Author: अनंत पांगारकर
आजचे राशी भविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि ध्येयपूर्तीचा आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कठीण प्रसंगांवर सहज मात कराल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. वृषभ: आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र फळांचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे ठरेल. घरातील जुने वाद मिटवण्यास आज उत्तम संधी आहे. प्रियजनांच्या भेटीमुळे मनाला उभारी मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मिथुन: आजच्या दिवशी…
मुंबई | प्रवीण पुरो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन हा घातपाताचा प्रकार असेल आणि त्यामागे कोणीही व्यक्ती कितीही शक्तीमान असेल तर आकाश पाताळ एक करून त्यांना बाहेर काढू. कोणाचीही मुलाहिजा न ठेवता त्याला शोधून काढू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाचं प्रकरण विधानसभेत उपस्थित केलं होतं. अजित पवार यांच्या विमानाला अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, असा स्पष्ट आरोप करत रोहित पवार यांनी सरकारला घेरलं होतं. या प्रकरणाची…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी श्रीरामपूर आणि अकोले पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत धामणगाव पाट येथील दरोडा प्रकरणातील टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी पकडलेल्या या टोळीने नाशिक मधील दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढकांबे येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुरेगाव, ता. श्रीगोंदा येथील बाबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवि लाला भोसले हे या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीकडून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्तवली आहे. १९ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास धामणगाव पाट येथील सुरेखा माधव भोर यांच्या घरी अज्ञात पाच इसमांनी प्रवेश करून घरातील सदस्यांना…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिकच्या सिन्नर येथील स्वयंघोषित कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असतानाच आता त्याचे धक्कादायक संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. खरातने केवळ नाशिक वा इतर जिल्ह्यातच नव्हे, तर संगमनेरसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात खरातच्या मुलीच्या नावावर मोठी प्रॉपर्टी असल्याचे समोर येत आहे. या मालमत्तेमुळे आता तपासाची व्याप्ती वाढली असून, खरातच्या काळ्या साम्राज्याचा आणखी एक पदर उलगडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणावर सविस्तर निवेदन देताना खरातच्या कुंडलीतील सर्व काळेबेरे चव्हाट्यावर आणले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने केवळ नावाचाच नव्हे तर आपल्या ओळखीचाही मोठा खेळ…
नाशिक: अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे. आता खरात विरोधात सातवा गुन्हा दाखल झाला असून, एका पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पीडित तरुणी आणि तिचे कुटुंब शेतात घर बांधण्याबाबत विचारणा करण्यासाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी २०२१ मध्ये अशोक खरातला भेटले होते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार तिने सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीनुसार, खरातने शैक्षणिक सल्ला देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या आई-वडिलांना केबिनबाहेर काढले. त्यानंतर, तांब्याच्या पेल्यात मंत्रोच्चार केलेले पाणी पिण्यास देऊन तरुणीला बेशुद्ध केले किंवा तिचे मानसिक नियंत्रण मिळवले. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूर गावात ‘सीएल-३’ दारू विक्री परवान्यावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. या प्रकरणी स्थानिक महिलांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावाची संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रशासनाने ग्रामसभेच्या निर्णयाला दिलेली बगल आणि संशयास्पद कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, गुंजाळवाडी येथील दारू परवाना समनापूर येथे स्थलांतरित करताना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, अंतर नियम आणि ग्रामपंचायत कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने संबंधित परवान्याचा ठराव स्पष्टपणे नामंजूर केलेला असतानाही, तो परवाना मंजूर कसा झाला, हा संशोधनाचा…
मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधींचा असेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आहारविहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ: आज आपल्या कामात काही अडथळे निर्माण होऊ शकतात, परंतु धैर्याने त्यावर मात करणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे ठरेल. धनलाभाचे योग आहेत, मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रवासाचे योग असून प्रवासात सतर्क राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मिथुन: आजचा दिवस संमिश्र…
अहिल्यानगर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या दुर्दैवी ॲसिड हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ‘पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२’ अंतर्गत पीडितेसाठी एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले असून, ही संपूर्ण रक्कम वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.…
संगमनेर, प्रतिनिधी- पंचायत समितीमधील एका सीआरपी महिलेच्या मानधनाचा प्रश्न आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेली कथित गैरवर्तणूक यावरून संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित महिलेची तक्रार पोलीस प्रशासनाने दाखल करून घ्यावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी संगमनेर शहर पोलीस स्थानकासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. गेल्या दहा महिन्यांपासून सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित महिलेचे मानधन थकीत होते. हे मानधन मिळवण्यासाठी ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली असता, त्यांच्याकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना माहिती मिळताच काही युवक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर ही…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई केली आहे. या टोळीने केलेल्या विविध गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत, आता त्यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या नवीन कलमान्वये संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवत कलम १११ अंतर्गत वाढीव कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आरोपींच्या जामिनावर बाहेर येण्याच्या शक्यता मावळल्या असून त्यांना मोठा कायदेशीर दणका मिळाला आहे. या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र दाढ रोड, आश्वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ उभे होते. यावेळी रवींद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब…
