांनी सुगावादेखील लागू दिला नाही. शहराच्या कुठल्या आडवाटेला अथवा निर्जन ठिकाणी ही घटना घडली नसून शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीत गणेश नगर परिसरातील (अगदी महामार्गावर) घडली. ‘गोंधळ मिसळ’ या दुकानातील एका छुप्या कॅफेवर तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला आणि त्या…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  शनिवार, दि. ०५ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांचे आरोग्य आज चांगले राहील. घर बदलण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेम संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका. आज तुमचे मन नवीन कल्पनांनी भरलेले असेल आणि तुम्ही ठरवलेले काम तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी आज प्रेम, आशा, सहानुभूती, सकारात्मकता आणि निष्ठा यांसारख्या सकारात्मक भावना अंगीकारण्यासाठी स्वतःला प्रेरित केले पाहिजे. जेव्हा हे गुण तुमच्यात खोलवर रुजले जातात तेव्हा ते नैसर्गिकरित्या प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकपणे प्रकट होतील. मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील आणि फायदेशीर सिद्ध होतील. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळा. मानसिक शांतीसाठी अशा कामांपासून दूर राहणे आवश्यक…

Read More