Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – मनामनात दरवळणारी गाणी.. सुमधूर आवाजातून सादर होणार्‍या एकामागून एक सुरेल रचना.. हिंदी, चित्रपटगीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिक्स.. निवेदकाचे समयोचित निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या सुमधूर आवाजातील गाण्यांनी सजलेल्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. गणेश आरतीचा यांना मिळाला मान: राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्‍या दिवशी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनु राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदींच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली. प्रेक्षकांना…

Read More

दराडे कुटुंबावर काळाचा घाला, एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषाचा मृत्यू  महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी – संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अझमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी व मनाला सुन्न करणारी घटना घडली. १० दिवसापुर्वी येथील मितभाषी व जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. गुरुवारी (२१ सप्टेंबर) त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असतांना काकस्पर्श होण्याआधीचं त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय ४०) याचादेखील ह्रदय विकाराने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दशक्रिया विधीतच घडली घटना: पिप्रींलौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवारी त्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य या कंपनीच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्पे होते. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा कविता संपत भोसले, सदस्या प्रमिला भोसले, प्रमोद शिंदे, रेवणनाथ वर्पे, मच्छिंद्र वर्पे, प्रवरेचे प्राचार्य जगदीश मुंतोडे, रोहिदास वाडेकर, ऋषीकेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सावली सर्विसेसचे अधिकृत विक्रेते सत्यजित वाडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. हिंदुस्तान फिड्स पशुखाद्य कंपनीतर्फे रविंद्र पवार, नितीन ननवरे, डॉ. केतन पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. रविंद्र पवार यांनी दुधाचे अन्नातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बहुजन उद्धारक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ३७० गड किल्ल्यांपैकी २९६ गड किल्यांवर केरळ येथील शिवप्रेमी पर्यटकाने सायकल परिक्रमा केल्याने महाराष्ट्रातील गिर्यारोहक आणि पर्यटन प्रेमीमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. केरळ येथील एस. के. हमराज तथा शिवराज गायकवाड हे १ मे २०२२ रोजी केरळ येथुन सायकलवर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. उद्देश एकच फक्त शिव विचारांची प्रेरणा त्यांनी आतापर्यंत २९६ गड किल्ले सर केले आहेत. घनदाट जंगल-झाडी, कडे-कपारीतून वाट काढत ते किल्ल्यांवर पोहोचतात छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव यावेळी त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात प्रवासात अनेक जण आस्थेवाईकपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. मात्र मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह सर्वच आरोपी अद्यापही बाहेरच असल्याने या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे. यांनी दिले निवेदन: महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी दूधगंगा खातेदार-ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने मोहन लांडगे, पोपट आगलावे, कैलास देशमुख, प्रभाकर रहाणे, सुनील सातपुते, मोरेश्वर जगताप, अनिल जोंधळे, चंद्रभान लांडगे, विकास सहाने, पुंजाहरी जोर्वेकर, शिवाजी कोल्हे, भारत सातपुते आदींनी त्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एखादा उपक्रम सातत्याने पंधरा वर्ष राबवणं आणि त्याद्वारे एकाहून एक सरस कार्यक्रमांचे आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने याही पुढे जावून समाजासाठी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी ‘संगमनेरचा राजा’ म्हणून संबोधल्या गेलेल्या श्रींच्या देखण्या मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित करुन वेगळा पायंडाही घातला आहे. याशिवाय संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर शहर व तालुक्यात देदीप्यमान यश मिळवणार्‍या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा गौरव होणं ही अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या पंधराव्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कौटुंबिक वादातून पत्नीने संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून पतीने सासुरवाडीला जात पत्नीसह मेव्हणा आणि आजी सासूची निर्घून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सासू सासरा आणि मेहुणी यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिर्डीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीला नाशिक मधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. शिर्डीत घडले हत्याकांड: शिर्डीच्या सावळीविहीर गावात विलासनगरमध्ये बुधवारी रात्री अकरा वाजता हे हत्याकांड घडले. या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला असून वर्षा सुरेश निकम (वय 24 वर्ष), रोहित चांगदेव गायकवाड (वय 25 वर्ष) व हिराबाई धृपद गायकवाड (वय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांचे लाच घेताना नाशिकमध्ये महिला अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. स्नेहल सुनील ठाकूर असे या महिला व्यवसाय कर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचेचे कारण: दोन वर्षांपासून बंद असलेल्या कल्पदीप इंडस्ट्रियल सिक्युरिटी सर्विसेस या कंपनीचा व्यवसाय कर रद्द व्हावा, यासाठी तक्रारदाराने 13 सप्टेंबरला व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. हा व्यवसाय कर रद्द करून द्यायच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर (वय 52, रा. ग्रँड अश्विन हॉटेल जवळ, ASM 26/26 अश्विन संकुल रो हाऊस नंबर 4, अश्विन नगर, नाशिक) यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. पालकत्व कसे निभावयाचे ते आम्हांला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी खोचक टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. संगमनेर येथील शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा सल्ला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना दिला. थोरात म्हणाले, पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने, त्यांचा राग मी समजू शकतो. धाकदपटशा आणि…

Read More