Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधी गटातील जर कोणी उमेदवार शिवसेनेच्या नावाने मतं मागत असेल तर त्याला मतदान करू नका. शिवसेना अशा उमेदवारांचा लवकरच बंदोबस्त करेल. मतदारांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांनी केले आहे. शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी शेतकरी विकास मंडळ आणि जनसेवा मंडळामध्ये लढत होत आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाने आपले उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी उमेदवारांचे चिन्ह कप…

Read More

अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. बुधवारी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. पाटील म्हणाले, महामंडळाच्या ५५६ लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले तर प्रमाणपत्र नंतर मिळाले. या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आघाडी सरकारने बंद केलेली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील पतसंस्था चळवळीतील अग्रेसर शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी यांची तर उपाध्यक्षपदी रोहित मणियार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाचे बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत अनुक्रमे लाहोटी आणि मणियार यांच्यावर आर्थिक वर्षासाठीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संस्थापकांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने आर्थिक शिस्त लावत प्रगतीची गरुडभरारी घेतली आहे. त्यांच्याच पदचिन्हावर आपण यापुढेही कार्यरत राहणार असल्याचा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी दिला. छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसाठी अर्थवाहिनी ठरलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने गत आर्थिक वर्षात 168 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. या आर्थिक वर्षात ठेवींचा हा टप्पा दोनशे कोटी रुपयांवर नेण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाने केला आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मेंढ्या धुण्यासाठी नांदुरी फाट्यावरील पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारामध्ये ही दुर्घटना घडली. सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६ वर्ष, रा. धुळवाडची डोंगराची वाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि शुभम रावसाहेब कोटकर (वय २० वर्ष, रा. पिंपळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. या संदर्भात मृत सोमनाथ जेडगुले यांचा मावस भाऊ विलास खंडू शिरतार (वय २४ वर्ष, रा. गोडसेवाडी, धांदरफळ ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याने दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमनाथ कचरू जेडगुले आणि शुभम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्तीसगडच्या दंतेवाडा भागामध्ये भारतीय जवानांवर नक्षली हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांनी भारतीय जवानांचे पीकअप उडविली असून यात 11 भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात माओवाद्यांनी भारतीय जवानांचं पिकअप उडवलं. त्यामुळे अनेक जवान जखमी झाले होते. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. अधिकृतरित्या यावर अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र, एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भात धक्कादायक वृत्त दिले आहे. या हल्ल्यामध्ये जवानांचं मोठ्या नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दररोज सात लाख लिटरपेक्षा अधिक दूध निर्माण होणारा संगमनेर तालुका दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जाणीव जागृती होण्यासाठी स्थानिक दूध संघाचे सचिव, पर्यवेक्षक यांनी अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले. संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि आनंद यांच्या विद्यमाने पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत देशमुख बोलत होते. यावेळी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे राहुल नायर, डॉ. शुभांकर नंदा, डॉ. सागर श्राफ, सीमा माथुर, डॉ. सरोज वहाने, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्‍वत:च्‍या नावाने व्‍यापारी संकुल उभारण्‍याचा घाट घालण्‍यापेक्षा म्‍हाळुंगी नदीच्‍या पुलाकरीता निधी आणण्‍याचे प्रयत्‍न केले असते तर, आपले अपयश उघडे झाले नसते. परंतू आता आपल्‍याला निधीही आणता येत नाही हे सर्व जनतेला कळाल्‍यानेच आपल्‍या अपयशाचे खापर दुस-यांवर फोडण्‍याचा आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्‍न म्‍हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असाच असल्‍याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिका-यांनी केला आहे. म्‍हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्‍या नेतृत्‍वावर आ. थोरात यांनी केलेल्‍या आरोपांना भाजपाचे शहर अध्‍यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्‍यक्ष जावेद जहागिरदार, अमोल खताळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. म्‍हाळुंगी नदीवरील पुल कुणामुळे खचला याची संपूर्ण कल्‍पना संगमनेरच्‍या जनतेला आहे. परंतू सत्‍ता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एखाद्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा नेणं माझ्या मनाला पटत नाही, खरंतर असा मोर्चा प्रांताधिकारी अथवा कलेक्टर कचेरीवर काढायला हवा या मताचा मी आहे. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पार्टीचा हा मोर्चा आहे. मोर्चेकरांच्या प्रश्नासोबत आम्ही आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. किसान सभेसह विविध संघटनांचा अकोलेपासून महसूल मंत्र्यांच्या लोणीतील कार्यालयावर पायी मोर्चा बुधवारी निघत असून तीन दिवस हा मोर्चा चालणार आहे. नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नगर मनमाड महामार्गाची काळजी करणा-या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्षानुवर्षे सर्व सत्‍तास्‍थानं हातात असतानाही वीस वर्षांपासून रखडलेल्‍या कुप्रसिध्‍द संगमनेर – कुरण – पोखरी हवेली रस्‍त्याच्‍या कामाकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्‍या अल्‍पसंख्‍याक आघाडीचे सरचिटणीस हाफीज हैदर शेख यांनी उपस्थित केला आहे. शेख यांनी म्‍हटले की, संगमनेर पोखरी हवेली हा रस्‍ता अतिशय दयनिय झाला आहे. परंतू विकासाच्‍या गप्‍पा मारणा-यांना बाहेरच्‍या रस्‍त्‍यांची काळजी करुन बोलायला वेळ आहे. परंतू संगमनेर शहरानजीक असणा-या रस्‍त्‍यांवर बोलायला सवड सापडत नाही याचे आश्‍चर्य वाटते. संगमनेर शहराच्‍या बाजारपेठेत कुरण, देवकौठे, पारेगाव खुर्द, बुद्रूक, आशापिरबाबा, तळेगाव, नान्‍नज, पोखरी हवेली…

Read More

अनंत पांगारकर • महाराष्ट्र संवाद न्यूज नगरपालिका निवडणुका होईपर्यंत म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ नये, यासाठी भाजपचेच काही नेते मुंबईत मुख्यमंत्री अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसापासून बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलासंदर्भात महत्त्वाचे विधान करताना भारतीय जनता पक्षातील वजनदार नेत्यावर शरसंधान साधले आहे. थोरात म्हणाले, स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल दुर्दैवाने पडला आहे. पाण्याचा लोंडा मोठा असल्याने पूल पडल्याने अनेक नागरिकांची अडचण झाली आहे, ही बाब…

Read More