Author: अनंत पांगारकर

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. हल्ला झाल्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रम स्थळी निर्भय बनो सभेत पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात नेमकं काय म्हणाले वागळे त्याचा हा संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी देत आहोत… https://youtu.be/cN6tg80_qj4?si=OhOT3pCcCl__j21o पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाआधी पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपने गुन्हा दाखल केला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लाऊ असाही इशारा दिला होता. मात्र भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास…

Read More

संगमनेर – सून आणि नातवासह शाळेचे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मनी मंगळसूत्र धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी समोर आली. यासंदर्भात भारती मधुकर वनम (वय ५८ वर्ष, रा. लवअंकुश कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती वनम शुक्रवारी सायंकाळी शहरातील पोदार इंग्लिश मीडियम येथे शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी गेल्या असताना शाळेच्या जवळील कॉर्नरला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दोघा दुचाकीस्वारानी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावत तेथून पोबारा केला. पोलीस पुढील तपास करत आहे.

Read More

संगमनेर – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाघ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वाघ यांना शुभेच्छा देताना थोरात म्हणाले, ‘काळ संघर्षाचा आहे मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे, त्यामुळे झोकून देऊन काम करा. आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू.‘ काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आला. वाघ हे नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत. यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे उपाध्यक्ष, कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांवर ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.…

Read More

नवी दिल्ली – देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान नरसिंहराव व चौधरी चरण सिंह यांच्यासह कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची मोठी घोषणा आज शुक्रवारी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केली आहे. ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या विषयी म्हटले आहे की, आमच्या सरकारला देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचे सौभाग्य मिळाल आहे. चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आणि कल्याणासाठी काम केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री ते पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. आणीबाणीचा देखील त्यांनी विरोध केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं…

Read More

संगमनेर – नुकत्याच पार पडलेल्या संगमनेर-अकोले डेंटिस्ट असोसिएशनच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉ. सुचित गांधी, सेक्रेटरीपदी डॉ. सागर गोपाळे व ट्रेझररपदी डॉ. सुनील बोऱ्हाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. इंडियन डेंटिस्ट असोसिएशनच्या (IDA) अंतर्गत असलेल्या संगमनेर-अकोले डेंटिस्ट असोसिएशनची पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी बैठक या बैठकीत या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या. यावेळी डॉ. केदार सराफ यांनी ‘CBCT – advance technology’ या विषयावर बैठकीत उपस्थित दंतरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. नव्या कार्यकारिणीच्या कार्यकाळात यावर्षी मुख कर्करोग संबंधित विविध लेक्चर्स, सेमिनार, तपासणी शिबीर, सदस्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असल्याचे नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Read More

राजुर (अकोले) – भरधाव आयशर आणि मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिचा तरुणांचा मृत्यू झाला. अपघातातील तिघेही मृत युवक अकोले तालुक्यातील मवेशी येथील आहेत. प्रथमेश नामदेव किरवे, प्रवीण रामा भांगरे व विलास रामा कवठे असे अपघातातील मृत झालेल्या तरुणांची नावे असल्याची माहिती समजली असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील राजुर येथे ही दुर्घटना घडली. अपघातातील तिघेही तरुण एम.एच. १७ सीयु ९४८१ या दुचाकीवरून अकोलेहून आपल्या गावाकडे मवेशी येथे परतत होते. राजुर स्मशानभूमी जवळ दुचाकी स्वारांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या आयशरशी समोरासमोर जोराची धडक झाली. झालेल्या या भीषण अपघातात या तिघाही तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती संगमनेर-अकोलेचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ…

Read More

संगमनेर – संगमनेरच्या श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षक प्राध्यापक सचिन पठारे यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. पठारे यांनी एम.ए. राज्यशास्त्र, एल.एल.एम. नेट-जे.आर.एफ असे शिक्षण घेतलेले आहे. श्री ओंकारनाथ मालपाणी महाविद्यालयात विधी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने प्राध्यापक पठारे यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. “भारताच्या राज्यघटनेतील सुधारणेच्या अधिकारांचा गैरवापर याभोवती असणारे गोधळाचे जाळे नवव्या परिशिष्टावर विशेष भर देणारा एक चिकित्सक अभ्यास” या विधी विषयात पठारे यांनी प्रा. साधना पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रबंध सादर केला होता. प्रा. पठारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा महाराष्ट्राला इतिहास आहे. इतिहास केवळ घोषणा देण्यासाठी नसून प्रेरणा देणारा असतो. इतिहासात हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे स्पष्ट करत गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा विकास साधणारे आमदार बाळासाहेब थोरात निष्ठावंत आणि राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. येथील जाणता राजा मैदानावर आयोजित आमदार थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, सत्यशील शेरकर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह…

Read More

संगमनेर – तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरी बाळेश्वर शिवारात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळताच त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना कारवाईचे आदेश दिले. वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पश्चिम बंगालमधील महिलेसह चार महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तर काही ग्राहकांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात वैशाली उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता. संगमनेर) ही महिला स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे आमिष देऊन त्यांना देह व्यापारास प्रवृत्त करुन स्वतःच्या मालकीच्या…

Read More

संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला संगमनेरकर नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून सलग तिसऱ्या दिवशी ६५ हजारावर नागरिकांची महानाट्याला गर्दी झाली होती. जाणता राजा मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महानाट्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योगपती मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी संगमनेरमध्ये होत असून दररोज पन्नास हजारांच्या पुढे नागरिकांची या महानाट्याला उपस्थिती लाभत आहे. आलेल्या सर्व नागरिकांची चांगली बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था,…

Read More