Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्या आणि मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात भविष्यातही यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी व शहर प्रमुख अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी साडेचार वाजता शिवसैनिकांनी एकत्र येत खासदार वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी खासदार वाकचौरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी…
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी गद्दारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी अखेर दिल्लीत लोटांगण घातले आहे. यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश असून, त्यांनी आपल्या दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या फुटीर खासदारांनी काल रात्रीपासूनच दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला तात्काळ मंजुरी दिली असून, आता हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. काल रात्रीपासूनच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुधीर श्रीराम डागा, श्रीनिवास फूलचंद भंडारी आणि गोरख वसंतराव कुटे हे तिघे कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. संघटनेत संगमनेरमधून दोघांची वर्णी लागली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निकालांनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तिन्ही नेत्यांची निवड बिनविरोध झाली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे निकाल आणि विजयी उमेदवारांची नावे – अध्यक्ष: सांगली जिल्ह्यातील रवींद्र परिसा माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष: मुंबईतून करुणाकर शेखर शेट्टी हे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: शहरात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार चॉपर आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने १६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने जर्मन हॉस्पिटलच्या मागे, पाण्याच्या पाटाजवळ सापळा रचला होता. तिथे संशयास्पदरित्या थांबलेल्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता हा बेकायदेशीर हत्यारांचा साठा उघडकीस आला. या कारवाईत पोलिसांनी नाझीम अन्वर पठाण (वय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे धास्तावलेल्या व्यापारी वर्गाकडून मुंढे यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. बदलीच्या चर्चेवरून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर दररोज कठोर कारवाई करून कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. पूर्वी मनुष्यबळाची कमतरता सांगणारा हा विभाग आता अत्यंत सक्रिय झाला असून, नुकतीच पुण्यात साडेपाच हजार किलो आंबे आणि भेसळयुक्त आमरस नष्ट करण्याची मोठी कारवाई करण्यात आली. सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे त्यांना वारंवार बदलीला सामोरे जावे लागते. याचबरोबर सरकारकडून…
आजचे राशिभविष्य मेष- आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या चिंता आणि तणावातून मोठा दिलासा मिळेल. महत्त्वाची रखडलेली कामे नातेवाईकांच्या सहकार्याने मार्गी लागतील आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून उत्तम मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील, मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. वृषभ- आज कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून दैनंदिन कामे विनाअडथळा पूर्ण होतील, परंतु खरेदी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” अशी घोषणा करणारे अभिजित दिपके यांच्यावरील हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा थेट आरोप स्वतः दिपके यांनी केला आहे. ज्यांनी हल्ला केला, त्या संघाशी संबंधित हल्लेखोरांना संघाची फूस होती, असे दिपके यांनी म्हटले आहे. अभिजित यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयपूरनंतर मंगळवारी नागपुरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अभिजित म्हणाले, “सोमवारी माझ्यावर हल्ला झाला. माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ६ जूनला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते, तेव्हाच आम्ही अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: येथील सत्यशोधक विचारमंचच्या वतीने सुरू असलेल्या व्याख्यानमालेत शनिवारी (२० जून) प्रसिद्ध राजकीय विश्लेषक हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडताणी कॉम्प्लेक्समधील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. या व्याख्यानाचा मुख्य विषय ‘झुंजायच्या गोष्टी (सात हुतात्म्यांची झुंज)’ असा आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एका ओळीवरून हे शीर्षक घेण्यात आले असून, आपल्या विचारांसाठी आणि निष्ठांसाठी संघर्ष करताना ज्या मान्यवरांनी प्राणांची आहुती दिली अशा सात थोर व्यक्तींची संघर्षगाथा हनुमंत पवार या व्याख्यानातून मांडणार आहेत. संगमनेर आणि परिसरातील नागरिकांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रामराज्य हे केवळ शस्त्राच्या बळावर उभे राहत नसून, त्यासाठी शास्त्र, संस्कार आणि सदाचाराचा भक्कम आधार आवश्यक असतो. तसेच कोणतेही धर्मकार्य यशस्वी करण्यासाठी माणसाकडे दृढ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले आहे. गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सुमारे सात लाख भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे, कथेच्या सांगतेनंतर महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अधिक मासातील आठव्या पर्वाचे औचित्य साधून आयोजित या रामकथेच्या अंतिम सत्रात ढोक महाराजांनी आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीतून रामायणातील युद्धकांड आणि रामराज्य स्थापनेचे…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत दिवस प्रगतीचा असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. अडकलेली कामे गतीने पुढे सरकतील आणि व्यावसायिक क्षेत्रात धनलाभाचे उत्तम योग आहेत. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सम्मान वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. मानसिक शांतता…
