Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव व पीकविमा मिळत नसल्याने सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, कुटुंबातील सदस्यांसह आनंदात वेळ बितेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. कौटुंबिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान, विविध गंभीर कलमांसह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. राजेंद्र बापू गडगे (वय ५३ वर्षे) असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गडगे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८, ३१९, ३५६, ३५२, ३५३, ३३६(४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले: कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे व हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्यभर बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सध्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसैनिकांना आगामी संघर्षासाठी सज्ज करण्यासाठी शिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची तोफ या सभेत धडाडणार असून, त्यांच्या झंझावाती मार्गदर्शनामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे. ही सभा मंगळवारी, (२ जून) दुपारी बारा वाजता शिर्डी येथील एअरपोर्ट रोडवरील ‘साई किमया गार्डन लॉन्स’ येथे पार पडणार आहे. या सभेला माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, भंडारदरा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील पांजरे नाक्यावर काजवे महोत्सवासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. येथील टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना, ‘माझ्या मुलाला का थांबवले’ या कारणावरून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले लक्ष्मण बांगर आणि त्यांचा मुलगा साई बाळू बांगर यांनी वनरक्षक चंद्रकांत भरत तळपाडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांजरे नाक्यावर वाहनांची तपासणी आणि शुल्क आकारणीचे काम सुरू असताना एमएच ०५ ईक्यू २६५१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एक्सएल-६ कार तेथे आली. या कारच्या डॅशबोर्डवर ‘पोलीस’ अशी पाटी आणि लाल-निळ्या रंगाचा एलईडी लाईट लावलेला…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु जोडीदारासोबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि मानसन्मान लाभेल. घरातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि वातावरण शांत राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात जाईल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहाता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असणाऱ्या चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून एमबीए (MBA) शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा अंत झाल्याने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पुण्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर, घटनेच्या २८ दिवसांच्या आतच न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात ‘प्राईमा फेसी’ (प्रथमदर्शनी) सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आता या खटल्याची सुनावणी दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, लैंगिक चाचणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रियकराने केलेल्या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल सांगून लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबाचाही या विवाहाला होकार होता. मात्र, मे महिन्यात अचानक प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगत तिची फसवणूक केली. प्रियकराने केवळ आपला वापर केल्याचे समजल्याने ही तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली होती. भावाने तिला समजावून सांगण्याचा आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न…

Read More