Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या तरुण सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता. १८ ऑगस्ट) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईसह नातेवाईकांनी केला असून, या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे (DYSP) निवेदन देण्यात आले आहे. काय झाले: नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याची माहिती संतोष सुखदेव वाघ यांनी कडवे यांच्या मामास रवींद्र भाऊसाहेब वाघ यांना फोनवरुन कळविली. त्यानंतर वाघ तात्काळ संगमनेर बसस्थानकावरुन घरी परतले. त्यानंतर त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगातील सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढली आहे, अशावेळी शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. धावपळीच्या जीवनात जगताना शरीरस्वास्थाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असते. विद्यार्थ्यांनी तर लहान वयापासूनच योगासनांची सवय लावली पाहिजे. कारण आपण बुद्धीने कितीही तेज असलो तरीही आपले स्वास्थ उत्तम नसेल तर आपल्यातली पूर्ण क्षमता आपण सिद्ध करु शकत नाही. आता तर केंद्र सरकारने योगासनांचे महत्व लक्षात घेवून त्याला खेळाचा दर्जा दिल्याने विद्यार्थ्यांना त्यातूनही करिअर करण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. योग सोपान उपक्रमाचा संकल्पपूर्ती सोहळा: गीता परिवार व अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीने राबविलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने वाढ केली आहे. या आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. एक मुख्य आणि चार सहकार्य करणाऱ्यांचा अटकेतील आरोपीत समावेश: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच रात्रीतून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्य 17 आरोपींना सहकार्य करणाऱ्या तीन तत्कालीन रोखपालांसह एका लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यानंतर पतसंस्थेच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एवढे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81 कोटीचा अपहार करणाऱ्या चेअरमन मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये आता नव्याने MPID चे कलम तीन वाढविले आहे. आत्तापर्यंत पाच आरोपी अटकेत: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी संस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली होती. त्या पाठोपाठ बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याला देखील अटक केली होती. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयासह तसेच अन्य आरोपी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लोकशाही प्रणालीमध्ये मतदान हा अत्यंत पवित्र व महत्त्वाचा अधिकार असून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व युवक व युवतींनी 8055987777 या नंबरवर मिस कॉल देऊन नवीन मतदार नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी करावी असे आवाहन युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना दिली. लोकशाही व राज्यघटनेमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. वयाच्या अठराव्या वर्षी प्रत्येक युवकाला मतदान करण्याचा पवित्र अधिकार मिळाला आहे. लोकशाही व राज्यघटना मजबूत करण्यासाठी…

Read More

अज्ञात चोरट्याचा प्रताप; रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घुलेवाडी (संगमनेर) ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट मधून तब्बल साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी समोर आला. यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील उघड झाला आहे. मविआ सरकारच्या काळात मिळाले होते साहित्य: कोरोना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी कोरोना काळात तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने विशेष प्रयत्नातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन उपलब्धतेसाठी युनिट उभे केले होते. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये असलेले सर्व साहित्य शासनाकडून कोरोना काळात मिळाले आहे. रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ट्रॉमा केअर…

Read More

२,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने करणार खरेदी महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे कांद्याच्या प्रश्नावर काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले असतानाच. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंनी ‘ऐतिहासिक खरेदीदरा’ची घोषणा करण्याआधीच जपान दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी ती केल्याने मुंडेंच्या श्रेयावर पाणी फेरले गेले. मुंडे करणार होते घोषणा: केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील सरकारी निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंडे कांदाप्रश्नी चर्चा करत होते. या चर्चेनंतर मुंडे व गोयल पत्रकारांशी बोलतील असे सांगण्यात आले होते. मुंडेंच्या घोषणेआधीच फडणवीसांची घोषणा: या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – समाज माध्यमातून चुकीचा मेसेज व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी अफवा पसरविल्याचा कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल: अभिषेक पांडुरंग जोर्वेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 505 (2) अन्वये मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय होता नेमका प्रकार: रविवारी सायंकाळी शहरातील जोर्वेनाका भागात एका हायमॅक्सच्या खांबावर पाकिस्तानचा ध्वज फडकविल्याचे मेसेज समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करत सुमारे 600 किलो जनावराच्या गोमांसासह सुमारे सव्वाचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून एक जण घटनास्थळावरून पसार झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई: नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक संतोष लोंढे, गणेश भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गुंजाळ, अमृत आढाव, सचिन अडबल यांचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी संगमनेरमध्ये गस्त घालत होते. या पथकाला जुने जोर्वे रोड परिसरातील जमजम कॉलनीत अब्दुल हमीद कुरेशी हा गोवंश जनावरांची कत्तल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या आदर्श सहकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संगमनेर पोलिसांनी अटक केलेल्या व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला संगमनेरच्या न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी: व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी त्याला संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात पोलीस कोठडी मिळण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी हजर केले. न्यायाधीश एस. एम. वाघचौरे यांनी आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान आरोपी कडून आणखी काय माहिती समोर येते. हे 24 ऑगस्टला समजणार आहे. सहकाराची विश्वासार्हता धोक्यात: संगमनेरचे अर्थकारण सहकारावर…

Read More