Author: अनंत पांगारकर

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेकांनी हुतात्मे पत्करले. मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा निर्मितीला मोठा इतिहास आहे. देशाच्या विकासामध्ये आपल्या राज्याचा वाटा सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त थोरात यांच्या हस्ते संगमनेरमध्ये शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, विविध परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचा विकासातील अग्रगण्य राज्य म्हणून देशात लौकिक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे आपण 75 वे तर राज्याच्या निर्मितीचे 63 वे वर्ष साजरे करीत आहोत. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि नवनिर्मित महाराष्ट्राचे…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोवीड संकटानंतर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी मेटाकुटीला आला होता‌. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने सामान्य माणसांचा हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगत राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या निर्णयाची जंत्रीच वाचून दाखवली. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री विखे यांच्या समवेत यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,…

Read More

आळेफाटा, पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलिसानी रविवारी ( ता. ३० एप्रिल) रोजी पिंपळवंडी परिसरात पकडले आहे. त्यानंतर आरोपीला घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नवनाथ आनंदा चव्हाण (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घारगाव शिवारात एका अल्पवयीन मुलीवर नवनाथ आनंदा चव्हाण (रा. खैरदरा कोठे बुद्रुक) याने २३ एप्रिल २०२२ रोजी अत्याचार केला होता. त्यामुळे घारगाव पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर…

Read More

शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘‘सर्वसामान्य जनतेला आता ६०० रुपये ब्रासने घरपोच वाळू मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात आज महाराष्ट्र दिनी अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात महाराष्ट्र दिनापासून मोठ्या थाटामाटात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे ही तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र महसूलमंत्र्यांचे खास लक्ष असलेल्या संगमनेरात मात्र नव्या धोरण लागू होण्यापूर्वीच जेसीबीद्वारे वाळू तस्करी होत असून मोठ्या प्रमाणात वाळू साठे तयार करण्यात आल्याचे महसूलच्या कारवाईत समोर आले आहे. संगमनेरात विद्यमान महसूलमंत्र्यांनी वाळू तस्करांचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात असले तरी हा दावा महसूलनेच केलेल्या कारवाईमुळे खोटा ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे रविवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये महसूलच्या पथकाने पाठलाग करत जेसीबी ताब्यात घेतला तसेच काही अंतरावर पथकाला मोठ्या…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्नविधी वेळेवर व्हावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी गाव पातळीवर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभामध्ये ठराव घेण्यासाठी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिनींनी पुढे सरसावल्या आहे. चुकीच्या प्रथांविरोधात त्यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन दिले. त्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले. लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर तसेच मृत्युनंतर करण्यात येणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीमध्ये वृषाली कडलग, ॲड. सीमा सातपुते, स्नेहलता कडलग, माधुरी शेवाळे, डॉ. नीलम शिंदे, डॉ. श्रद्धा वाणी, सुधा नवले, कस्तुरी शेवाळे आदींचा समावेश होता. निवेदनात…

Read More

विश्लेषण ☆ अनंत पांगारकर संगमनेरच्या म्हाळुंगी नदीवरील पुलावरून चालू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यातून संगमनेरकर पुरते गोंधळून गेले. थोरात-विखे यांच्या पत्रोपचारामुळे या खचलेल्या पुलाखालून बरेच पाणी वाहून जात आहे. थोरात-विखे समर्थकातील पुराव्यांच्या शीतयुद्धामुळे पूल होण्यास नेमके कोण आडकाठी आणत आहेत हेही आश्चर्यकारकरीत्या लोकांसमोर आले असताना जनतेचे मूलभूत प्रश्न आणि विकास कामांच्या सोडवणुकीमध्ये तरी किमान राजकारण आणू नये, अशी सर्वसामान्य जनतेची रास्त अपेक्षा आहे. थोरात-विखे यांच्यातील संघर्ष अलीकडे अधिक टोकदार झाला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होऊन जनता भरडली तर जाणार नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवर स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेल्या पक्क्या…

Read More

राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागांवर मोठा नेत्रदीपक विजय मिळविला आहे. त्यामुळे या बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व कायम राहिले. संगमनेर आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजी-माजी महसूल मंत्र्यांनी एकमेकांविरोधात आपले पॅनल उभे केले होते. निवडणूक निकालानंतर दोघांनीही आपापल्या बाजार समित्या कायम राखल्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात यांच्या तर राहत्या मध्ये विखे यांच्या नेतृत्वाखालील मंडळांनी सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविल्याने दोन्ही सामने बरोबरीत सुटले आहे. राहाता बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ…

Read More

शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यात गतिमान करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिले. महसूल मंत्री विखे पाटील यांनी‌ लोणीयेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित वाळू धोरण राज्य शासनामार्फत…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता, तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली असून १५ भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांची जबाबदारी…

Read More