Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर, दि. २० मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने खासदार विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या पहिल्याच भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार विखे यांनी कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सादर केला होता. त्या पाठोपाठ पालकमंत्री विखे पाटील यांनी नाराज असलेल्या आमदार राम शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बंद दाराआड गुप्त खलबते केली. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री असलेल्या विखे पाटलांनी पक्षांतर्गत संवाद मोहीम साधण्यात सुरुवात केली असल्याने त्यांची ही मोहीम कितपत यशस्वी ठरते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. नगर…
दि. २० मार्च, अहमदनगर १३ मे रोजी अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील १७,८९९ गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाईचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या आराखड्यानुसार शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७ हजारावर पोलीस व ४ हजारावर गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. दोन्ही मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने देखील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईला…
दि. १९ मार्च, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या साकुरमध्ये दहावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारानंतर तिने बदनामीच्या भीतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. या अमानुष अत्याचाराचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्यावतीने माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व तालुका काँग्रेस अध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. २९ फेब्रुवारीला घडलेल्या या घटने प्रकरणी सोमवारी तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपीं विरोधात बाल लैंगिक अत्याचारासह (पोक्सो) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष व जय हिंद महिला मंचच्या प्रमुख…
उमेदवारीवर एकमत होताच पूर्ण ताकदीनिशी पालकमंत्री विखेंना उभे राहावे लागेल नांदगावकरांच्या पाठीशी! दि. १९ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महायुतीला राज्यात नवा सहकारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची नावे राजकीय क्षितिजावरून कायमची हटवा’, असे सांगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मनसेला महायुतीत घेण्याचा निर्णय झाला असून यावर महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री राज ठाकरे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची…
दि. १९ मार्च, मुंबई अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानी या घटनेतील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले एका दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील संगमनेर शहरात काही…
दि. १९ मार्च, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रविद्या शाखेंतर्गत विधी विषयाच्या अभ्यास मंडळावर प्राध्यापक डॉ. कपिल चौरपगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक चौरपगार संगमनेरच्या ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये संशोधक मार्गदर्शक आहेत. चौरपगार यांच्या विधी अभ्यास मंडळावरील निवडीबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी आदींनी अभिनंदन केले.
दि. १९ मार्च, अहमदनगर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील आचारसंहिता अंमलबजावणीच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हा…
संगमनेरमधील उद्योजक ‘अमित पंडित’चा नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात असा आहे सहभाग, या कारणासाठी झाली अटक!
नगर अर्बन बँकेतील २९१ कोटीच्या घोटाळ्यात उद्योजक अमित पंडितचा ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा; पंडितचा भागीदार शुक्लाही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर! दि. १९ मार्च, अहमदनगर २९१ कोटीच्या बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी म्हणून समोर आलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित (वय ५६) याने ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला असल्याचे समोर येत आहे. शनिवारी दुपारी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केलेला पंडित सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून काय समोर येते याकडे सहकारातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. ३३ कोटींच्या घोटाळ्यात उद्योजक अमित वल्लभराय पंडितला नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून…
दि. १८ मार्च दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ फेब्रुवारीला दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर संगमनेर तालुक्यातील साकुर येथे अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने या मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर दोघे (रा. हिरेवाडी, साकुर), प्रशांत भास्कर भडांगे (भडांगे वस्ती, साकुर), विकास रामदास गुंड (गुंड वस्ती, मांडवे बुद्रुक) व विजय खेमनर (हिरेवाडी, साकुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहावीत शिकणारी मुलगी…
दि. १७ मार्च, अहमदनगर अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी सुहास मापारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या आचारसंहिता अंमलबजावणी बाबत असलेल्या तक्रारी ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election24@gmail.com या ई-मेल आयडीवर करता येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भातील तक्रारी नागरिकांना आता थेट या स्थापन करण्यात आलेल्या कक्षात दाखल करता येणार आहे.
