Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नगरपरिषद प्रशासनाने शहरातील घरांच्या संकलित करामध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेली ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली. यामुळे वाढीव दरवाढीस स्थगिती मिळण्याची चिन्हे असून यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भात थोरात म्हणाले, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या ३७ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या १४, १७ व १९ वर्षांखालील रस्सीखेच खेळाडूंनी २७ सुवर्णसह १९ कांस्यपदकांची कमाई केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ध्रुवच्या खेळाडूंची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पूर्वा पवार, आर्या पाटील, श्रद्धा साठे, ज्ञानेश्‍वर देवकर, पालवी चुत्तर, कादंबरी, तन्वी ठोंबरे, वैष्णवी तनपुरे व स्वरा वलवे यांनी सुवर्ण पदके पटकाविली. तर, याच वयोगटातील मुलांमध्ये श्रेयस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२४-२०२५ या गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत ५० टक्के अनुदानावर सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीमालासाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता देखील कमी होत आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रिय ददू,  अनेक आशीर्वाद ! या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं. पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९० च्या विधानसभा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या एटीएम मशीन मधून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येणार असून त्यानंतर संगमनेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली -हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्याच्या कारणावरून तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11 वा दिवस आहे. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे. यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले. यापूर्वी 14 डिसेंबर रोजी…

Read More

स्व. भास्कर गणपतराव देशमाने यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भास्कर देशमाने यांनी कष्टातून आपले जीवन कार्य प्रगतीकडे नेत परिवाराला देखील तेवढेच प्रेम दिले. त्यांचे चिरंजीव स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी देखील सामाजिक कार्यात आपले नाव उंचावले असले तरी त्यांनी आई-वडिलांची सेवा केली. आई-वडिलांचे आशिर्वादाशिवाय आपली प्रगती नाही, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले. धांदरफळ बुद्रुक येथे स्व. भास्कर देशमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक भाऊसाहेब डेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अशोक देशमुख, दिलीपराव शिंदे, माधवराव कानवडे आदी उपस्थित होते. देशमुख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अपघाताबाबत सरकारचे लक्ष वेधताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शिर्डी येथून आळंदी वारीसाठी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ येथे नुकताच अपघात झाला असून यामध्ये चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा वारकरी जखमी झाले. घारगाव-संगमनेर दरम्यान डोळासने हे मध्यवर्ती सेंटर असून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले असते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रसिद्ध वकील शरिफखान पठाण यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता या गुन्ह्यातील जखमी आरोपीच्या तक्रारीवरून पठाण यांच्यासह आठ जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील लोकांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शरीफ पठाण, रिजवान पठाण, आसिफ पठाण, शफीक पठाण, फारुक पठाण, फरहान पठाण, आवेज मोमीन (तब्या) व तला शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी संध्याकाळी जुन्या भांडणाच्या कारणातून वकील शरीफ पठाण यांच्यासह त्यांच्या दोघा भावांवर हल्ल्याचा प्रकार घडला होता. आता या हल्ल्यातील विरोधी गटातील…

Read More