Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले बाळासाहेब थोरात हे लोकनेते असून संगमनेर तालुका व नगर जिल्ह्यासाठी ते केवळ नेते नव्हे तर आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील वेल्हाळे येथे हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुखयांच्या कीर्तनाने मंगळवारी या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. थोरात यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असून काँग्रेस हाय कमांड या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे . दरम्यान थोरात यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संबंधित असलेले थोरात काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस मधील काही नेत्यांवर थोरात नाराज असून या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना सविस्तर पत्र पाठवले असल्याची माहिती दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर येथील एका…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील खंडोबा देवस्थानच्या गडावर देवदर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेसह तिघींचे सुमारे लाखभर रुपयांचे दागिने दोन अज्ञात महिलांनी लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धारणगाव देवपूर तालुका सिन्नर येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सिंहगड रोड धायरी फाटा पुणे येथे राहत असलेल्या वनिता भगवंत घुगे वय 29 वर्ष या संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील खंडोबा मंदिराच्या गडावर देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी वनिता घुगे यांच्या पर्समधील दागिने ठेवलेला पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा बॉक्स लंपास केला. याशिवाय अन्य दोन महिलांच्य गळ्यातील मनी मंगळसूत्र व सोन्याची पोत त्यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक-पुणे महामार्गावर बोटा गावच्या शिवारामध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या नाशिक-पुणे महामार्गावर सोमवारी (ता. ६ फेब्रुवारी) रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.बोटा गावाच्या शिवारामध्ये असलेल्या विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात भक्षाच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने या तरसाला जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्याने तरसाचा जागीच मृत्यू झाला. मादी जातीचा दोन वर्ष वयाचा हा तरस असल्याची माहिती मिळाली. घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांनी यासंदर्भात वनविभागाचे रामदास थेटे यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी ज्ञानदेव कोरडे, बाळासाहेब वैराळ दीपक वायाळ आदी कर्मचाऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर कृषी क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पध्दती, दुग्धव्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक उपक्रम सावरगाव तळने राज्याला दिले असून सावरगाव तळच्या उपक्रमाचे व शेती प्रयोगांचे अनुकरण केल्यास गावे समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले. सावरगावतळ गावाने पर्यावरण, जलसंधारण, कृषी, दुधव्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिध्द ओरेगॉन विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा.अँड्र्यू मिल्सन यांनी सपत्नीक सावरगावतळ गावास नुकत्याच दिलेल्या भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी गावचे सरपंच दशरथ गाडे, पोलीस पाटील गोरक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी पदवीधर निवडणुकीत कोणतीच भूमिका स्पष्ट न करणाऱ्या थोरातांनी काँग्रेस पक्षाला सोयीनूसार वापरण्यापेक्षा भूमिका स्पष्ट केली पाहीजे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून तुम्ही व्यथित आहात काॽ असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. काँग्रेस पक्षाची भूमिका मांडा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, असे थेट आव्हान देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, तुम्ही काँग्रेस पक्षाला सोयीनुसार वापरू शकत नाही. नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत मुळातः बाळासाहेब थोरात व्यथित झाले आहेत. त्यांच्या तालुक्यातील जनता त्यांना सोडून चालली आहे. त्यांच्या तालुक्यातील चार महत्वपूर्ण गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळेच थोरात व्यथित झाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये जय राजकारण झाले आहे ते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेच झालं असल्याचा दावा अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. खासदार विखे पाटील सध्या दिल्लीमध्ये असून तेथे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. विखे म्हणाले, ज्यावेळी विधान परिषदेचे राजकारण सुरू होते त्याचवेळी गौण खनिजाच्या प्रश्नावरून संगमनेर मध्ये काही ठेकेदारांचा मोर्चा प्रांताधिकारी कचेरीवर काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी या मोर्चाला मोबाईल वरून संबोधित केले होते. मग आज नेमकं असं काय झालं की, विधान परिषदेच्या घडणाऱ्या राजकारणावर ते बोलू शकले नाहीत. जर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या संदर्भात थोरात यांनीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून या संदर्भात माहिती दिली असून पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने ट्विटरवर हे खोटे (फेक) अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंट वरून नियमितपणे ट्विट देखील केले जात होते. त्यामुळे काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी हे ट्विट अकाउंट फॉलो केले आहे.ट्विटर वरील हे बनावट खाते तयार करताना आरोपींनी थोरात यांच्या कन्या शरय देशमुख यांच्या फोटोचा वापर केला असून डीपीवर शरयू देशमुख…
संगमनेर काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले. अगदी उमेदवारीही वाटून टाकली. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे, असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात विधान परिषदेच्या निमीत्ताने झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने जाणता राजा मैदानावर ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन पद्धतीने तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, २६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर…
संगमनेर एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली. जाणता राजा मैदान येथे नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधरचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी…
