Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हजारो नागरिकांच्या अभूतपूर्व जल्लोषामध्ये अमृतवाहिनी महाविद्यालय ते बसस्थानक या ‘हॅपी हायवे’चे लोकार्पण होत आहे. तालुक्यात फोनाफोनी झाली. मात्र हा तालुका एक परिवार आहे. संगमनेरच्या विकासात ज्या-ज्या वेळी अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला त्या-त्या वेळी हा तालुका एकवटला आहे. संगमनेरकरांचा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. आनंदाच्या क्षणी सर्वांनी एकत्र यावे ही अपेक्षा होती मात्र काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या अमृतवाहिनी महाविद्यालय ते बस स्थानक या हॅप्पी हायवेचे लोकार्पण मंगळवारी संध्याकाळी थोरात यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर अमृतवाहिनी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आला. अमृतवाहिनी महाविद्यालयाचे बस स्थानकापर्यंत काम झाल्याने लगेचच त्याच्या उद्घाटनाची घाई का असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याच्या पूर्णतेनंतर उद्घाटन केले असते तर बरे झाले असते. श्रेयवादासाठीचा तमाशा संगमनेर शहराने मंगळवारी अनुभवला. केवळ नगरपालिका निवडणुका केव्हाही होऊ शकतात त्यामुळे त्याच्या देखाव्यासाठी हा उद्घाटनाचा अट्टाहास होता का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी उपस्थित केला आहे. कानकाटे म्हणाले, संगमनेरमधील जनता भोळी नाही, ती सर्व जाणून आहे. ती तिसरा नेत्र उघडेल तेव्हा सर्व राजकीय पुढाऱ्यांना जनतेची ताकद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर येथे राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित या विषयाच्या स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा अद्भुत विक्रम येथील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी केला. साऊथ कोरिया येथून जागतिक अबॅकस स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्या उपस्थितीत समारंभ: रविवारी (दि. २४ सप्टेंबर) मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी झालेल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग, डॉ. भानुदास डेरे इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्राचार्या रेखाताई पवार आणि देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली डोखे उपस्थित होत्या. येथील स्पर्धकांचा सहभाग: या स्पर्धेत अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  आश्वी – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली असून मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथिल बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो कामावर गेला होता. सायंकाळी अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. यांचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणाऱ्या वाहणाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिप्रीं – लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण आपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  अहमदनगर – धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची मंगळवारी (26 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन रूपनर व बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबरला यशवंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांनी चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, शैक्षणिक दृष्ट्या अन्यायकारक ठरणारा हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी छात्रभारतीच्यावतीने संगमनेर बस स्थानकासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. हा निर्णय मागे घेतला जावा, यासाठी छात्र भारतीच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या. शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवा. राज्यातील सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय गोरगरीब, आदिवासी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संपविणारा आहे. सरकारच्या या एका निर्णयामुळे राज्यातील जवळपास 14 हजार पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहे. तर 65 हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालविण्यास दिल्या जातील. या निर्णयामुळे लाखावर शाळांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे…

Read More

संगमनेरकर कलारसिकांचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारा माणूस सापडण्यासाठी भाग्य लागतं. असा माणूस प्रत्येकालाच भेटेल असेही नाही; आणि भेटलाच तर तो आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर भेटेल याचाही भरवसा नसतो. परंतु समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. त्यातील नात्यात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली तर ते तुटण्याचाही प्रश्‍न नसतो. असाच काहीसा संदेश देत रविवारी सादर झालेल्या ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप झाला. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी,…

Read More

शाळा बंद करण्यापूर्वी स्थानिकांचा विचार घ्यावा शिक्षणाचा मूलभूत हक्काची पायमल्ली होऊ नये महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे गोरगरिबांची वाडी-वस्तीवर शिकत असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मूलभूत शिक्षण हक्काची पायमल्ली होणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा विचार घेतला पाहिजे. सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. कमी पटसंख्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दिलेल्या प्रसिद्धी…

Read More

गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला : शिवाजीराव लहारे महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : स्वाभिमानी गणेश परिसरासाठी मंगळवारी (ता. २६ सप्टेंबर) घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी व्यक्त केला. सोबतच प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सभा:…

Read More

न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते लक्ष महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरच्या सहकारावर अविश्वासाचे सावट निर्माण करणाऱ्या आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज सरकारी वकिलांच्या जोरदार युक्तिवादानंतर फेटाळण्यात आला तर अन्य चौघांचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी मंगळवारी मंजूर केला. तपास अधिकारी, ठेवीदारांच्या भूमिकेकडे लक्ष: गेल्या महिनाभरापासून ठेवीदारांना न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रतीक्षा लागली होती. भाऊसाहेब कुठे आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर हरकत घेत युक्तिवाद करत या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे…

Read More