Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेरमधील प्रसिद्ध वकील शरीफखान रशीदखान पठाण आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रात्री शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर नुरमुहम्मद शेख व आशफाक इब्राहिम पटेल अशी हल्लेखोर आरोपींची नावे आहेत. पठाण यांनी आरोपी सादिक रज्जाक शेख याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केलेली चोरीची तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींकडून वकिलावर दबाव आणला जात होता. याच कारणातून शुक्रवारी सकाळी आरोपींनी ॲड. पठाण व त्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर (दि. १५ डिसेंबर) -राज्यातील प्रतिष्ठेची व नावाजलेली, क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागून असलेली सहकार महर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे युवा आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात १ ते १७ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडतील. यंदाचे वर्ष भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातील निवडक ३२ संघांना या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर –  अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुरुवारी दुपारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या दोघांना बाजूला घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी देखील मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईत अडथळा करीत दोघाजणांनी त्यांच्या अंगावर कागदाचा गठ्ठा भिरकावत धावून जात “तुझे देख लुंगा, मै फिर यही दुकान लगाऊंगा” अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारिज एजाज शेख उर्फ साऱ्या (दोघे रा. लखमीपुरा, संगमनेर) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दूध दरवाढीसाठी आणि कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याच्या मागणीकरिता शिवसेना (उबाठा) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन होत आहे. शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर) कोल्हार येथे दूध दरवाढ आणि सरकारने कांद्यावर लाभलेले निर्यात बंदी हटविण्यासाठी दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या व शिवसैनिकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट, अशोक सातपुते, शहर प्रमुख आपा केसेकर, शहर संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, तालुकाप्रमुख (पठार भाग) संजय फड, गुलाब भोसले, समीर ओझा, योगेश बिचकर, बाळासाहेब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम विमानतळावर जात असताना सीपीआय(एम) ची विद्यार्थी शाखा ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या काही लोकांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. यावरून आपल्याला मारण्यासाठी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी गुंड पाठविल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे. यामुळे केरळमध्ये राजकीय गोंधळ वाढला आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यातील संघर्ष देखील वाढला आहे. अपघातानंतर कारमधून लगेचच बाहेर आलेल्या राज्यपालांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. आपल्याला शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक वैयक्तिक लक्ष्य करून केलेले कृत्य आहे. तिरुअनंतपूरमच्या रस्त्यांवर ‘गुंडांनी’ कब्जा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर, दि. १२ डिसेंबर – संगमनेर तालुक्यात नांदूर खंदरमाळ जवळ वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अधिवेशनात जाहीर केली. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. कार्तिकी एकादशी निमित्ताने शिर्डीहून आळंदीला जात असलेल्या दिंडीमध्ये ३ डिसेंबरला कंटेनर घुसल्याने चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात दहा वारकरी जखमी झाले होते. वारकऱ्यांवर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत होते. आमदार थोरात यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर -शेत जमीन खरेदीची नोंद आणि मिळकतीचे हक्क सोड नोंद करण्यासाठी ५० हजार रुपये लाच मागणाऱ्या तलाठी मॅडमसह लाच स्वीकारणाऱ्या त्यांच्या खासगी मदतनीसाला अहमदनगरच्या अँटी करप्शनने पकडत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निकिता जितेंद्र शिरसाठ (वय ४६ वर्ष) असे महिला तलाठी मॅडमचे नाव असून संकेत रणजीत ससाने (वय २६ वर्ष) हा त्यांचा खासगी मदतनीस असून या दोघांविरोधात अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची अहमदनगरच्या मौजे शेंडी गावामध्ये शेतजमीन खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी शेंडीच्या तलाठी श्रीमती निकिता शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे ५०…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – दि. ११ डिसेंबर राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री-बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला वाळू मिळणे मुश्किल झाले आहे, या वाळू धोरणामुळे नवे गुंड तयार झाले, अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागावर हल्ला चढवला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात बोलत होते. फसलेले वाळू धोरण, तलाठी भरतीत झालेले गैरप्रकार आणि कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती प्रक्रिया यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. थोरात म्हणाले, नवे महसूल मंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि.११ डिसेंबर आत्तापर्यंत आपण शिक्षण आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करून जीवन जगत आलो आहोत, परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेशी (Artificial Intelligence) स्पर्धा करून, आपल्याला स्वतःची व्यावसायिक उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. भारतीय मुले ही कष्टाळू व बुद्धिमान आहेत, ती हे आव्हान लीलया पेलतील. मात्र त्यांना या परिस्थितीत ताणतणावाचे व्यवस्थापन करणारे आनंददायी शिक्षण द्यायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. गुरु एज्युकेशन पुणे व एक्सपर्ट अबॅकस फाउंडेशन संगमनेर-अकोले यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, उद्योजक सुदीप वाकळे, प्रकाश नवले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ओझर टाऊनशिप – दि. ११ डिसेंबर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवारी दहावी शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. प्रदर्शनामध्ये १०३ मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले होते. संस्थेचे ओझर विभागाचे अध्यक्ष के. एन. पाटील, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य रमेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. विज्ञान प्रदर्शनासाठी शालेय स्तरावर इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचा एक गट तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट करण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यानी भूगोल, अवकाशिय, शेती, संगणक, सेन्सर, भूकंप मापन, चांद्रयान मोहीम आदीं विविध विषयांवर आधारीत सुमारे १०३ मॉडेल्स सूरेख पद्धतीने…

Read More