Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ संगमनेर मधील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना मिळाला. राजधानी दिल्लीत या पुरस्काराचे नुकतेच त्यांना वितरण करण्यात आले. राज्याच्या शिक्षण विभागासाठी हा पुरस्कार अभिमानास्पद ठरला आहे. महिला दिनानिमित्त रविवारी दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित ‘मुलींवरील हिंसाचार – आव्हाने आणि मार्ग’ या राष्ट्रीय परिषदेत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड, पंडित बिरजू महाराज नृत्यरत्न पुरस्कार, राष्ट्रीय संगीत रत्न पुरस्कार, योग रत्न पुरस्कार आणि फॅशन आयकॉन ऑफ इंडिया या पुरस्कारांचे वितरण खासदार सुनीता दुग्गल, राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एका प्रतिष्ठित डॉक्टरला तब्बल चार लाखांना ऑनलाइन गंडा घातला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्यांना कुठलाही ओटीपी आलेला नव्हता. त्यामुळे हा ऑनलाइन गंडा कुणी घातला आणि कसा घातला ? याचा शोध सायबर पोलिसांना घ्यावा लागणार आहे. नाशिकमधील कॉलेजरोड येथील विजन हॉस्पिटलचे डॉ. विनोद विजन यांना हा गंडा घातला गेला आहे. यामध्ये केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने हा गंडा घातला गेल्याचे त्यांची स्नुषा डॉ. सृष्टी विक्रांत विजन‎ यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार 1 ते 2 मार्च दरम्यान त्यांना मोबाइलवर केवायसी अपडेट करण्याच्या संदर्भात मेसेज आला होता. त्यावरून डॉ. विजन यांनी क्लिक केले होते. त्यानंतर माहिती वाचत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- श्री. दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ, संस्कृत विभाग, संगमनेर महाविद्यालय शाळा समुह योजना, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत व इंग्रजी विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने भरघोस बक्षिसे मिळविली. संस्कृत विविध गुणदर्शन स्पर्धेत प्रातःस्मरणाचे २१ श्लोक, भगवद्गीतेच्या १२ व्या, १५ व्या व १६ व्या अध्यायांचे शुद्ध उच्चारणासहीत पाठांतर करीत इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी तीन सांघिक व पाच वैयक्तिक बक्षिसे मिळविली. त्यात द्वितीय गटास प्रथम तर तृतीय व चतुर्थ गटास द्वितीय सांघिक पारितोषिक मिळाले. तसेच आदिती सचिन नवले हिस प्रथम, श्लोक अमोल सुपेकर यास द्वितीय, अरुष प्रवीण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यासाठी राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी मंगळवारपासून (१४ मार्च) बेमुदत संपावर जात आहेत. या संपास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. यासंबंधी काढलेल्या पत्रात आमदार तांबे म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या वृद्धपकाळातील आधार हिसकावून घेतला आहे. या अगोदर देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, तसेच शासन स्तरावर पाठपुरावा झाला परंतु दुर्देवाने त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. यासाठी शासनाने जर चांगल्या पद्धतीने नियोजन केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संप काळात अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घेण्यासोबतच नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व विभाग प्रमुखांनी घेण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनाला दिले आहेत. संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक असल्याची सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. संप काळात संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे, अशा स्थितीत राज्य सरकारने कांद्याला प्रती क्विंटल तीनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे असून कांदा उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता सरकारने हे अनुदान किमान पाचशे रुपये करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. विधान भवन परिसरात थोरात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, अवकाळी पावसाने शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भाजीपाला, कांद्याला बाजारात भाव नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांवर नांगर फिरवत आहे. कांद्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी साधारणता अकराशे ते बाराशे रुपये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पाऊले टाकणाऱ्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींच्या टोळीकडून पथकाने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी संगमनेर मध्ये उच्छाद मांडला आहे. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्याने या गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले असतानाच नव्या निरीक्षकांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी उचललेली पावले कौतुकास्पद ठरली आहे. नवीन निरीक्षक मथुरे आपल्या कामाची छाप संगमनेरकरांमध्ये कशा पद्धतीने पाडतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. अल्पवयीन बालकासह सुमित संजय कदम (रा.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेरनजीक निमगाव जाळी गावाजवळ चिंचपूर फाटा येथे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडविले आहे. धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला असून पायांसह कमरेखालील भाग निकामी झाल्याचे सांगितले जाते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी बिबट्याला उपचारासाठी निंबाळे येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत आणले. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संगमनेर लोणी रस्त्यावर चिंचपूर फाटा येथे असलेल्या अस्मिता दूध डेअरीजवळ ही घटना घडली. बिबट्याला दिलेल्या जोराच्या धडकेनंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. तर गंभीर जखमी झालेला बिबट्या वाहनाच्या धडकेने उडून जवळच्या झुडपात जाऊन पडला होता. त्याच्या विव्हळण्याचा आवाजाने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी याची माहिती वनविभागाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरः संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी शब्दकोष समृद्ध करून शब्दज्ञान अत्यावश्यक आहे.  असे प्रतिपादन डॉ. रवींद्र मुळे यांनी केले. श्री दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना संगमनेर केंद्र व संगमनेर महविद्यालयातील संस्कृत भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विविध गुणदर्शन मराठी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, श्रीमती सुवर्णा मालपाणी, प्राचार्य डॉ. प्रो. डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य मुकुंद डांगे, प्रा. अरुण लेले, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, स्पर्धा समन्वय अधिकारी डॉ. रोशन भगत आदी उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले, वर्णोच्चारण स्थानाचे ज्ञान, आवाजातील चढ-उतार, शब्दस्वरूप या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यासाठी राज्यभरातील विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (१४ मार्च) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे या संपामध्ये संगमनेर नगर परिषदेतील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. संपामध्ये सहभागी होत असल्याच्या आशयाचे पत्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आले आहे. या संपामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याने पालिकेतील अत्यावश्यक सेवा कोसळण्याची चिन्हे आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, संवर्ग अधिकारी, स्थानिक नगर परिषद कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्या तसेच जुनी पेन्शन लागू करणेबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचनालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच नगर विकास मंत्री यांच्यासोबत बैठक…

Read More