Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज एखाद्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा नेणं माझ्या मनाला पटत नाही, खरंतर असा मोर्चा प्रांताधिकारी अथवा कलेक्टर कचेरीवर काढायला हवा या मताचा मी आहे. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पार्टीचा हा मोर्चा आहे. मोर्चेकरांच्या प्रश्नासोबत आम्ही आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. किसान सभेसह विविध संघटनांचा अकोलेपासून महसूल मंत्र्यांच्या लोणीतील कार्यालयावर पायी मोर्चा बुधवारी निघत असून तीन दिवस हा मोर्चा चालणार आहे. नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नगर मनमाड महामार्गाची काळजी करणा-या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्षानुवर्षे सर्व सत्तास्थानं हातात असतानाही वीस वर्षांपासून रखडलेल्या कुप्रसिध्द संगमनेर – कुरण – पोखरी हवेली रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस हाफीज हैदर शेख यांनी उपस्थित केला आहे. शेख यांनी म्हटले की, संगमनेर पोखरी हवेली हा रस्ता अतिशय दयनिय झाला आहे. परंतू विकासाच्या गप्पा मारणा-यांना बाहेरच्या रस्त्यांची काळजी करुन बोलायला वेळ आहे. परंतू संगमनेर शहरानजीक असणा-या रस्त्यांवर बोलायला सवड सापडत नाही याचे आश्चर्य वाटते. संगमनेर शहराच्या बाजारपेठेत कुरण, देवकौठे, पारेगाव खुर्द, बुद्रूक, आशापिरबाबा, तळेगाव, नान्नज, पोखरी हवेली…
अनंत पांगारकर • महाराष्ट्र संवाद न्यूज नगरपालिका निवडणुका होईपर्यंत म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ नये, यासाठी भाजपचेच काही नेते मुंबईत मुख्यमंत्री अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसापासून बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलासंदर्भात महत्त्वाचे विधान करताना भारतीय जनता पक्षातील वजनदार नेत्यावर शरसंधान साधले आहे. थोरात म्हणाले, स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल दुर्दैवाने पडला आहे. पाण्याचा लोंडा मोठा असल्याने पूल पडल्याने अनेक नागरिकांची अडचण झाली आहे, ही बाब…
राहाता | महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यांना केंद्रात संधी होती त्यांनी कधीच सहकार मंत्रालय सुरु करण्याबाबतचा विचार केला नाही. सहकार चळवळीचे खासगीकरण कसे होईल, असेच प्रयत्न त्यांच्याकडून झाले. स्वातंत्र्यानंतर आता देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार चळवळीला भक्कम पाठबळ दिले आहे. सहकार मंत्रालयातून होत असलेल्या निर्णयांमुळे या चळवळीच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होत आहे, असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बॅकेंच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित सहकार परिषदेचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बॅंकेचे अध्यक्ष गणेश शिंदे,…
अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. किसान सभेच्या पुढाकाराने या पार्श्वभूमीवर दिनांक २६, २७, २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन,…
महाराष्ट्र संवाद न्यूज चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेले मेसेज अठरा वर्षे वयाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसांनी अपहरणासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. अमन सलीम मोमीन असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते. अमन मोमीन याने पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला बस स्थानकावर बोलावून तेथून तिचे अपहरण केले होते. काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असलेला अमन मोमीन हा गंगामाई घाटावर आढळून आला. पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आरोपी मेसेज करत होता. वडिलांच्या मोबाईलवर सुरू असलेले हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज वडदरा (बोटा) येथे शनिवारी (22 एप्रिल) रात्री उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय 62 वर्ष) यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यामुळे घरात घुसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते मात्र कुऱ्हाडे यांच्या शवाविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाला असून कुऱ्हाडे यांचा खून करण्यात आला असल्याच्या शक्यतेने पोलीस तपास करण्यात येत आहे. नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव या महत्त्वाच्या गावालगत असलेल्या बोटा गावांतर्गत येणाऱ्या वडदरा येथे शनिवारी रात्री वृद्ध आई समवेत घरात असलेल्या उत्तम बाळाजी कुऱ्हाडे यांच्यावर घरात घुसलेल्या बिबट्याने हल्ला केला.…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील 35 लाख रुपये किमतीचा अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या गदेचा मानकरी महेंद्र गायकवाड ठरला आहे. अहमदनगरचा वाडिया पार्कमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात गायकवाड विजेता तर राक्षे उपविजेता ठरला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून हजारावर स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते,…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगरमधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रविवारी (23 एप्रिल) अहमदनगरच्या वाडीया पार्क येथील माळीवाडा जिल्हा क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर तसेच कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी…
श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज भारत ही जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्याचा परिपक्व विश्वास किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखविल्याने म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) मासिक चलनाने मार्चमध्ये प्रथमच बाजारात अस्थिरता असूनही १४,००० कोटींचा टप्पा ओलांडल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. माऊली कृषी उद्योग फाउंडेशनतर्फे आयोजित आरंभ या कृषी व्यावसायिक मित्रांच्या परिषदेत ते ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली कृषी उद्योगाचे संचालक ज्ञानेश्वर उंडे उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या पाच ते सहा वर्षातच ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल. बाजारातील अस्थिरता ही कधीही कायमस्वरूपी नसते. गुंतवणुकीची नवी संधी ती निर्माण करते,त्याचा लाभ गुंतवणूकारांनी…
