Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मालमत्ता धारकांकडून बेकायदेशिरपणे संगमनेर नगरपालिका आकारत असलेल्या शास्तीचा विषय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आता नव्या सरकारच्या नगरविकास मंत्रालयात चर्चीला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार आणि माजी नगरसेवक शिरीष मुळे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर नगरपरिषदेकडून बेकायदेशिरपणे अनधिकृत बांधकामावरील शास्ती व त्यावर चालु आर्थिक वर्षात लावण्यात येणारी प्रतिमहिना २ टक्के शास्तीचा विषय त्यांच्यासमोर मांडला. यासंदर्भात विखे पाटील यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. संबधीत विषय नगरविकास मंत्रालयाशी संबधीत असल्याने नगरविकास मंत्रालयासोबत बैठक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज विवेक बुध्दीचा वापर न करता बलात्काराच्या याचिकेसोबत आक्षेपार्ह छायाचित्रे जोडल्याप्रकरणी न्यायालयाने एका वकीलाला पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय याचिकेसोबत छायाचित्रे जोडतांना विवेकबुध्दीचा वापर केला नाही म्हणून संबधीत वकीलाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. पतीविरोधातील बलात्काराचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आरोपी पतीच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. दाखल याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर यासंबधीची सुनावणी सुरु होती. सुनावणीदरम्यान याचिकेसोबत जोडण्यात आलेली आक्षेपार्ह छायाचित्रे बघितल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकीलांना याबद्दल चांगलेच फटकारले. शिवाय अशा प्रकारची छायाचित्रे जोडणे म्हणजे पक्षकाराच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याचे सांगत संबधीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला वेगवेगळ्या नावाने मान्यता मिळाल्यानंतर आता चिन्ह देखील निश्चित झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘मशाल’ तर त्या पाठोपाठ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला अखेर ‘ढाल तलवार’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ‘मशाली’ला ‘ढाल तलवारी’ने प्रत्युत्तर देणार आहे.सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा नावाने मान्यता देत त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले होते. शिंदे गटाने दिलेले चिन्हाचे पर्याय आयोगाकडून नाकारण्यात आल्यानंतर त्यांना आज…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कट्टर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी चिन्हावरुन ठाकरे गटावर निशाणा साधत ‘आपल्याला काय घरांना आग लावायची नाही’ असा उपरोधीक टोला ठाकरेंना लगावला आहे.सध्या ठाकरे-शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टिकेकडे लक्ष न देण्याचा सल्ला आपल्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांच्याच गटाचे मंत्री असलेल्या सत्तार यांनी हा सल्ला धुडकावत आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने परवानगी देत त्यांची नांवे निश्चीत केली आहे.ठाकरे गटाला ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे’ हे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी समोर आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.बियाणी यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे बियाणी यांचे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात खासदार प्रीतम मुंडे आणि पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील धाव घेतली असून बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असलेले बियाणी यांचा जनसंपर्क मोठा आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरात गोळी झाडून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यभार येत्या 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे लळीत यांच्यानंतर चंद्रचूड नवे सरन्यायाधीश असतील.निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस एक महिना आधी करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपत असल्याने केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती.लळीत यांच्यानंतर चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असतील. त्यांचा कार्यकाल 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच दोन वर्षाचा असेल. ललित यांच्या पाठोपाठ देशाला पुन्हा मराठी सरन्यायाधीश लाभणार आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘वाट चालताना’ या पुस्तकात डॉ. संतोष खेडलेकर यांनी उत्तमचंदजी सरनोत यांचे केलेले व्यक्तिचित्रण म्हणजे एका खऱ्याखुऱ्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचा पट आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या ‘वाट चालताना’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.लोणी (ता. राहाता) येथील उत्तमचंद सरनोत यांच्या आयुष्यावर आधारित ‘वाट चालताना’ हे चरित्रात्मक पुस्तक डॉ. खेडलेकर यांनी नुकतेच लिहिले. एका व्यापारी माणसाच्या आयुष्यातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्हा परिषदेचे घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.शहर पोलीस ठाण्यात याबाबत घुलेवाडी येथील कविता संतोष अभंग यांनी फिर्याद दिली आहे. अभंग यांनी आपल्या मालकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना बसावयास परवानगी दिल्याचा राग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम राऊत यांना आला. राऊत यांनी गावातील तलाठी कार्यालय येथे अभंग यांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच गैर कायद्याची मंडळी जमीन त्यांच्या घराचे नुकसान केले.या आशयाच्या अभंग यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर-मनमाड या महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूक विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन आहे. अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा-संगमनेरमार्गे नाशिककडे किंवा विळद घाट-दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्ग वळविण्यात येणार आहे. शनि शिंगणापुर /सोनई रोडवरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाचा रात्री मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गटाचे नाव यापुढे ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे असेल. त्यांच्या गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून चिन्हासाठी त्यांच्याकडून पुन्हा पर्याय मागविण्यात आला आहे.शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते तसेच शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती त्यामुळे आयोगाने दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्हाबाबत पर्याय मागविले होते सोमवारी आयोगाने या पर्यायांवर निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांनी मशाल या…

Read More