Author: अनंत पांगारकर
इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक रस्त्यावर लखलखाट होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सुसंस्कृत व प्रगतशील संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या हॅपी हायवेचे लोकार्पण गणेश उत्सवाच्या आनंदी काळात मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) सायंकाळी 5 वाजता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व मार्गदर्शनातून इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक हा मॉडेल रस्ता तयार झाला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासह दुतर्फा पादचारी मार्ग आहेत. मध्यभागी डिव्हायडरसह विविध वृक्षांचे रोपण केले…
संगमनेर कारखाना देणार कार्यक्षेत्रातील ऊसाला 2835 रुपयांचा भाव महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सरकार गेलं आणि आपल्याला त्रास सुरू झाला. तालुक्यातील विकास काम बंद केले गेले. दहशत निर्माण करून विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दहशतीने येथील विकास थांबणार नाही. ते मोडायला येतात आणि आम्ही घडवायला जातो, असे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यांची उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेर तालुका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते. त्यात संशय निर्माण झाला की प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपीही परस्परांकडे संशयाने पाहू लागतात आणि त्यातून संसारातील गोडवा नाहीसा होतो. अशाच कथानकाचा समावेश असलेल्या आणि सरतेशेवटी नातेसंबंधातील विश्वास जपण्याचा संदेश देणार्या केदार शिंदे लिखित, भरत जाधव यांच्या तब्बल चौदा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश असलेल्या ‘तू तू मी मी’ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी प्रेक्षागारात हास्याचे कारंजे फुलवले. कमलाकर सातपुतेसह अन्य तिघांनी वठवलेल्या भूमिकेने उपस्थित प्रेक्षकांना मनात डोकवायलाही भाग पाडले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता भरत जाधव, कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय लोकशाहीचे चार खांब केव्हाच निखळले आहेत. अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेलच यावर जसा न्यायालयावर भरवसा राहिलेला नाही तसं प्रशासन मागणीप्रमाणे हलेल यावरही कोणाचा विश्वास राहिलेला नाही. सरकार मतलबी झाल्यावर शासनाकडूनही न्यायची अपेक्षा करण्यात अर्थ राहत नाही. एका स्तंभाकडून या अपेक्षा पूर्ण होतील, अशी धारणा होती त्या पत्रकारितेत घुसलेल्या अपप्रवृत्तीने लोकशाहीचे धिंडवडे उडवलेत. अखेरचं अस्त्र म्हणून लोकं माध्यमांकडे अपेक्षेने पाहत होती. पण काही अपवाद वगळता या माध्यमांची लेखणीही म्यान झालेली पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबी आलंय. लोकशाहीची पावलोपावली टर उडवणार्या सत्तेच्या विरोधात तर माध्यमांनी अधिक जबाबदारीने आपली लेखणी चालवणं अपेक्षित असताना ज्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशनगर – प्रवरा कारखान्याचा गणेश कारखान्यासोबत असलेला आठ वर्षांचा करार जून २०२२ ला संपल्यानंतर विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना चालविला. त्या काळात संचालक मंडळांने आर्थिक व्यवहार करण्याकरता सह्यांचे अधिकार खासदार सुजय विखे पाटील यांना दिले. खासदार विखे पाटील हे गणेश कारखान्याचे सभासद किंवा संचालक नसतानाही त्यांना सह्यांचे अधिकार का दिले गेले? गणेश कारखान्याचे जिल्हा बँक आणि सेंट्रल बँकेत नियमित अकाउंट असतानाही प्रवरा बँकेत नवीन खाते उघडून तिथूनच का व्यवहार करण्यात आला? गणेशच्या कारभारात जो सावळा गोंधळ झाला त्याची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटील घेणार का? असा सवाल गणेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांनी दिली. येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात सप्ताह संदर्भात नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीस गावातील अनेक गावकरी भाविक, पुढारी आदी सर्व जण उपस्थित होते. दत्तगिरी महाराज म्हणाले, वरवंडी पंचक्रोशीतील ह्या सर्वात मोठ्या ब्रह्मलीन माणिकगिरी, बिरोबा महाराज ह्या फिरत्या नारळी म्हणजे महासप्ताचे आयोजन रविवारी (दि.१७ डिसेबर २०२३) केले असून या अखंड हरिनाम सप्ताहसाठी सर्व गावकरी तालुक्यातील भाविक भक्तांनी तन्मयतेने सामील व्हावे. यावेळी वरवंडी गावातील सर्व लोकांनी या सप्ताहाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर:- तालुक्यातील सावरगावतळ येथे शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर) रात्री गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली आहे. गाईचा मृत्यू: गेल्या महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी तालुक्यात दमदार सुरुवात केली आहे. रात्री संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथेही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात गावातील आण्णासाहेब बाबुराव नेहे यांच्या गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली असून गोठ्यातील गव्हाच्या भुश्यानेही पेट घेतला होता. दुर्घटना टळली: या दुर्घटनेत सुदैवानं इतर फार मोठी जीवीत हानी झाली नसली तरी नेहे यांना यामुळे आपली गाय गमवावी लागले आहे. वरिष्ठांकडून पाहणी: ही माहिती आण्णासाहेब नेहे यांनी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना कळविली असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – क्षणाक्षणाला पडणार्या टाळ्या.. त्याला मिळणारी शिट्ट्यांची साथ.. उपस्थितांतून होणारा जल्लोष आणि गणपती बाप्पांचा जयजयकार आणि सोबतीला मुसळधार पाऊस अशा जल्लोशपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस गाजला. विजेता: मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने सादर केलेल्या महाभारतावर आधारित हिपहॉप नृत्याने मालपाणी लॉन्सचा परिसर अक्षरशः भारावून गेला. हे नृत्य इतके बहारदार होते की त्याच्या सादरीकरणातच या संघाने पहिले पारितोषिक पटकाविल्याचे आडाखे बांधले गेले. कनिष्ठ गटातही मुंबईच्याच इंडियन आर्मी नृत्य संघाने सर्जीकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम नृत्य सादर करीत उपस्थितांना देशभक्तीत चिंब केले. राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा: राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या तिसर्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरात विनापरवाना गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. वास्तविक या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी गणेश मंडळांनी अशा प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या भेटीत समोर आले आहे. पोलीस ठाण्यात करा अर्ज: सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असून वेळोवेळी सूचना देऊन देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बऱ्याच सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांनी अद्याप पावतो पोलीस ठाण्यातून गणेश उत्सव साजरा करण्यासंबंधी अर्ज केलेला नाही. परवानगी घ्या: या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दुचाकी, शेती औजारांच्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी एकाच वेळी चौदा भंगार दुकान, गोडाऊनची एकाच वेळी झाडाझडती घेतली. या तपासणीत पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तक्रारी: संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, राजुर आणि अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती औजारे, शेती पंप, केबल, बॅटरी चोरीचे गुन्हे सातत्याने वाढत असून त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे. 14 छापे: गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी झाल्याबाबतचे काही गुन्हे देखील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे. चोरट्यांकडून…
