Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अमली पदार्थाच्या व्यापारास आणि प्रसारास आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी ते पदार्थ जवळ बाळगण्याची मर्यादा देखील कमी करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1681240110568980480?s=19 फडणवीस म्हणाले अमली पदार्थाच्या व्यापार आणि प्रसाराचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. दहशतवाद विरोधी पथकाला समन्वय एजन्सी म्हणून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – तक्रारदाराच्या मित्राला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक आणि एका खासगी इसमाला अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहाथ पकडले. राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ, जि. जळगाव) पोलीस नाईक तुषार पाटील आणि खासगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (हनुमान वाडी, भुसावळ, जिल्हा जळगाव) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत ही कारवाई नाशिक लाचलुचपच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री काँग्रेस गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्र्यांचीच शाळा घेतली. विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नसल्याचा खोचक टोला लावताना थोरात चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात आक्रमक झाले. मंत्री गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, बिना तयारीचेच सभागृहात येतात, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला. थोरात म्हणाले, सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास हा प्रश्नोत्तराचा राहील हे आपण सर्वानुमते ठरविले. सभागृहातील सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. मात्र संबंधित विभागाचे मंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या भाजप नेता किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बस स्थानक चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. तसेच सोमय्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही वृत्तवाहिनीने किरीट सोमय्यांच्या लंपटपणाचा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पर्दाफाश केला आहे. राजकीय नेत्यांवर चिखल फेक करणारच चिखलात लोळत पडल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी दुपारी बस स्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या अंकुश चत्तरचे हत्याकांड मंगळवारी विधिमंडळात पोहोचले. आरोपींमध्ये भाजपच्या नगरसेवकासह दहा जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगाराचा जात, धर्म आणि पक्ष न पाहता कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात केली. अहमदनगर शहरात नुकतेच घडलेले अंकुश चत्तर हत्याकांड काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केले. गुन्हेगारीवर हल्लाबोल करताना आमदार थोरात म्हणाले, अहमदनगर शहरातील गुन्हेगारी चिंता वाढवणारी आहे. राज्य तुमचे आहे, गृहमंत्री तुमचे आहे, खासदार सत्ताधारी पक्षाचे आहे, आमदारही सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहे आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच आहे. त्यामुळे हे सर्व चिंता वाढविणारे आहे. जनतेला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सद्यस्थितीच्या देश व राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका व पुढील धोरण जाहीर करण्यासाठी भाकपचे राष्ट्रीय नेते कॉ. डॉ. भालचंद्र कांगो यांच्या व्याख्यानाचे शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता संगमनेर येथे दुर्वे नाना सभागृहात आयोजन केले असल्याची माहिती भाकपचे संगमनेर सेक्रेटरी कॉ. प्रताप सहाणे यांनी दिली आहे. ‘महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती व पक्षाची भुमिका’ या विषयासंबंधी कॉ. कांगो बोलणार असून याप्रसंगी राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे, सहसचिव प्रा. राम बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. संगमनेर-अकोले तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश असलेल्या संगमनेरच्या अग्रमानांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 76 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूद्वारे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगारावर निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. व्यंकटेश म्हणाले, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ए प्लस दर्जा असून सर्व विभागांचे मानांकन झालेले आहेत. महाविद्यालयातील गुणवत्तेचे शैक्षणिक कामकाज पाहून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सातत्याने कॅम्पस इंटरव्यूसाठी महाविद्यालयात येत असतात. यावर्षी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्यावतीने जे. एन. के. इंडिया, मुंबई कॅम्प, टावर दिल्ली, ध्रुव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा “मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२३” लातूरमध्ये वितरित करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे होते. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते . जवळे कडलग येथील मात्र सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग यांनी ८८४९ मीटर उंच असलेल्या जगातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेवासा (अहमदनगर) – नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सोमवारी भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरफोडी करण्यात आली. या घटनेत दागिने आणि रोकड रकमेसह नऊ लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. गेवराई येथील सत्तरकर वस्तीवर घर पुढचा हा प्रकार घडला याप्रकरणी शिवाजी तुकाराम सत्तरकर यांनी नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सत्तरकर हे आपल्या कुटुंबीयांसह शेतात राहतात. सोमवारी सकाळी 11 वाजता घराची कडी लावून ते घराजवळ असलेल्या कांद्याच्या शेडमध्ये पत्नी आणि गावातील चार मजुरांसह कांदा भरण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता सत्तरकर यांच्या पत्नी घरी आले असता त्यांना एक…

Read More