Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई: राज्यसरकारने महत्त्वाच्या खात्यांसाठी निधीची तरतूद करत असताना काही समतोल राखणे गरजेचे आहे. त्यांनी कृषी खाते, आरोग्य खात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि पोलीस खात्यासाठी केलेली तरतूद यातील तफावत दाखवून देत हा मुद्दा मांडला. विधान परिषदेत गुरुवारी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी सहभाग घेतला. आपल्या भाषणामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे. इथल्या शेतकऱ्यांना योजनेच्या पैशांऐवजी आधाराची आणि मदतीची गरज असते. मात्र आकड्यांकडे पाहाता या क्षेत्रासाठीची तरतूद ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. पोलीस खात्यासाठीच्या तरतुदीमध्ये 26 टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो. एकीकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गावच्या पोलीस पाटलाच्या पुढाकारातून प्रशासनाच्या अजंठावर विषय आल्याने संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील शेत शिवार रस्त्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न महसूल विभागाच्या महत्त्वकांक्षी महा राजस्व अभियानातून अखेर साकार झाले. अभियानातून घर आणि शेतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळाल्याने शेतकरी आनंदित झाले. सावरगाव तळ येथील विठ्ठल बाजीराव नेहे, जालिंदर सोपान नेहे, शांताराम सोपान नेहे, रावसाहेब यादव नेहे या चार शेतकऱ्यांना घरापर्यंत जाण्यासाठी पायवाट सुद्धा व्यवस्थित नव्हती. तर रघुनाथ लहानु नेहे, नंदराम सीताराम नेहे, बाळासाहेब सिताराम नेहे, रोहित सोमनाथ नेहे, मनाजी मार्तंड नेहे आदि दहा शेतकऱ्यांना त्यांच्या पंधरा हेक्टर शेतीत जाण्या-येण्यासाठी रस्त्याची अतिशय गैरसोय होती. या शेतकऱ्यांना आपला शेतमाल अंदाजे एक किलोमिटर पर्यंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्या पेन्शनच्या मागणी करिता तीन दिवसांपासून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना व्हाट्सअपवर नोटीसा पाठविल्या असून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा तरतुदींचा भंग केल्याचे नमूद करत आपल्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई का करू नये? ‘काम नाही वेतन नाही’ या धोरणाने संप कालावधीतील वेतन कपात का करू नये, अशी विचारणा नोटिसीद्वारे केली आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सही-शिक्क्यानिशी गुरुवारी कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या आत नोटीसीचा खुलासा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ भाऊराव घुगरकर यांची राष्ट्रीय पातळीवरील को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर वाटचाल करणाऱ्या या कारखान्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक काम केले आहे. मागील हंगामात 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप करताना दरवर्षी सातत्याने विक्रमी भाव दिला आहे. याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करून या कारखान्याने 5500 मेट्रिक टन क्षमता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था या संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना ‘जीवनदायी’ ठरली आहे. या योजनेत २०१७ ते २०२२ या मागील पाच वर्षात १८ हजार ८२३ रूग्णांवर उपचार करण्यात आले. या उपचारांच्या खर्चापोटी शासनाकडून रूग्णालयास १०९ कोटी ४८ लाख ४२ हजार रूपयांच्या विमा रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे, अशी माहिती रूग्णालयाचे प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी दिली. तळागाळातील श्रमजीवी असो वा, मध्यमवर्गीय कुटुंबीय असो, आरोग्यविषयक प्रश्न उद्भवल्यास खर्चाचा प्रश्न उभा राहतो. अनेक आजारांवरील औषधोपचाराचा खर्च प्रचंड आहे. दिवसागणिक होणाऱ्या खर्चाचे आकडे हजार ते लाखाच्या घरात पोहोचतात.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत सन २०२२-२३ अंतर्गत नाशिक विभागात संगमनेर पंचायत समितीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येते. नाशिक विभागस्तरीय समितीने पंचायत समितीला भेट देऊन सर्व विषयांची पडताळणी केली. सन २०२१- २२ च्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी एकूण ४०० गुणांची प्रश्रावली निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये पंचायत समितीचे सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग, तसेच शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, विभाग तसेच शाक्षत विकास ध्येये अशा विविध विभागांची पडताळणी करून गुणांकन देण्यात आले. पंचायत समितीस 400 पैकी 328.42. एवढे गुणांकन प्राप्त होऊन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणी सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्या सोनारासह पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वकिलांनी बँकेच्या तसेच व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेमध्ये गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याने या प्रकरणातील 33 आरोपींशी संगनमत करून बँकेत बनावट सोने ठेवून कर्ज घेतले. यात बँकेची 68 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक नंदकिशोर म्हस्के यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह आणखी काही आरोपींनी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई: पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यासाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपकऱ्यांना पाठिंबा दर्शवित नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सहकाऱ्यांसह विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. संपामुळे होणारे जनतेचे हाल लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांची तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात तांबे यांनी राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात पाठिंबा पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सर्वच कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील आधार हिसकावून घेतला आहे. या अगोदर देखील अनेक आंदोलने, मोर्चे तसेच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. मोठा संघर्ष करत त्यांनी संगमनेर तालुक्यात विविध संस्था उभ्या करत त्यातून तालुक्यात समृद्धी आणली असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते, टिडीएफ शिक्षक संघटनेचे राज्य सचिव हिरालाल पगडाल यांनी केले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात पगडाल बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर सहकारातील जेष्ठ नेते मधुकर नवले, अरुण कडू, उद्योजक राजेश मालपाणी, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, सुरेश थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: कृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांचे विचार आणि जीवन कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक मधुकरराव नवले यांनी केले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. शिक्षक नेते हिरालाल पगडाल कांचनताई थोरात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख अरुण कडू उद्योजक राजेश मालपाणी सुरेश…

Read More