Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राहाता तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन या दोघांची भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री विखे यांच्या मतदारसंघातील आश्वीमध्ये आरपीआय नेते गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हे दोघे उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिर्डीकडे परतत असताना लोणी मध्ये चौगुले व आरणे यांची गाडी अडवत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या विविध व्‍यक्तिगत लाभाच्‍या योजनांपोटी संगमनेर तालुक्‍यातील १९ हजार १९३ लाभार्थ्‍यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे हे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात वर्ग झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. राज्‍य शासनाच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्‍ये प्रामुख्‍याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्याचे लक्ष लागलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले उल्हासदादा पवार यांना, तर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास, सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना जाहीर करण्यात आला. येत्या रविवारी (ता. ७ जानेवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार…

Read More

टी-२० क्रिकेट स्पर्धा दर्शकांसाठी मेजवानी: आमदार सत्यजित तांबे राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धुमधडाक्यात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगमनेरमधील सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेत असलेला राज्य, देश पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रिकेट प्रेमींची उपस्थिती, उत्कृष्ट मैदान आणि दर्जेदार आयोजन यामुळे ही क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने आयोजित २४ व्या सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा थोरात यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. काश्मीमधील फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला (Tehreek-E-Hurriyat) दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यातूनच या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करत त्यावर बंदी घातली होती. त्या पाठोपाठ आता ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. ‘तेहरीक-ए-हुर्रियत’ला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले. दहशतवादाविरोधात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मी अंथरुणातून उठलो, तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं, तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता. मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज, रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखतं आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो.” “हो, पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईलमध्ये बघता-बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती. मी ॲक्टिव्हाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि ॲक्टिव्हा स्टार्ट होत नव्हती. त्याचवेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ ९८६९९९१८६८ सचित्र अभिनेता नाना पाटेकर सध्या बराच मोकळा आहे. कलेतली आपली आदाकारी सादर करता करता तो आता देशाच्या भवितव्याविषयीच्या गप्पा मारण्यासाठी मोकळा आहे. गेल्या आठवड्यात त्याने देशाच्या राजवटीविषयी टिपण्णी केली आणि २०२४ च्या निवडणुकीतही भाजपच बाजी मारेल, अशी भविष्यवाणी त्याने सांगून टाकली. तेव्हा खर्‍या नानाचे हे बोल नाहीत, असं सहज वाटून गेलं. थेट आणि भडक स्वभावाचा हा अभिनेता विद्यमान सत्तेविषयी खरं बोलत नाही, हे पाहून देश वासीयांनाच नानाचा मत्सर येईल. इंडिया टुडेच्या राहुल कनवल याला दिलेल्या मुलाखतीत आगामीतेच हे भविष्य त्याने वर्तवलंय.  ही भविष्यवाणी सांगण्यासाठी नानाने बापुडे शब्द वाया घालवण्याची खर तर काहीही आवश्यकता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या तीन फौजदारी कायद्यांची जागा आता लवकरच नवीन कायदे घेणार आहेत, यात भारतीय दंड संहिता १८६० च्या जागेवर भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या जागेवर भारतीय साक्ष अधिनियम २०२३ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या जागेवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ हे तीन कायदे लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाले आहेत. तसेच नुकतीच या तिन्ही बिलांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने या कायद्यांचा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केलेले असून जुन्या भारतीय दंड संहितेतील ५११ कलमांच्या ऐवजी नवीन भारतीय न्याय संहितामध्ये ३५६ कलम आहेत, तर फौजदारी प्रक्रिया…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अयोध्या : एक काळ असा होता की राम लल्ला तंबूत होते, आता फक्त रामलल्लालाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. ‘देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आज स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला आज अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. सरत्या वर्षात निरोप देताना अथवा नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतांनाच रस्त्यावर वाहन चालविताना स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास नुकसान पोहोचणार नाही याची खबरदारी न घेणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती संगमनेर-अकोलेचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. संगमनेर उपविभागाअंतर्गत संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले आणि राजुर पोलीस स्टेशनचा समावेश होतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्षभरात १३२ प्राणांकित अपघात झाले असून त्यात १३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील बहुतांशी वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालविल्याचे तसेच…

Read More