Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी, अहमदनगर जिल्ह्याच्या सहलीवर असलेल्या दर्यापूर (जि. अमरावती) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या ९४ मुले व ५ शिक्षकांना शिर्डीच्या साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे मुले व शिक्षकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. असे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे. मुले व शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम वडगावे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथील आदर्श हायस्कूल मधील २२७ मुले-मुली व १५…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाकडे मात्र नेत्यांची फळी असताना देखील प्रकृती अस्वस्थ असताना देखील खासदार गिरीश बापट यांना गुरुवारी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराकरिता बोलाविण्यात आले होते. त्यामुळे रासने यांच्या प्रचारासाठी व्हीलचेअरवर केसरी वाड्यात उपस्थित राहिलेल्या बापट यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वजनदार नेते पक्षाकडे असतानाही कसबा पेठ पोटनिवडणुक भाजपसाठी अवघड बनल्याने गुरुवारी प्रकृती अस्वस्थ असतानाही खासदार गिरीश बापट यांना प्रचार करण्यासाठी बोलविण्यात आले. गुरुवारी व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 1995 मध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री पद भुषविणार्या शिवसेनेच्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह महादेव भोसले आणि आणखी एका महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत व मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे 37 वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2012 पासून बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी भा.द.वि. 376, 377, 406, 420, 506…
नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी; कोश्यारी यांच्याप्रमाणेच बैस यांची झारखंडमधील कारकीर्द वादग्रस्त
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये होत आहे. या समारंभात रमेश बैस आपली राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान नव्या राज्यपालांकडून महाराष्ट्राचा व महापुरुषांचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोश्यारी यांच्याप्रमाणे नव्या राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुली म्हणून काम पाहू नये, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांची झारखंड मधील कारकीर्द भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणेच वादग्रस्त राहिली आहे. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बैस केंद्रीय राज्य मंत्री होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी केंद्रात माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री तसेच रसायने व खते राज्यमंत्री, 2003 मध्ये केंद्रीय खाण मंत्रालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्य विद्युत लाईनच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जोराचा धक्का बसल्याने एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकुर येथे घडली आहे. मोहन भिवाजी मोरे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साकुरमधील वनवे नगर येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, जावेद अब्दुल शेख यांच्या घरापासून वीज वितरण कंपनीचे मुख्य प्रवाह असलेले विजेची तार गेलेली आहे. शेख यांच्या घराच्या गच्चीवर मोहन भिवाजी मोरे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना अचानक त्यांचा या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या संकेत नवले याच्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपी निष्पन्न केले असले तरी त्यांच्याकडून पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळविता आलेली नाही. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने देखील पोलिसांच्या मागणीवरून या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींवर तपास सुरू असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत असून आता या हत्येच्या तपासाचे धागेदोरे थेट परदेशात जाऊन पोहोचले असल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. मात्र मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच पोलिसांना यातून काय हाती लागेल हे लवकरच समोर येईल. दरम्यान याप्रकरणी अटक केलेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष लेख आयुष्यात आपण वेगवेगळया लोकांकडून अनेक गोष्टी शिकत असतो. काहींकडून आपल्याला थेट शिकायला मिळते तर काहीवेळा आपल्याला एकलव्याची भूमिका पार पाडावी लागते. मात्र माझ्या बाबतीत कॉर्पोरेट क्षेत्रात थेटपणे आणि एकलव्याच्या भूमिकेतून अशा दोन्ही माध्यमातून मी ज्या व्यक्तीकडून खूप काही शिकलो त्यातले सर्वात महत्वाचे नाव म्हणजे श्री. राजेश मालपाणी. 32 वर्षांपूर्वी त्यांनीच नोकरीसाठी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या व्यक्तीबद्दल मला कधीतरी सविस्तर लिहिण्याची संधी मिळेल. परंतू तो योग जुळून आला आणि राजेश भाऊंच्या कॉर्पोरेट आयुष्याचा वेध घेणारे पुस्तक माझ्या हातून साकारले. पुस्तकाला नाव दिले ‘ओपन सिक्रेट’ हे माझे तेरावे पुस्तक. संगमनेरमधील जाणता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे उमेदवारीपासून चर्चेत असून त्यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले असताना आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. ‘कामाचा माणूस’ अशी ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सिद्ध केली असल्याचे ते म्हणाले. नेमके काय घडले आणि आमदार तांबे असे का म्हणाले… सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना तानसा धरणातून कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासाबद्दल दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली होती. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, बीबीसी न्यूज मराठीच्या वृत्तानुसार शहापूर तालुक्यातील तानसा धरण पाणलोट क्षेत्राच्या आसपासच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मारुती कंपनीच्या रिट्स कारमधून संगमनेर पोलिसांनी गुरुवारी पहाटे गोमांस पकडले आहे. कारवाई दरम्यान कार चालक फरार झाला. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर रायतेवाडी गावच्या शिवारात पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी पकडलेल्या संशयित रिट्स कारमधून राज्यात गोवंश जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून गोमांस वाहतूक होत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले. पोलिसांनी गोवंश जनावरांच्या गोमांस, कारसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारवाईदरम्यान अंधाराचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सिद्धराम सालीमठ यांनी बुधवारी बदली झालेले जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या सरकारने मंगळवारी बदल्या केल्या होत्या. भोसले यांच्या जागेवर सरकारने सिद्धाराम सालीमठ यांचे नियुक्ती केली. बुधवारी सालीमठ यांनी लगेचच भोसले यांच्याकडून नव्या पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली मुंबईसह उपनगर जिल्हाधिकारी पदावर झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हा पदभार समारंभ पार पडला. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी देखील डॉ. भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उज्वला गाडेकर,…
