Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – “नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे. आता या संघर्षासाठी ‘अभी नही, तो कभी नही’ अशी वेळ आली आहे,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष – नाशिक-पुणे रेल्वेच्या थेट मार्गासाठी गेल्या काही काळापासून जनआंदोलन उभे राहिले आहे. या प्रश्नी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बैठक घेण्याचे कबूल केले असले, तरी अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीची…
पुणे/अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. २ कोटी १० लाख रुपयांचे ‘मेफेड्रोन’ (MD) ड्रग्ज जप्त केल्यानंतर, या काळ्या धंद्याचे धागेदोरे चक्क अहिल्यानगर पोलीस दलातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी श्याम गुजर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून, खाकी वर्दीला लागलेल्या या डागामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात होती. १७ जानेवारी रोजी शिरूर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना ड्रग्ज विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार १८ जानेवारीच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर, आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील गरजू आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या नगरपालिका शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शाळांच्या कामकाजाची पाहणी सुरू केली आहे. यामुळे लवकरच नगरपालिकेच्या शाळांचे रूप पालटणार असल्याचे संकेत मिळत असून शैक्षणिक क्षेत्रात या दौऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे. नगरपालिका शाळांमधून उद्याचे सक्षम नागरिक घडत असतात, मात्र बदलत्या काळानुसार या शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गरज ओळखून डॉ. मैथिली तांबे यांनी शिक्षण…
संगमनेर, प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे बंद झाल्याने संगमनेर तालुक्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते गुड्डू इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांना निवेदन दिले. मुंडे यांच्या वतीने नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या अडचणी मांडत हप्ते पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावर प्रशासनाने आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, तालुक्यातील अनेक अत्यंत गरीब महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचे हप्ते अचानक बंद झाले…
संगमनेर, प्रतिनिधी – शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या प्रतिमा गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर, याविरोधात कायदेशीर लढा देणारे तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. सुरुवातीला तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखी माफीनामा सादर करत आपली चूक मान्य केली आहे. या निर्णयामुळे सत्य समोर आले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड होत असल्याची तक्रार संजय मंतोडे यांनी प्रशासनाकडे केली होती. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही बातमी समोर…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची साथ उत्तम असल्याने तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम कराल. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी घाईने निर्णय घेणे टाळावे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीमुळे एखादा कठीण प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. प्रवासाचे योग येतील, मात्र प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – तुमच्या संवादकौशल्यामुळे आज अनेक…
संगमनेर/जळगाव – महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती असून भाजपच्या खेळीमुळे राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाचे मोठे नुकसान होत आहे. गटातटाचे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी असून सरकारने आता तरी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यादरम्यान जळगाव जामोद येथे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘सातपुडा कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर…
सिन्नर – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेचा मूळ आराखडा बदलून तो शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी आणि रेल्वे कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–चाकण असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या कामात रेल्वेमुळे अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने नवीन पर्यायी मार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा प्रस्तावित केला आहे. या बदलाची माहिती समोर आल्यापासून मूळ मार्गावरील भागात तीव्र अस्वस्थता असून, हा बदल…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी काल (सोमवारी) पार पडल्या असून, यामध्ये एका महिला नगरसेविकेची कामगिरी सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांना देखील ज्या समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तिथे विरोधी पक्षाच्या एकमेव महिला नगरसेविकेने सर्वच समित्यांवर आपले स्थान निश्चित करून एक नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. संगमनेर पालिकेत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील सेवा समितीचे…
संगमनेर, प्रतिनिधी – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाच्या कामाबाबत ‘RGSS’ टीमने आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मैदानावर उतरून कामाची गुणवत्ता तपासली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तात्काळ आपल्या तज्ज्ञ टीमला पाचारण केले आणि प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणीचे आदेश दिले. मालपाणी ट्रक टर्मिनसपाशी असलेल्या उड्डाणपुलावर करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या जाडीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, RGSS टीमने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाची सखोल चौकशी करत पाहणी केली. नाशिक पुणे महामार्गावर मालपाणी इंडस्ट्रीज लगत असलेल्या उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाची जाडी काही ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा कमी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. यासंदर्भात RGSS कडे…
