Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातामध्ये लष्करातील १६ जवान ठार झाले आहे. तर चार जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने थेट दरीत कोसळला. भारतीय लष्कराने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, 23 डिसेंबरला उत्तर सिक्कीममधील गेमा येथे एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा एक भाग होता, जे सकाळी चाटणहून थांगूच्या दिशेने निघाले होते. उत्तर सिक्कीम हा अतिशय धोकादायक भाग असून तो पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे. गेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर लष्कराचे हे वाहन तीव्र उतारावरून घसरले. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज राजकारण परिस्थितीवर अवलंबून असते त्यामुळे कोठे जाऊन काम करू शकेल हे निश्चित नसले तरी 2024 ची विधानसभा निवडणूक आपण लढविणार आहोत पण मामांच्या विरोधात नाही, असे स्पष्टच सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर भाजपची नजर असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तांबे म्हणाले पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असून त्यांच्यामधील कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी संग्राम निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या विद्यार्थ्यांमधील नैपुण्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालय व संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय आणि डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संगमनेरमध्ये संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंध मतिमंद मूकबधिर अस्थिव्यंग प्रवर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. यावेळी तांबे बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, सहाय्यक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : प्राॅपर्टी कार्डमधील चुका दुरूस्त करण्याचे अधिकार आता भूमी अभिलेख विभागातील उपअधिक्षकांना मिळाल्याने स्थानिक कार्यालयातच याबाबतचे निर्णय करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनूसार झालेल्या निर्णयाचा मोठा दिलासा असंख्य प्राॅपर्टी कार्ड धारकांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. प्राॅपर्टी कार्डमधील होणाऱ्या चुकांबाबत असंख्य तक्रारी भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त होत होत्या. मात्र याबाबतचे अधिकार फक्त जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला असल्याने नागरीकांची मोठी अडचण होत होती. तक्रारींची संख्या आणि याबाबत निर्णय होण्यास लागणारा विलंब यामुळे नागरीकांच्या प्राॅपर्टी कार्ड मधील चुका वर्षानुवर्षे तशाच राहत होत्या. नगर येथील कार्यालयामध्ये हेलपाटे मारूनही असलेल्या चुका दुरूस्तीचे काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील अमृतवाहिनी महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येला पंधरा दिवसांचा कालावधी उलटत आला तरी पोलीस अद्याप मारेकऱ्यांचा शोध लावू शकले नाही. यामुळे पोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ नवलेवाडी (अकोले) येथे नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी मशाल मोर्चा काढला होता. संकेत नवले याचा मृतदेह आठ डिसेंबरला शहरानजीकच्या सुकेवाडी रस्त्यावर एका नाल्यात आढळून आला होता. संकेत नवले याचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केला असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेला जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटत असताना पोलिस अद्याप या खून प्रकरणाचा काहीही उलगडा करण्यास अपयशी ठरले आहे. खून प्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागू शकलेले नाही. त्यामुळे संकेतच्या मारेकरांचा शोध घेणे दिवसेंदिवस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. विरोधी महाविकास आघाडीसाठी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारकडून दिला गेलेला हा मोठा धक्का समजला जात आहे. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. यावेळी विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी आमदार वेलमध्ये उतरले. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून असंविधानिक शब्द उच्चारत अध्यक्षांना सुनावले. यावेळी त्यांनी अध्यक्षांना उद्देशून अपशब्द…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसते. शहरातील महिलेला श्री गणेशाला हार व प्रसाद अर्पण करण्याच्या बहाण्याने तिच्याकडील पावणेदोन तोळ्याचे सोने लंपास करण्याचा प्रकार शहराच्या मध्यवस्तीत घडला. शहर पोलिसांनी या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास फसवणूक झालेली महिला तिच्या मालकीच्या पान टपरीवर असताना तेथे आलेल्या अज्ञात व्यक्तीने, मावशी मला गायछाप द्या. असे म्हणत जवळ असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमधील हार व प्रसाद मला मंदिरातील पुजारी यांना दान करायचा आहे असे सांगत येथे गणपती मंदिर कोठे आहे. अशी विचारणा केली. त्यावर संबंधित महिलेने गणपती मंदिर विज वितरण कंपनीजवळ असल्याचे त्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही, अशी मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली आहे. राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा, रेंगळलेली शिक्षण भरती, शिक्षण विभागातील रिक्त पदे, आणि शिपायांच्या रिक्त पदाच्या संख्येबाबत विधानसभेच्या विशेष बैठकीत चर्चा झाली. या अनुषंगाने काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार अमित देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर माहिती देताना केसरकर यांनी ही घोषणा केली. आमदार अमित देशमुख यांनी नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथे 43 पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली असल्याचा मुद्दा…
महाराष्ट्र संवाद न्यूज निफाड : सेवानिवृत्तीस पाच महिन्यांचा कालावधी राहिला असताना महिला नायब तहसीलदार कल्पना शशिकांत निकुंभ यांच्यासह त्यांचा साथीदार कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराची पिंपळगाव नजीक असलेली शेत जमीन बिनशेती करण्यासाठी प्रलंबित असलेल्या कामकाजाबाबत निफाड तहसील कार्यालयात प्रलंबित असलेल्या फाईलवरील कार्यालयीन टिप्पणीवर सही करून ते प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यासाठी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्याने यासंदर्भात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री केली असता तडजोडीअंती पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी दुपारी चार वाजता लाचखोरांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात असलेला पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील काही आमदारांचे, काही तत्कालीन मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तसेच त्यांनी दिल्लीतही एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे समोर आले होते. सत्ताबदल झाल्यानंतर रश्मी शुक्लांना क्लिनचीट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र, कोर्टाने हा…
