Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मावळत्या आर्थिक वर्षासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने संगमनेर तालुक्याला दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच तालुक्याने महसूल वसुलीचा नवा उच्चांक तयार केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संगमनेर तालुक्याची १४१% वसुली झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेताना दिसत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी संगमनेर विभागाला १५ कोटी ६९ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च अखेर हे उद्दिष्ट ओलांडत संगमनेर तहसीलने तब्बल २२ कोटी २० लाख रुपयांची महसूल वसुली केली आहे. टक्केवारी मध्ये हा आकडा १४१% इतका आहे. गत आर्थिक वर्षात देखील संगमनेर तालुका महसूल विभागाने १२५% वसुली पूर्ण करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या जनहितार्थ निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींचे दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत सण, उत्सव, जयंती, साजरे होणार आहेत. पोलीस भरती परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार वरील कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर शहर व संपूर्ण जिल्हा हद्दीत सण, उत्सव, सभा, आंदोलने त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी संगमनेर तालुक्यातील १९ हजार १२३ लाभार्थ्यांना मार्च २०२३ अखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थान परिसर सुशोभीकरण कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीसाठी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आ. थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून व पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध गावांकरता प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी राम नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागामुळे शोभा यात्रेची रंगत आणखी वाढली होती. श्रीराम नवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेला अभिनव नगर मधील श्रीराम मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता हनुमान चालीसा व आरतीने सुरुवात करण्यात आली. गीता परिवाराच्यावतीने यावेळी हनुमान चालीसांचे वाटप करण्यात आले. बस स्थानक परिसरात रामराज्य प्रतिष्ठानने केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी संगमनेरकरांनी गर्दी केली होती. शोभायात्रेत सुरुवातीला सनई चौघडे, घोडे, उंट, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नाशिकच्या नवरचना माध्यमिक विद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख आणि संगमनेर स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी शकुंतला मुदलियार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केले आहे. त्यांनी संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ. रुपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी प्राप्त केली. याबद्दल शकुंतला मुदलियार यांचे संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तासिलदार, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भावे, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदींसह प्राध्यापक उपस्थित होते. प्रोफेसर गायकवाड म्हणाले, शकुंतला मुदलियार यांनी विद्यार्थी दशक संगमनेर महाविद्यालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: मीटरमध्ये छेडछाड केल्याने तपासणीसाठी नेलेले मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी वरिष्ठ उप अभियंता कोपनर यांच्याकरिता पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती वीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता विरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कमलेश युवराज पवार वय २९ वर्ष, मुळ रा. प्लॉट नं. १२०, सी २ भवनच्या पाठीमागे, खुटवडनगर, नाशिक हल्ली रा. शुभ रेसीडेंसी, नवले नगर, पारिजात चौक, सावेडी, अहमदनगर असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे (वर्ग दोन) नाव आहे. लाचखोर कमलेश युवराज पवार हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या चिचोंडी पाटील येथील सब स्टेशनमध्ये कार्यरत असून तक्रारदाराचे अंभोरा, ता.…
महाराष्ट्र संवाद न्यूज आजचं वास्तव हे दुभंगलेलं नसून भंगलेलं आहे. त्याचे अनेक तुकडे झालेले असून विस्कळीत आणि भंगलेल्या काळाचे तुकडे सांधण्याचा प्रयत्न करणं हे या कादंबरीचं विधान आहे. आपल्या भोवतालच्या वर्तमानाचा अर्थ न लागणं, नीट न समजणं, यातून अतिरेकी संताप होऊन त्या संतापातून वाट काढत आपण स्वतःशी बोलणं. आपल्या मनातील प्रश्नांचे खांब घेऊन त्यावर वास्तू तयार करणे आणि त्या वास्तुत आपल्या प्रश्नांचे उत्तर शोधणे म्हणजे वास्तुशिल्प तयार करणे होय. अशा प्रकारचे वास्तुशिल्प “कोलाज” या कादंबरीतून डॉ. लिंबेकर यांनी तयार केल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. डॉ. अशोक लिंबेकर लिखित “कोलाज : संभ्रमाचे वर्तमान” या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती संभाजी नगर : बुधवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत घोषणाबाजी झाल्याने खासदार बैठकीतून निघून गेले. दोन गटांमध्ये भांडणात जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली. तसेच दगडफेकीचा देखील प्रकार घडला. संतप्त जमावाने पोलिसांचे देखील वाहन जाळले. रात्री झालेल्या या दंगलीनंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, शांतता निर्माण व्हावी, यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील या बैठकीसाठी आले असता, बैठकीत उपस्थित असलेल्या काहींनी ‘जय श्रीराम’ नावाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील बैठकीतून निघून गेले. दरम्यान…
