Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याचा कात्रीने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चार कैद्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिकेत श्रीकृष्ण समदूर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मूरे आणि गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुद्ध रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महेश चंदनशिवे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२१ मध्ये चंदनशिवे आणि आरोपी गणेश मोटे यांच्यात कारागृहात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना (ऊबाठा) प्रवेशानंतर शिर्डीतील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असतानाच घाईघाईत पक्षाकडून संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. फेरबदलामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने शिवसेनेला ‘विखेसेना’ होण्यापासून वाचविण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी एल्गार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातील निष्ठावंतांची संगमनेरमध्ये आढावा बैठक होत आहे. या बैठकीनंतर अनेकांची पक्षीय भूमिका ठरण्याची चिन्हे आहेत. वर्षाअखेरीस रविवारी ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता संगमनेरमध्ये ही बैठक होत आहे. माजी खासदार वाकचौरे यांचा पक्षप्रवेश, कोणताही पक्षीय विचार न करता केलेला संघटनात्मक फेरबदल, निवडीमध्ये निष्ठावंतांना डावलत खास व्यक्तिगत संबंध असणाऱ्यांना दिलेली पक्ष संघटनेतील पदे यामुळे अकोले, संगमनेर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कॅफे हाऊसच्या गोंडस नावाखाली अश्लील हावभाव अथवा कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी वय १९ वर्षे, रा. कासारवाडी, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर शहरालगतच्या राहणेमळा येथील रिलॅक्स कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कॅफेवर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना रिलॅक्स कॅफेमध्ये तरुण मुली मुलांना अश्लील हावभाव अथवा कृत्य करण्यास सुलभ व्हावे, त्या बदल्यात त्यांच्याकडून तासाप्रमाणे पैसे घेऊन यासाठी जागा उपलब्ध करून देताना तसेच विनापरवाना खाद्यपदार्थाची तेथे विक्री करताना आरोपी गवळी आढळून आला. या कारवाईवेळी कॅफेमध्ये मुला-मुलींच्या सहा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर शहरातील अकोले बायपासनजीक शहर पोलिसांच्या पथकाने एका कॅफे हाऊसवर टाकलेल्या छाप्यात सहा मुली आणि सहा मुले आढळून आली. पोलिसांनी या मुला मुलींचे कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचारासारखे गंभीर प्रकार संगमनेरमधील कॅफे हाऊसमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पोलीस काही कॅफे चालक मालकांवर गुन्हे देखील दाखल केले मात्र तरीदेखील संगमनेरमध्ये कॅफेतील गैरकृत्य थांबण्याची चिन्हे नाहीत. शहर आणि परिसरातील कॅफे हाऊसमध्ये अनेक प्रकारचे सर्रासपणे सुरू असतात. या कॅफे हाऊसमध्ये तसेच शहरातील काही लॉजिंगमध्ये अल्प मोबदल्यात जोडताना ‘प्रायव्हसी’ उपलब्ध करून दिली जाते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. “भारत न्याय यात्रा” असं नाव या यात्रेला देण्यात आल असून १४ जानेवारीला मणिपूर पासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली. खासदार गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून उत्तर भारतातील काश्मीरपर्यंत काढलेली ही भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र २२ जानेवारीला होत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अति भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ही यात्रा १४ जानेवारीला मणिपूर पासून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) नागपूरमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३८ वा स्थापनादिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामधून बुधवारी दुपारी १० हजारावर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी नागपूरला जाणार आहे. मंगळवारी संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, करण ससाने, हेमंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली. नगर शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाबा जाधव, मकरंद घोडके, इकबाल शेख, विजय सांगळे, जितेंद्र गांधी, दैनिक नगर स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मनोज सातपुते, लेटस्अपचे प्रवीण सुरवसे, अमोल भिंगारदिवे, श्रीकांत खांदवे, सागर गोरखे, प्रशांत शिंदे, नगर घडामोडीचे सागर तनपुरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर : नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून वंचित राहिलेल्या घटकांना लाभ देण्यासाठी संगमनेर शहरात दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी पात्र असलेले परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे , जनजागृती करणे याबरोबरच लाभार्थ्यांशी संवाद करून या विकसित यात्रेत अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील बस स्थानक परिसर येथे उद्या, दि. २७ रोजी दुपारी २.३० वाजता व २८ डिसेंबर रोजी सकाळी १०…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपाला ३५० ते ३७५ जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे. नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. नानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकारणात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून काही दिवसांपूर्वी मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. फडणवीस यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही पदवी प्रदान केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले होते. जपान आणि भारतातले संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा त्यांनी केला होता. त्यानंतर आज जपानकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. विशेष बाब…

Read More